बैल धुण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू तर दोघे बेपत्ता

मुंबई तक

धनंजय साबळे, अकोला पोळा सणानिमित्त बैल धुण्यासाठी नदीत गेलेल्या अकोल्यातील (Akola) आगर येथील युवकाचा गाव तलावात पडून वाहून गेल्याने मृत्यू (Death) झाल्याची घटना आज दुपारी घडली. तर काटेपूर्णा नदीमध्ये ही दोन जण बैल धुण्यासाठी गेलेले असताना तेही नदीत वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, आगर येथील मनोज खाडे हा युवक गावातील तलावात बुडाल्यानंतर त्याला […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

धनंजय साबळे, अकोला

पोळा सणानिमित्त बैल धुण्यासाठी नदीत गेलेल्या अकोल्यातील (Akola) आगर येथील युवकाचा गाव तलावात पडून वाहून गेल्याने मृत्यू (Death) झाल्याची घटना आज दुपारी घडली. तर काटेपूर्णा नदीमध्ये ही दोन जण बैल धुण्यासाठी गेलेले असताना तेही नदीत वाहून गेल्याची घटना समोर आली आहे.

दरम्यान, आगर येथील मनोज खाडे हा युवक गावातील तलावात बुडाल्यानंतर त्याला नागरिकांनी बाहेर काढलं. मात्र, इतर दोघांचा अजूनही तपास सुरूच आहे. सागर गोपाळ कावरे आणि गोपाळ महादेब कांबे अशी दोघांची नावं आहेत. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

सर्वत्र पोळा उत्सव साजरा होत असताना या दिवशी बैलांची पूजा करण्याची प्रथा आहे. बैल धुण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिक हे जवळच्या नदीवर नेऊन त्यांना स्वच्छ आंघोळ घातली जाते. नदीवर बैलांना धुतल्यानंतर त्यांना घरी आणून त्याची पूजा केली जाते. मात्र, आज बैल नदीवर घेऊन गेलेले तरुण बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

हे वाचलं का?