अरुणाचल प्रदेशमध्ये भारत-चीन सैन्यात झटापट : ३० हून अधिक जवान जखमी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

तवांग : अरुणाचल प्रदेशमध्ये भारत-चीनच्या सैन्यांमध्ये पुन्हा एकदा मोठी झटापट झाल्याचं वृत्त समोर येत आहे. यात दोन्ही बाजूचे ३० हून अधिक जवान जखमी झाल्याची माहिती आहे. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, तवांग जिल्ह्यातील यंगस्टे येथे ९ डिसेंबर २०२२ रोजी ही घटना घडली आहे.

ADVERTISEMENT

प्राथमिक माहितीनुसार, चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे ३०० पेक्षा जास्त जवान भारताच्या १७ हजार फूट उंचीवरील नियंत्रण रेषेजवळ येण्याचा प्रयत्न करत होते. मात्र चिनी सैनिकांच्या या आगळीकीला भारतीय जवानांनी चोख प्रत्यूत्तर दिलं. यावेळी दोन्ही बाजूच्या सैन्यांमध्ये झटापट झाली. यात दोन्ही लष्कराचे ३० हून अधिक जवान जखमी झाले.

संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, दोन्ही देशांचे सैनिक काही वेळातच घटनास्थळावरून मागे फिरले. तसंच या घटनेनंतर भारतीय लष्कराचे कमांडर आणि चिनी कमांडर यांनी नियमीत प्रक्रियेनुसार फ्लॅग मीटिंग घेतली. यामुळे नियंत्रण रेषेवर शांती प्रस्थापित होण्यास मदत होते.

हे वाचलं का?

चीनी सैन्यांचे यापूर्वीही मनसुबे उधळून लावले होते :

‘आज तक’ ने दिलेल्या वृत्तानुसार गतवर्षी ऑक्टोबरमध्ये याच ठिकाणी भारतीय जवानांनी चीनी सैन्याच्या जवानांना नियंत्रण रेषेजवळून मागं हटकलं होतं. पीपल्स लिबरेशन आर्मीचे जवळपास २०० जवान अरुणाचल प्रदेशमध्ये नियंत्रण रेषेजवळ येण्याचा प्रयत्न करत होते. मात्र भारतीय सैन्याने चिनी सैन्याचे मनसुबे उधळून लावले होते.

गलवान खोऱ्यात अद्यापही तणावाची परिस्थिती :

जून २०२० मध्ये चिनी सैनिकांनी पूर्व लडाखच्या लडाखच्या गलवान खोऱ्यात नियंत्रण रेषेजवळ घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र भारतीय जवानांनी हा प्रयत्न हाणून पाडला होता. त्यावेळीही गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसक झटापट झाली होती. या चकमकीत कर्नल संतोष बाबू यांच्यासह २० भारतीय जवान शहीद झाले होते. या घटनेपासून गलवानमध्ये अजूनही दोन्ही देशांमध्ये तणावाची परिस्थिती आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT