महाराष्ट्रात दिवसभरात 6 हजारांपेक्षा जास्त Corona रूग्ण पॉझिटिव्ह, मृत्यू दर 2.9 टक्के
महाराष्ट्रात दिवभरात 6 हजार 753 नव्या पॉझिटिव्ह रूग्णांचं निदान झालं आहे. तर 167 मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्राचा मृत्यूदर 2.9 टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्रात आज दिवसभरात 5 हजार 979 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत 60 लाख 22 हजार 485 कोरोना रूग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात […]
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात दिवभरात 6 हजार 753 नव्या पॉझिटिव्ह रूग्णांचं निदान झालं आहे. तर 167 मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्राचा मृत्यूदर 2.9 टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्रात आज दिवसभरात 5 हजार 979 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत 60 लाख 22 हजार 485 कोरोना रूग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 96.33 टक्के इतका झाला आहे.
ADVERTISEMENT
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4 कोटी 64 लाख 46 हजार 360 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 62 लाख 51 हजार 810 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 52 हजार 702 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 3 हजार 653 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 94 हजार 769 सक्रिय रूग्ण आहेत. आज राज्यात दिवसभरात 6 हजार 753 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील 62 लाख 51 हजार 810 इतकी झाली आहे.
मुंबईत 374 पॉझिटिव्ह रूग्ण
हे वाचलं का?
मुंबईत आज दिवसभरात 374 नवे रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 482 कोरोना रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आजपर्यंत मुंबईत 7 लाख 9 हजार 198 रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट हा 97 टक्के इतका झाला आहे. तर मुंबईचा डबलिंग रेट 1209 दिवसांवर गेला आहे. 16 ते 22 जुलै या कालावधीत ग्रोथ रेट हा 0.5 टक्के असा नोंदवला गेला आहे. आज दिवसभरात 8 रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. मुंबईत आत्तापर्यंत एकूण 15 हजार 757 रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत मुंबईतल्या एकूण कोरोना रूग्णांची संख्या ही 7 लाख 33 हजार एवढी झाली आहे. तर आत्तापर्यंत मुंबईतले एकूण 7 लाख 9 हजार 198 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
पुण्यात 250 नवे पॉझिटिव्ह रूग्ण
ADVERTISEMENT
पुण्यात 250 नवे पॉझिटिव्ह रूग्ण दिवसभरात आढळले आहेत. तर दिवसभरात 222 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यात सध्याच्या घडीला 3030 सक्रिय रूग्ण आहेत. पुण्यात आज दिवसभरात पाच मृत्यूंची नोंद झाली आहे. तर आत्तापर्यंत पुण्यात 8 हजार 720 मृत्यू झाले आहेत. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT