अमरावती महापालिका आयुक्तांवर युवा स्वाभिमानी कार्यकर्त्यांकडून शाईफेक, पुतळ्याचं राजकारण पेटलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

– धनंजय साबळे, अमरावती प्रतिनिधी

ADVERTISEMENT

अमरावती शहरात शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन सुरु झालेलं राजकारण चांगलंच तापलं आहे. उड्डाणपुलाजवळ बसवण्यात आलेला पुतळा महापालिका प्रशासनाने परवानगी नसल्याचं सांगत हटवला होता. यानिर्णयाविरोधात खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानी पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी अमरावतीचे महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या शाई फेकली.

आयुक्त आष्टीकर आज अमरावती शहरातील राजापेठ भागात भुयारी मार्गाची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी युवा स्वाभिमानी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न केला. आष्टीकर यांच्या सुरक्षारक्षकाला ही बाब समजताच त्यांनी हा प्रकार थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतू तरीही या महिला कार्यकर्त्यांनी शाईची बाटली रिकामी करत घोषणाबाजी केली.

हे वाचलं का?

या घटनेनंतर कार्यकर्त्यांनी जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणा दिल्या. आष्टीकर यांच्या सुरक्षारक्षकाने त्यांना तात्काळ गाडीत बसवून घटनास्थळावरुन दूर नेलं. या घटनेविरुद्ध शहरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून महापालिका कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरु केली आहे. दरम्यान स्थानिक काँग्रेस नेत्यांनी, राणा दाम्पत्यावर टीका करत आयुक्तांवर झालेला हल्ला हे एक षडयंत्र असल्याचं सांगितलं.

अमरावतीमध्ये जोपर्यंत दंगल होत नाही तोपर्यंत हा वाद चालू ठेवण्याचा विडा राणा दाम्पत्याने उचलला असल्याचं स्थानिक काँग्रेस नेते दिलीप एडतरकर यांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

आमदार रवी राणा यांनी या प्रकरणात सावध प्रतिक्रीया दिली आहे. झालेल्या घटनेचं समर्थन मी अजिबात करणार नाही. परंतू शिवप्रेमींनी बसवलेला पुतळा महापालिका प्रशासन आणि आष्टीकर यांनी हातोड्याचा वापर करुन काढला आणि गोडाऊनमध्ये टाकला. तो पुतळा झाकूनही ठेवता आला असला. त्यांच्या याच कारवाईमुळे शिवप्रेमींच्या भावना तीव्र झाल्याचंही राणा म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी आयुक्त आष्टीकर यांच्यावर गंभीर आरोप करत शहराच्या विकासकामांसाठी ते योगदान देत नसल्याचा आरोप केला.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT