Omicron: ‘महाराष्ट्रात पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय घेऊ शकतो’, वर्षा गायकवाडांचं मोठं वक्तव्य

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

School News in Maharashtra: मुंबई: महाराष्ट्रात प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर नुकत्याच सुरु झालेल्या शाळा पुन्हा बंद होण्याची शक्यता आहे. कारण महाराष्ट्रात ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने आत सगळ्यांच्याच चिंतेत अधिक भर पडली आहे. याचबाबत राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांनी एक अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे.

ADVERTISEMENT

‘असं लवकरच होऊ शकतं की, जर रुग्ण सातत्याने वाढत राहिले तर सरकार पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय घेऊ शकतं.’ असं महत्त्वाचं विधान शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केलं आहे.

देशातील एकूण 224 ओमिक्रॉन केसेसपैकी 65 महाराष्ट्रातील आहेत. तर राष्ट्रीय राजधानी दिल्लीत ओमिक्रॉनचे सर्वाधिक 57 रुग्ण आहेत. ओमिक्रॉनच्या व्हेरिएंटच्या बाबतीत महाराष्ट्र देशात पहिली क्रमांकावर आहे. यामुळेच राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी सांगितले की, ‘ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत राहिल्यास आम्ही पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय घेऊ शकतो. सध्या आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत.’

हे वाचलं का?

नुकत्याच राज्यात शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत. मुंबईत तर 16 डिसेंबरपासून प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय महाराष्ट्रात 2022 बोर्डाच्या परीक्षांच्या तारखाही जाहीर झाल्या आहेत. अशा परिस्थितीत कोरोनाच्या धोक्यामुळे शाळा बंद राहिल्यास मुलांच्या शिक्षणाला फटका बसण्याची खात्री आहे.

अशावेळी पुन्हा एकदा शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला जाणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

महाराष्ट्रात ओमिक्रॉन व्हेरिएंटचे 65 रूग्ण कुठे-कुठे आहेत?

ADVERTISEMENT

  • मुंबई – 30

  • पिंपरी-12

  • पुणे ग्रामीण- 7

  • पुणे महापालिका-3

  • सातारा- 3

  • उस्मानाबाद- 3

  • कल्याण डोंबिवली- 2

  • बुलढाणा-1

  • नागपूर-1

  • लातूर-1

  • वसई विरार-1

  • नवी मुंबई -1

  • एकूण-65

  • यापैकी 34 रूग्णांना त्यांची RTPCR चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर घरी सोडण्यात आलं आहे.

    दुसरीकडे चंदिगड राज्यानेही वाढत्या कोरोना प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

    घणसोलीमध्ये 16 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

    घणसोलीमध्ये 16 विद्यार्थ्यांना लागण झाल्यानंतर तेथील शाळा बंद करण्यात आली. याबाबत देखील वर्षा गायकवाड यांना विचारण्यात आला. त्याबाबत त्या म्हणाल्या की, ‘शाळा बंद करण्याचा निर्णय हा तिथल्या प्रशासनाने घेतला असेल. घणसोलीमध्ये 1 विद्यार्थी पॉझिटिव्ह आल्याने इतर विद्यार्थ्यांची चाचणी करण्यात आली होती. त्यात 16 विद्यार्थी पॉझिटिव्ह आले.’

    ‘शाळेतल्या एका विद्यार्थ्याचे वडील परदेशातून आले होते त्यामुळे या शाळेतील 1000 विद्यार्थ्यांची चाचणी करण्यात आली होती.’ अशीही माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

    ADVERTISEMENT

      follow whatsapp

      ADVERTISEMENT