प्रत्येकाने फॅमिली प्लॅनिंग केलं असंत तर आज कोरोना लस कमी पडली नसती: उदयनराजे भोसले
सातारा: राज्यामध्ये कोरोना लसीकरण पुरवठा कमी पडत असल्यावर सध्या राज्य सरकार आणि भाजप नेत्यांचे एकमेकांवरु आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. पण अशातच भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी एक अतिशय विचित्र विधान केलं आहे. ‘देशात फॅमिली प्लॅनिंगचे योग्य नियोजन केले असत तर आज लसींचा तुटवडा झाला नसता.’ असं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं आहे. त्याचबरोबर इतर देशात […]
ADVERTISEMENT
सातारा: राज्यामध्ये कोरोना लसीकरण पुरवठा कमी पडत असल्यावर सध्या राज्य सरकार आणि भाजप नेत्यांचे एकमेकांवरु आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. पण अशातच भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी एक अतिशय विचित्र विधान केलं आहे.
ADVERTISEMENT
‘देशात फॅमिली प्लॅनिंगचे योग्य नियोजन केले असत तर आज लसींचा तुटवडा झाला नसता.’ असं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं आहे. त्याचबरोबर इतर देशात योग्य फॅमिली प्लॅनिंग केलं जातं असल्याने त्या देशांमध्ये कुठेही कोरोना लसींचा तुटवडा भासत नसल्याचे उदाहरण देखील त्यांनी दिलं आहे.
पाहा उदयनराजे नेमकं काय म्हणाले:
हे वाचलं का?
‘आपल्या देशाची लोकसंख्या पाहा किती आहे ते. हे बघा उगाच काही वाद निर्माण करण्यापेक्षा ना प्रत्येक राज्याला योग्य तेवढ्या लस मिळाल्या पाहिजे. महाराष्ट्राला का जास्त दुसऱ्या राज्याला का कमी? ज्या राज्यात जेवढी लोकसंख्या आहे त्याप्रमाणे लस देण्यात यावी. आता तुम्ही कोरोना लसीच्या तुटवड्याविषयी बोलत आहात. मग मी म्हणतो प्रत्येकाने फॅमिली प्लॅनिंग केलं असंत तर आज अशी परिस्थिती निर्माण झाली असती का? आपल्याला समजलं पाहिजे. जे इतर देश आहेत युरोप वैगरेमध्ये इथे व्यवस्थित फॅमेली प्लॅनिंग असतं.’ असं वक्तव्य उदयनराजे यांनी केलं आहे.
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधितांची वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात अंशतः लॉक डाऊनची घोषणा केली. मात्र या लादण्यात आलेल्या निर्बंधाने व्यापारी वर्गावर उपासमारीची वेळ आल्याने खासदार उदयनराजे भोसले यांनी जिल्ह्यातील व्यापारी यांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
ADVERTISEMENT
‘ही तर मोगलाई’, शिवेंद्रराजे भोसले का संतापले?
ADVERTISEMENT
‘व्यापाऱ्यांच्या ठिकाणी मी असतो तर मी दुकान बंद ठेवले नसते.’ यावेळी उदयनराजे यांनी राज्य सरकारच्या नियमांची खिल्ली उडवून लॉकडाऊन विरोधात रोष व्यक्त केला. कोरोना लस प्रत्येक राज्याला त्याचा क्षमतेप्रमाणे दिली गेली पाहिजे असं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे.
6 कोटी लोकसंख्येच्या गुजरातला 1 कोटी लसी आणि 12 कोटी लोकसंख्येला महाराष्ट्राला 1.4 कोटी लसी असा भेदभाव का?
महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्राला लसी पुरवताना केंद्राकडून भेदभाव का होतो आहे? हा प्रश्न उपस्थित केला होता. गुजरातची लोकसंख्या 6 कोटी आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटी आहे. तरीही गुजरातला एक कोटी लसी देण्यात आल्या आणि महाराष्ट्राला 1.4 कोटी लसी देण्यात आल्या असे का? महाराष्ट्राची मागणी जास्त आहे. केंद्र सरकारकडून 17 लाख लसी देणार असल्याचं कळलं आहे. तो पुरवठाही कमीच आहे असंही राजेश टोपे यांनी म्हटलं होतं.
महाराष्ट्रच नव्हे तर ‘या’ राज्यातही बेड्सबाबत गंभीर स्थिती, पाहा एक विशेष रिपोर्ट
‘सरकारच्या गैरकारभारावरून लक्ष विचलीत करण्यासाठी व्हॅक्सिनचं राजकारण नको’
दुसरीकडे लसीकरणावरुन राजकारण हे फक्त लक्ष विचलित करण्यासाठी असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ‘राज्यात कोरोना आणि लसीकरण हे विषय महत्त्वाचे आहेतच मात्र त्याचसोबत सरकारच्या गैरकारभारावर होत असलेली टीका आणि विविध प्रकरणात न्यायालयात निघत असलेले वाभाडे यावरून लक्ष विचलित करण्यासाठी व्हॅक्सिनवरून राजकारण केलं जातं आहे. ते कृपा करून करू नका अशी कळकळची विनंती मी करतो आहे.’ असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
‘महाराष्ट्रात व्हेंटिलेटर्स उपलब्ध नाही. रेमडेसिव्हिर उपलब्ध नाही, ऑक्सिजन उपलब्ध नाही, साधे बेडही उपलब्ध नाहीत. मूळात राज्य सरकार आपली जबाबदारी पूर्ण करत नाही. लसी येत आहेत येत राहतील. पण प्राथमिक सेवाही देता येत नसणाऱ्या या भयावह स्थितीकडे मुख्यमंत्री आणि इतर मंत्री लक्ष देतील का?’ असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला होता.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT