महाराष्ट्रात दिवसभरात 9 हजार Corona रूग्ण पॉझिटिव्ह, 180 मृत्यूंची नोंद

मुंबई तक

महाराष्ट्रात दिवसभरात 9 हजार नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. तर 180 मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात आज दिवसभरात 5 हजार 756 रूग्ण बरे झाले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण 59 लाख 80 हजार 350 रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 96.24 टक्के इतकं झालं आहे. राज्यात आज […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

महाराष्ट्रात दिवसभरात 9 हजार नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. तर 180 मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात आज दिवसभरात 5 हजार 756 रूग्ण बरे झाले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण 59 लाख 80 हजार 350 रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 96.24 टक्के इतकं झालं आहे. राज्यात आज 9 हजार रूग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यात 180 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर 2.4 टक्के इतका झाला आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4 कोटी 54 लाख 81 हजार 252 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 62 लाख 14 हजार 190 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 67 हजार 585 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 4 हजार 66 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 1 लाख 3 हजार 486 सक्रिय रूग्ण आहेत. आज राज्यात 9 हजार नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या 62 लाख 14 हजार 190 इतकी झाली आहे.

महाराष्ट्रातले प्रमुख जिल्हे आणि सक्रिय रूग्णांची संख्या

मुंबई- 10 हजार 695