महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना, 8 महिन्याच्या मुलीला HIV पॉझिटिव्ह रक्त दिल्याचा आरोप

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

धनंजय साबळे, अकोला

ADVERTISEMENT

अकोल्यात एका आठ महिन्याच्या मुलीला ब्लड बँकेने एचआयव्ही (HIV) संक्रमित रक्त दिल्याने चिमुकल्या मुलीला एचआयव्हीची बाधा झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. रक्त चाचणी अहवालात 8 महिन्याच्या मुलीला एड्सची (Aids) लागण झाल्याचं समोर आलं आहे. तर तिच्या आई-वडिलांची चाचणी मात्र निगेटिव्ह आली आहे. या संपूर्ण घटनेने पीडित मुलीच्या कुटुंबीयांना प्रचंड धक्का बसला आहे.

अकोला जिल्ह्यात ग्रामीण भागात राहणाऱ्या एका कुटुंबाला कोणाच्या तरी चुकीमुळे प्रचंड मोठी किंमत मोजावी लागली आहे. कारण त्यांच्या 8 महिन्याच्या निष्पाप मुलीला एचआयव्ही संक्रमित रक्त देण्यात आल्याने आता या चिमुकलीचं संपूर्ण आयुष्यच पणाला लागलं आहे. चिमुकलीसाठी ज्या रक्तपेढीतून रक्त आणण्यात आलं होतं त्यांनी याप्रकरणी हातच वर केले आहेत.

हे वाचलं का?

दरम्यान, आता या परिवाराने थेट आरोग्यमंत्री व स्थानिक आरोग्य यंत्रणा आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

ADVERTISEMENT

अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील एका छोट्याशा गावात राहणाऱ्या एका कुटुंबात मुलगी झाली. काही दिवसातच ही मुलगी तापाने फणफणत होती. त्यामुळे तिला तालुक्यातील मूर्तिजापूर येथील डॉक्टर अविनाश अवघडे यांच्या दवाखान्यात दाखल करण्यात आलं.

ADVERTISEMENT

डॉक्टरांनी मुलीच्या पांढऱ्या पेशी कमी झाल्या म्हणून तिला रक्त देण्यास सांगितले आणि अकोला येथील ठाकरे मेमोरियल रक्तपेढीतून रक्त घेऊन येण्यास सांगितले. दरम्यान, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मुलीच्या कुटुंबीयांनी ब्लड बँकेत रक्त आणलं आणि तेच रक्त मुलीला चढवण्यात आलं.

दरम्यान, काही दिवसांनी या मुलीची तब्येत बरी झाली आणि तिला रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं. दरम्यान, या मुलीची पुन्हा काही दिवसांनी तब्येत खराब झाली. त्यानंतर चिमुकली वारंवार आजारी पडू लागल्याने तिला अमरावती येथील दवाखान्यात भरती करण्यात आलं. मागील आठ महिन्यांपासून मुलीच्या तब्येतीत सुधारणाच होत नसल्याने डॉक्टरांनी काही प्राथमिक तपासण्या केल्या. ज्यामध्ये हा धक्कादायक आणि मुलीच्या कुटुंबीयांना मुळापासून हादरवून टाकणारा अत्यंत धक्कादाय प्रकार समोर आला.

आपल्या आठ महिन्याच्या मुलीला एड्स झाला हे ऐकून मुलीच्या आई-वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. यामुळे घरात प्रचंड वादंग देखील झाला. पण यानंतर डॉक्टरांनी दोघांनाही आपापल्या चाचण्या करण्यास सांगितले. दरम्यान, मुलीच्या आई-वडिलांच्या चाचण्या या निगेटिव्ह आल्या. त्यामुळे मुलीला नेमका एचआयव्ही संसर्ग झालाच कसा हा प्रश्न त्यांना पडला.

याप्रकरणात अकोल्यातील रक्तपेढीचे संचालक डॉक्टर पांडुरंग तोष्णीवाल यांनी आपला बचाव करताना असं सांगितलं की, आम्ही आमच्या रक्तपेढीत संपूर्ण रक्ताच्या चाचण्या करूनच हे रक्त दिलं होतं. सुरुवातीला रक्त घेतलं तेव्हा त्याची चाचणी करण्यात आली. त्यावेळस रक्त निगेटिव्ह होतं. म्हणून ते रुग्णांच्या नातेवाईकांना देण्यात आलं होतं. पण एचआयव्हीचा संसर्ग झाल्यानंतर जो तीन महिन्याचा काळ असत ज्याला विंडो पिरेड म्हणतात त्यामध्ये रक्तदात्याने रक्त दिलेलं असल्याने संबंधित रक्त एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे याची पुष्टी होऊ शकली नाही. त्यामुळेच आधी रक्त निगेटिव्ह असल्याने ते रुग्णाला देण्यात आलं होतं. असा दावा त्यांनी केला आहे.

Covaxin लसीमध्ये गायीच्या वासराचं रक्त? काँग्रेसच्या प्रश्नावर BJP चा प्रचंड संताप

दरम्यान, आता अशा प्रकारचा हलगर्जी करणाऱ्या ब्लड बँकेवर आता काय कारवाई केली जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

तूर्तास या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा आरोग्य विभागाने व आरोग्य उपसंचालकांनी तात्काळ दखल घेऊन या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणातील सत्य बाहेर आल्यावर दोषींवर योग्य ती कारवाई करणार असल्याचं आरोग्य विभागाचे उपसंचालक राजकुमार चव्हाण यांनी सांगितलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT