Kolhapur: तरुणीकडून पाहून अश्लील हावभाव, युवकाला शिकवला चांगलाच धडा!
दीपक सूर्यवंशी, प्रतिनिधी (कोल्हापूर) Kolhapur Crime: इचलकरंजी: एका महाविद्यालयीन युवतीकडं पाहून अश्लील हावभाव (obscene gestures) करणार्या युवकाला भर रस्त्यात चांगलाच चोप दिल्याची घटना कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात घडली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी (Ichalkaranji) बस स्थानकात काल (26 डिसेंबर) हा प्रकार घडला. छेडछाड करणार्या त्या युवकाला चोप देताना अनेकांनी त्याला बेदम मारहाण केली. अखेर काही नागरिकांनीच त्या […]
ADVERTISEMENT
दीपक सूर्यवंशी, प्रतिनिधी (कोल्हापूर)
ADVERTISEMENT
Kolhapur Crime: इचलकरंजी: एका महाविद्यालयीन युवतीकडं पाहून अश्लील हावभाव (obscene gestures) करणार्या युवकाला भर रस्त्यात चांगलाच चोप दिल्याची घटना कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात घडली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी (Ichalkaranji) बस स्थानकात काल (26 डिसेंबर) हा प्रकार घडला. छेडछाड करणार्या त्या युवकाला चोप देताना अनेकांनी त्याला बेदम मारहाण केली. अखेर काही नागरिकांनीच त्या युवकाला बाजूला नेत पोलिसांच्या निर्भया पथकाच्या ताब्यात दिलं. (in bus stand young man was seen making obscene gestures by young woman he was brutally beaten)
हातकणंगले तालुक्यातील अनेक मुली शिक्षणासाठी इचलकरंजीत येतात. त्यासाठी अनेक मुली बसनं प्रवास करतात. त्यामुळं शाळा, महाविद्यालय सुरु होण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत इचलकरंजी बसस्थानकावर मुलींची गर्दी असते. संगमनगर परिसरात राहणार्या 2 युवती, आज कॉलेज सुटल्यावर घरी जाण्यासाठी बसस्थानकात आल्या. त्यावेळी एका युवकानं त्यांच्याकडं पाहून हातवारे आणि हावभाव करत छेडछाड करण्याचा प्रयत्न केला.
हे वाचलं का?
अमरावतीत दोन अल्पवयीन मुलांचे अश्लील व्हीडिओ बनवून केले व्हायरल, तिघांना अटक
त्या मुलींच्या भावानं याबाबत त्या तरूणाला विचारणा केल्यावर, तो उडवाउडवीची उत्तरं देऊ लागला. त्यामुळं युवती आणि बसस्थानकातील प्रवाशांनी त्या तरूणाला बराच चोप दिला.
ADVERTISEMENT
दरम्यान, याचवेळी मुलीची छेडछाड केलेल्या तरूणाला चोप देण्यासाठी अनेकांनी बाह्या सरसावल्या आणि हात धुवून घेतले. त्यामुळं त्या टवाळखोराची अक्षरश: बोबडी वळली.
ADVERTISEMENT
अश्लील कृत्य करणाऱ्या शिक्षकाला अटक, पॉस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल
अखेर काही समंजस नागरीकांनीच त्या तरूणाला बाजूला करत, निर्भया पथकाच्या ताब्यात दिलं. मात्र इचलकरंजी बसस्थानकात अशा प्रकारची घटना घडल्याने अनेक मुली आणि महिलांनी चिंता व्यक्त केली आहे. जर अशाप्रकारे सार्वजनिक ठिकाणीच मुलींची छेड काढली जात असेल तर प्रशासनाने याबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT