डिवचलंत तर आम्ही कोणालाही सोडणार नाही ! चीनसोबत सीमावादावरुन राजनाथ सिंहांचा इशारा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

लडाख आणि डोकलाम सीमेवर चीनसोबत झालेल्या सीमावादात भारतीय जवानांना आपले प्राण गमवावे लागले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अमेरिकेत सॅन फ्रॅन्सिस्को इथे बोलत असताना चीनला गंभीर इशारा दिला आहे. डिवचलंत तर भारत कोणालाही सोडणार नाही अशा शब्दांत राजनाथ सिंहांनी सुनावलं आहे.

ADVERTISEMENT

राजनाथ सिंह सॅन फ्रॅन्सिस्को इथे भारतीय दुतावासातर्फे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. “भारतीय जवानांनी काय केलं आणि सरकारने काय निर्णय घेतले हे मी आता तुम्हाला खुलेआम सांगू शकत नाही. पण एक गोष्ट मी नक्की सांगू शकतो ती म्हणजे यातून चीनला एक स्पष्ट संदेश मिळाला की जर आम्हाला डिवचलं गेलं तर भारत कोणालाही सोडणार नाही.”

2020 साली भारत आणि चीन यांच्यात लडाख येथे सीमेवरुन वादाला सुरुवात झाली. ज्यानंतर 15 जुन 2020 मध्ये गलवान खोऱ्यात चीनी सैन्यासोबत झालेल्या संघर्षात 20 भारतीय जवानांना हौतात्म्य पत्करावं लागलं होतं. यानंतर भारत आणि चीन यांच्यातील लष्करी अधिकाऱ्यांमध्ये सीमावादावर तोडगा काढण्यासाठी 15 चर्चेच्या फेऱ्या पार पडल्या.

हे वाचलं का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा आता बदलत असून भारत आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, असं राजनाथ म्हणाले. “भारताची प्रतिमा आता बदलली आहे. भारताची पत आता वाढली आहे. येत्या काही वर्षांमध्ये कोणताही सत्ता भारताला सर्वोत्तम 3 आर्थिक देशांमध्ये येण्यापासून रोखू शकणार नाही”, असं राजनाथ यांनी स्पष्ट केलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT