भारतीय विद्यार्थी अडकले; शिवसेना खासदार चतुर्वेदी पोलंडच्या राजदूतांवर भडकल्या
रशियाकडून करण्यात आलेल्या हवाई आक्रमणानंतर युक्रेनमध्ये युद्धस्थिती निर्माण झालेली असून, सध्या हजारो नागरिक अडकले आहेत. दोन्ही देशांमध्ये अचानक लष्करी संघर्ष सुरू झाल्यानं अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले असून, त्यांचे व्हिडीओ समोर येत आहेत. पोलंडच्या सीमेवरून विद्यार्थ्यांना परत पाठवल्याचेही व्हिडीओ समोर आले असून, यावरून शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी पोलंडच्या राजदूतांना सुनावलं. त्यावरून दोघांमध्ये चांगली […]
ADVERTISEMENT
रशियाकडून करण्यात आलेल्या हवाई आक्रमणानंतर युक्रेनमध्ये युद्धस्थिती निर्माण झालेली असून, सध्या हजारो नागरिक अडकले आहेत. दोन्ही देशांमध्ये अचानक लष्करी संघर्ष सुरू झाल्यानं अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले असून, त्यांचे व्हिडीओ समोर येत आहेत. पोलंडच्या सीमेवरून विद्यार्थ्यांना परत पाठवल्याचेही व्हिडीओ समोर आले असून, यावरून शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी पोलंडच्या राजदूतांना सुनावलं. त्यावरून दोघांमध्ये चांगली शाब्दिक चकमक बघायला मिळाली.
ADVERTISEMENT
युक्रेनमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीमुळे अडकून पडलेल्या भारतीयांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सोमवारी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार 1,400 विद्यार्थी आणि नागरिकांना युक्रेनमधून मायदेशी आणण्यात आलं आहे. नागरिकांना बाहेर काढण्यासाठी परिस्थिती कठीण असून, भारतीयांना युक्रेनमधून बाहेर काढण्याच्या मोहिमेला वेग दिला जात आहे.
परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेनंतर शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विट करत सरकारकडून केल्या जात असलेल्या प्रयत्नाबद्दल प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या या ट्विटला पोलंडचे भारतातील राजदूत अॅडम बुराकोवस्की यांनी उत्तर दिलं आणि फेक न्यूज पसरवू नका, असंही म्हटलं. त्यावरून खासदार चतुर्वेदी चांगल्याच भडकल्याचं पाहायला मिळालं.
हे वाचलं का?
भारतातील पोलंडच्या दूतावासाला टॅग करत प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, “नमस्कार, असंख्य भारतीय विद्यार्थ्यांना पोलंडमध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्यात आलं आहे. त्याचबरोबर ज्यांना परवानगी देण्यात आली होती, त्यांनाही परत पाठवलं गेलं आहे. त्यामुळे त्यांच्या आईवडिलांना काळजी वाटत आहे. ‘ऑपरेशन गंगा’ (युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्राने हाती घेतलेल्या मोहिमेचं नाव) आणि भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाला विनंती आहे की त्यांनी यामध्ये तातडीने लक्ष घालावं”, असं खासदार चतुर्वेदी म्हणाल्या.
त्यावर भारतातील पोलंडचे राजदूत अॅडम बुराकोवस्कींनी उत्तर दिलं. “मॅडम, हे अजिबात सत्य नाही. पोलंड सरकारने युक्रेनमधून प्रवेश करणाऱ्या कुणालाही रोखलेलं नाही. तुम्ही तुमच्या सूत्रांची पडताळणी करून घ्या. त्याचबरोबर फेक न्यूज पसरवू नका,” असं बुराकोवस्की म्हणाले.
ADVERTISEMENT
बुराकोवस्की यांच्या ट्विटला खासदार चतुर्वेदींनी उत्तर दिलं. “सर, आदरानेच बोलत आहे की, तुम्ही जे सांगत आहात विद्यार्थी मात्र तसं बोलत नाहीयेत. हे खूप दुर्दैवी आहे की, आपण याला फेक न्यूज म्हणालात, पण तिथे अडकून पडलेल्या नागरिकांची नावे आणि नंबर तुम्हाला सांगायला मला आनंदच होईल. फेक न्यूज म्हणण्यापेक्षा आधी वस्तुस्थितीबद्दल माहिती घेतली असती, तर मी कौतुकच केलं असतं”, असं प्रियंका चुतुर्वेदी म्हणाल्या.
ADVERTISEMENT
Sir, with all due respect, that’s not what I have been told by the students. Unfortunate that you called it fake news, will be happy to share numbers&names of those people stranded. And I’d appreciate before screaming fake news having the basic etiquette to reaching out. Thanks.
— Priyanka Chaturvedi?? (@priyankac19) February 28, 2022
खासदार चतुर्वेदींच्या या ट्विटवरही पोलंडच्या राजदूतांनी उत्तर दिलं. ते म्हणाले, “मॅडम, असं काही घडलेलं नाही, हे मी ठामपणे सांगतोय आणि संपर्क क्रमांकासह पूर्ण यादी इथे शेअर केली जाऊ शकत नाही. त्यामुळे पोलंडमधील भारतीय दूतावासाला ही माहिती द्या. कारण ते हे सगळं काम बघत आहे आणि अडकलेल्या लोकांना मदत करू शकतात. आम्ही एच ई नगमा मलिक यांच्या संपर्कात आहोत”, असं बुराकोवस्की म्हणाले.
त्यानंतर प्रियंका चतुर्वेदींनी त्यांना उत्तर दिलं की, “कधीही माझ्या देशाबद्दलच्या आणि भारतीयांप्रति असलेल्या निष्ठेबद्दल प्रश्न उपस्थित करू नका. मी सुद्धा आपल्या निष्ठांवर प्रश्न उपस्थित करणार नाही.”
बुराकोवस्की म्हणाले, “मॅडम, रशियाने केलेल्या हल्ल्यानंतर आतापर्यंत सर्वच देशांचे 3 लाख निर्वासित पोलंड सीमेवर आले आहेत. त्यात 1,200 लोक भारतीय आहेत. आणि अजूनही नागरिक येतच आहेत. अडचणीत असलेल्यांना पोलंडकडून मदत केली जात आहे आणि आम्ही भारतीय अधिकाऱ्यांना सहकार्य करत आहोत,” असं ते म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT