नाशिकमध्ये कॉलेजच्या बसला ट्रकची धडक, बस उलटून झालेल्या अपघातात 22 जण जखमी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

प्रविण ठाकरे, प्रतिनिधी, नाशिक

ADVERTISEMENT

नाशिकमध्ये आज सकाळी औरंगाबाद रोडवर बस आणि ट्रकचा अपघात झाला आहे. ट्रकने दिलेल्या धडकेत विद्यार्थ्यांना घेऊन जाताना ही बस उलटली. सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाही. या घटनेत 22 जण जखमी झाले आहेत. ही बस SMBT कॉलेजच्या विद्यार्थ्यांची असल्याचं समोर आलं आहे.

आज सकाळी सात वाजता धामणगावकडे निघाली होती. तेव्हा बस आणि ट्रकची धडक झाली. यावेळी बस उलटली त्यामुळे 22 विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. अपघात झाल्यानंतर ट्रक चालक फरार झाला आहे. शुक्रवारी म्हणजेच आज सकाळी आठ वाजता हा अपघात झाला आहे.

हे वाचलं का?

अपघातात सुमारे 20 ते 22 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. जखमी विद्यार्थ्यांवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. धामणगाव येथील एसएमबीटी कॉलेजचे विद्यार्थी आणि कर्मचारी यांना घेऊन बस जात होती.  शहरातील तपोवन परिसराजवळील हॉटेल मिरची चौफुली वळणावर बस आली असता, त्याचवेळी औरंगाबादकडून येत असलेल्या ट्रकने बसला जोरदार धडक दिली. ट्रकचा वेग अधिक असल्याने जोराची धडक बसली आणि त्यामुळे बस जागीच उलटली. यात 20 ते 22 विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

बसमधून कॉलेजचे विद्यार्थी प्रवास करत होते. सिग्नलवर भरधाव ट्रक आणि बसमध्ये समोरासमोर धडक झाली. या धडकेनंतर बस रस्त्यावरच उलटली. या अपघातात विद्यार्थ्यांना दुखापत झाली आहे. अपघातानंतर ट्रकचा चालक मात्र फरार झाला आहे, अशी माहिती काही नागरिकांनी दिली.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT