नागपूर आणि नाशिकमध्ये 1 जूनपासून Break The Chain चे नियम काही अंशी शिथील
नागपूर आणि नागपूरमध्ये 1 जूनपासून म्हणजेच मंगळवारपासून ब्रेक द चेनची नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नाशिकमध्येही काही प्रमाणात निर्बंध काही प्रमाणात शिथील करण्यात आले आहेत. आपण जाणून घेऊया दोन्ही शहरांमध्ये काय काय निर्बंध शिथील असणार आहेत. सर्व अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 7 ते 2 पर्यंत सुरू असतील. नॉन इसेन्शिअर स्टँड अलोन एकटी दुकाने […]
ADVERTISEMENT
नागपूर आणि नागपूरमध्ये 1 जूनपासून म्हणजेच मंगळवारपासून ब्रेक द चेनची नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नाशिकमध्येही काही प्रमाणात निर्बंध काही प्रमाणात शिथील करण्यात आले आहेत. आपण जाणून घेऊया दोन्ही शहरांमध्ये काय काय निर्बंध शिथील असणार आहेत.
ADVERTISEMENT
सर्व अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 7 ते 2 पर्यंत सुरू असतील.
नॉन इसेन्शिअर स्टँड अलोन एकटी दुकाने 7 ते 2 पर्यंत सोमवार ते शुक्रवार सुरू राहतील. मॉल बंद असतील.
हे वाचलं का?
कृषी संदर्भातील खते, बियाणे इत्यादी दुकाने सर्व सात दिवस सकाळी 7 ते 2 सुरु असतील.
खाद्य पदार्थ दारू – ई कॉमर्स व आवश्यक. सेवेतील सर्व बाबींची होम डिलिव्हरी रात्री 11 पर्यंत सुरू राहील.
ADVERTISEMENT
माल वाहतूक सुरू असेल.
ADVERTISEMENT
मॉर्निंग वॉक, आऊट डोअर स्पोर्टस बंद असेल.
सर्व सरकारी कार्यालय 25 टक्के उपस्थितीत सुरू असेल.
सर्व खासगी कार्यालये बंद असतील.
सबळ कारणाशिवाय दुपारी 3 नंतर रस्त्यावर फिरण्यास बंदी राहतील
नाशिकमधील लॉकडाऊन शिथिल करण्यात आले आहे. त्यामुळे आता अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. दुपारी 3 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे.
अत्यावश्यक सेवेच्या अंतर्गत नसलेल्या काही व्यवसाय सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यात पुढील व्यवसायांचा समावेश आहे.
बांधकाम क्षेत्राची ठिकाणे
शैक्षणिक वह्या पुस्तके व स्टेशनरी दुकाने
हार्डवेअर
इलेक्ट्रीकल्स साहित्य दुकाने
घर दुरुस्तीचे साहित्याची दुकाने
शासकीय कार्यालयात २५ टक्के उपस्थिती
कोंव्हिड- 19 व्यवस्थापनाशी निगडीत नसलेल्या सर्व शासकीय कार्यालयामध्ये 25% उपस्थिती राहणार आहे. यामुळे आता शासकीय कामांना सुरुवात होणार आहे.
कृषी साहित्यांची दुकाने सुरु राहणार
जून महिन्याच्या सुरुवातीला आता शेतीच्या कामांना वेग येणार आहे. यामुळे कृषी विषयक साहित्याची दुकाने सकाळी 07.00 ते दुपारी 02.00 या वेळेत सुरु राहतील.
हॉटेल-ढाबे केवळ पार्सल सेवा सुरू असणार,
सर्व ढाबे व हॉटेल्स आणि सर्व आस्थापना पार्सल सुविधेसाठी सकाळी 07.00 ते सायंकाळी 07.00 या वेळेत सुरु राहतील. तथापि मद्य दुकाने, आस्थापना शासनाने ठरवून दिलेल्या दिवशीच सुरु राहतील
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT