Independence Day 2021: PM Modi यांनी लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणातील 10 महत्त्वाच्या घोषणा
नवी दिल्ली: भारताच्या 75 व्या स्वतंत्र दिनानिमित्त (75th Independence Day)पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी लाल किल्ल्यावरुन (Lal Killa) देशवासियांना संबोधित केलं. यावेळी केलेल्या आपल्या भाषणात काही अत्यंत महत्त्वाच्या घोषणा केल्या आहे. ज्या पुढील काही काळात भारताच्या अर्थकारण आणि समाजकारणावर परिणाम करु शकतात. जाणून घेऊयात पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात केलेल्या 10 महत्त्वाच्या घोषणा. (Independence […]
ADVERTISEMENT
नवी दिल्ली: भारताच्या 75 व्या स्वतंत्र दिनानिमित्त (75th Independence Day)पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी लाल किल्ल्यावरुन (Lal Killa) देशवासियांना संबोधित केलं. यावेळी केलेल्या आपल्या भाषणात काही अत्यंत महत्त्वाच्या घोषणा केल्या आहे.
ADVERTISEMENT
ज्या पुढील काही काळात भारताच्या अर्थकारण आणि समाजकारणावर परिणाम करु शकतात. जाणून घेऊयात पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात केलेल्या 10 महत्त्वाच्या घोषणा. (Independence Day Celebration 2021)
‘100 व्या स्वातंत्र्य दिनाला अद्याप 25 वर्ष आहेत. पण आपल्याला तेवढा वेळ पाहून चालणार नाही. हीच योग्य वेळ आहे. आपल्याला सर्वांना बदलावं लागणार आहे.’ असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.
हे वाचलं का?
पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे:
1. जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी तयारी केली जात आहे. लवकरच इथे निवडणुका होणार
ADVERTISEMENT
2. 21 व्या शतकात भारताला नव्या उंचीवर नेण्यासाठी भारताच्या सामर्थ्याचा योग्य वापर होणे गरजेचे आहे यासाठी जे वर्ग मागे आहेत त्यांना आपल्याला मदतीचा हात दिलाच पाहिजे.’
ADVERTISEMENT
3. लाल किल्ल्यावरून मी आवाहन करतो, सबका साथ-सबका विकास-सबका विश्वास आणि सबका प्रयास, आमच्या आत्मनिर्भर भारताच्या प्रत्येक उद्दिष्टाच्या प्राप्तीसाठी अतिशय महत्वाचे आहे
4. सैनिकी शाळेत मुलींना देखील मिळणार प्रवेश, पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा.. आता सरकारने ठरवलं आहे की, देशातील सर्व सैनिकी शाळेत मुलींना देखील शिक्षणासाठी प्रवेश देण्यात येईल.
5. भारत येत्या काही दिवसातच प्रधानमंत्री गतीशक्ती नॅशनल मास्टर प्लॅन सुरू करणाार आहे.
6. केंद्र सरकार ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मची निर्मिती करणार, पंतप्रधान मोदींकडून मोठी घोषणा. या उत्पादनांना देशात आणि परदेशात मोठी बाजारपेठ मिळावी, यासाठी आता सरकार ई- कॉमर्स प्लॅटफॉर्म तयार करेल.
7. आपले ध्येय असे राष्ट्र विकसित करण्याचे आहे जिथे आपल्याकडे जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा असतीलच, मात्र त्याचबरोबर ‘किमान सरकार, कमाल प्रशासन’ हा मंत्र घेऊन आपण पुढे वाटचाल करू
8. देशातील लहान शेतकऱ्यांच्या सामूहिक शक्तीमध्ये आणखी वाढ केली पाहिजे. त्यांना नव्या सुविधा दिल्या पाहिजेत
9. कालबाह्य झालेले नियम, प्रक्रिया रद्द करण्याचं केंद्र आणि राज्य सरकारांना आवाहन, कालबाह्य कायद्याच्या कचाट्यातून देशाची सुटका करण्याची वेळा आली आहे.
10. नॅशनल हायड्रोजन मिशनची घोषणा करत आहे. पर्यावरणपूरक भारतासाठी ही घोषणा आहे.
Independence Day: जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच निवडणुका होणार, पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
यंदाचा स्वातंत्र्य दिन हा खूपच विशेष आहे. कारण हा 75 वा स्वातंत्र्य दिन आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित केलं. दरवेळी प्रमाणे या वेळीही पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश केला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT