आता शिवसेना टार्गेटवर! यशवंत जाधव आणि यामिनी जाधव यांच्या घरी आयकर विभागाचे छापे
मुंबई महापालिकेतील शिवसेनेचे नेते यशवंत जाधव आणि आमदार यामिनी जाधव यांच्या घरी आयकर विभागाने छापे मारले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर आता तपास यंत्रणांचं पुढचं टार्गेट शिवसेना आहे हेच यावरून दिसतं आहे. सकाळीच हे छापे मारण्यात आले असून यशवंत जाधव आणि यामिनी जाधव यांची चौकशी सुरू कऱण्यात आली आहे. मुंबई […]
ADVERTISEMENT
मुंबई महापालिकेतील शिवसेनेचे नेते यशवंत जाधव आणि आमदार यामिनी जाधव यांच्या घरी आयकर विभागाने छापे मारले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर आता तपास यंत्रणांचं पुढचं टार्गेट शिवसेना आहे हेच यावरून दिसतं आहे. सकाळीच हे छापे मारण्यात आले असून यशवंत जाधव आणि यामिनी जाधव यांची चौकशी सुरू कऱण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या मुंबईतील इन्कम टॅक्स विभागाने छापेमारी केली आहे. माझगावमधील त्यांच्या निवासस्थानी आयकर विभागाकडून तपास सुरु आहे. याचं नेमकं कारण अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेलं नाही. दरम्यान तपास सुरु असल्याने इमारतीबाहेर मोठ्या प्रमाणात सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. सीआरपीएफचे जवानदेखील तैनात करण्यात आले आहेत. यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव भायखळा मतदारसंघातून आमदार आहेत.
शिवसेना नेत्या यामिनी जाधव यांची आमदारकी धोक्यात?; आयकर विभागाच्या मागणीने खळबळ
हे वाचलं का?
नवाब मलिक यांच्याप्रमाणे पहाटेच आयकर विभागाचं पथक यशवंत जाधव यांच्या माझगावमधील निवासस्थानी दाखल झालं. मनपाचे स्थायी समितीचे अध्यक्ष असल्याने आर्थिक निर्णयांमध्ये यशवंत जाधव यांचा सहभाग असतो. पालिकेच्या कंत्राट आणि अन्य व्यवहारांमध्येही स्थायी समितिची महत्वाची भूमिका असते. याआधी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांच्यावर कोव्हिड घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे या कारवाईवरुन वेगवेगळे तर्क-वितर्क लढवले जात आहेत. यशवंत जाधव शिवसेनेचे महत्वाचे नेते असल्याने या कारवाईमुळे राजकीय वातावरण अजून पेटलं जाण्याची शक्यता आहे.
आमदार यामिनी जाधव आणि मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या संपत्तीची चौकशी करण्यात यावी अशी मागणी किरीट सोमय्यांनी केली होती. संपत्तीत अपारदर्शक आवक, हवाला व्यवहार, मध्यपूर्व देशातील काही कंपन्यांच्या सोबतचे आर्थिक व्यवहार आढळून येत आहेत. हे संपूर्ण व्यवहार संशयास्पद असल्याने त्याची चौकशी होणे आवश्यक आहे, असंही किरीट सोमय्यांनी म्हटलं होतं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
किरीट सोमय्यांनी काय आरोप केले?
जाधव परिवाराचे प्रधान डिलर्स प्रा. लिमिटेड या बोगस कंपनीसोबत आर्थिक व्यवहार आहेत
प्रधान डिलर्स सोबतचे रूपये 1 कोटीचा हवाला व्यवहार शेल कंपनीद्वारे करण्यात आला आहे
मिळकत, जमीन, संपत्ती लपवण्याचा प्रयत्न करण्यात आले आहेत
स्कायलिंक कमर्शियल लिमिटेड आणि सुपरसॉफ्ट सप्लायर्स लि. अशा 8 शेल कंपन्यासोबत मनी लॉड्रिंगचे व्यवहार
असे आरोप किरीट सोमय्या यांनी केले. यशवंत जाधव आणि यामिनी जाधव यांचं आर्थिक उत्पन्न, गुंतवणूक व्यवहार या सगळ्याची चौकशी करण्यासाठी आपण आयकर विभाग, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, प्रवर्तन निर्देशनालय निवडणूक यांच्याकडे पाठपुरावा करत असल्याचंही सोमय्यांनी म्हटलं होतं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT