अमरावतीच्या खासदार नवनीत राणांना केंद्राची वाय प्लस सुरक्षा प्रदान

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांना केंद्र सरकारने वाय प्लस दर्जाची सुरक्षाव्यवस्था पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यासंदर्भातले आदेश दिले आहेत. यापुढे देशात कुठेही फिरत असताना आता नवनीत राणा यांना वाय प्लस दर्जाचं सुरक्षाकवच मिळणार आहे. नवनीत राणा यांचा आता व्हीव्हीआयपी व्यक्तींमध्ये समावेश करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

राज्यातील महाविकास आघाडी सरकारविरुद्ध नवनीत राणा नेहमी आक्रमक भूमिका मांडत असतात. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचा पराभव करत राणा लोकसभेवर निवडून आल्या होत्या. ज्यानंतर नवनीत राणा यांनी सातत्याने शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारला विविध मुद्द्यांवरुन धारेवर धरलं आहे. त्यामुळे नवनीत राणा यांच्या जीवाला धोका असल्याचा अहवाल गुप्तचर यंत्रणेने गृहमंत्रालयाला दिला होता. या अहवालाची गंभीर दखल घेत नवनीत राणांना वाय प्लस दर्जाची सुरक्षाव्यवस्था पुरवण्यात आली आहे.

केंद्र सरकारने प्रदान केलेल्या सुरक्षाव्यवस्थेत आता नवनीत राणा यांच्यासोबत एसपीओ, एनएसजी कमांडो, सीआरपीएफचे बंदुकधारी जवान, शासकीय पालयट कार, दोन स्कॉर्पिओ कार असा ताफा पुरवण्यात आला आहे. यापुढे 24 तास हे पथक नवनीत राणा यांच्या सुरक्षेसाठी तैनात असणार आहे. एकूण 11 कमांडोची सुरक्षाव्यवस्था राणा यांना पुरवण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारविरुद्ध ठामपणे भूमिका मांडणाऱ्या व्यक्तींना केंद्राने सुरक्षा पुरवण्याची ही तिसरी वेळ ठरली आहे. याआधी अभिनेत्री कंगना रणौत, भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना केंद्राने सुरक्षाव्यवस्था पुरवली आहे, ज्यात आता नवनीत राणांचाही समावेश झाला आहे्.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT