चायनीज मांजामुळे गळाच कापला; रिक्षाचालकामुळे वाचले डॉक्टरचे प्राण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

जळगाव शहरात चायनीज मांजामुळे दुर्घटना घडली. एका डॉक्टरचा मांजामुळे गळा कापला जाऊन प्रचंड रक्तस्त्राव झाला. सकाळी ११.४० च्या सुमारास ही घटना घडली. गळा कापला गेल्यानंतर डॉक्टर १० मिनिटं जागीच पडून होते. एका रिक्षाचालकाने वेळीच प्रसंगावधान दाखविल्याने त्यांचे प्राण वाचले.

ADVERTISEMENT

अमरावती येथील जवाद अहमद यांचं वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाले आहे. ते जळगावात सध्या प्रशिक्षण घेत आहे. डॉ. अहमद हे सालार नगर येथे वास्तव्यास असून, सकाळी ११ वाजेच्या सुमारास ते दुचाकीने तांबापुरा येथे जात होते.

महामार्गालगत असलेल्या रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ अडकून उडत असलेला मांजा अचानक त्यांच्या गळ्यावर आला आणि लागलीच त्यांचा गळा कापला गेला. गळा कापल्यानंतर डॉ. अहमद हे रक्तबंबाळ अवस्थेत दुचाकीसह खाली कोसळले.

हे वाचलं का?

स्वतः डॉक्‍टर असल्याने त्यांनी स्वतःची सुरक्षा लक्षात घेत रक्तस्त्राव रोखण्यासाठी गळा दाबून ठेवला. सुमारे दहा मिनिटं हा प्रकार ये-जा करणारे नागरिक पहात होते; मात्र कुणीही त्यांच्या मदतीला धावलं नाही.

यावेळी रिक्षाचालक कलीम शेख यांनी प्रसंगावधान दाखवत डॉ. अहमद यांना रिक्षातून रुग्णालयात नेले.

ADVERTISEMENT

रुग्णालयातील वैद्यकीय प्रमुख डॉ. मिनाज पटेल, नर्सिंग सुप्रिटेंडन्ट हर्षल पाटील यांच्यासह सहकाऱ्यांनी तात्काळ शस्त्रक्रिया करून रक्तस्त्राव रोखला. डॉ.अहमद यांच्या गळ्यात १ आणि गळ्यावर ११ टाके टाकण्यात आले.

ADVERTISEMENT

डॉ.अहमद यांना मोठ्याप्रमाणात रक्तस्त्राव झाला होता तसेच त्यांच्या हृदयाचे ठोके देखील कमी पडू लागले होते. वेळीच उपचार मिळाले नसते, तर त्यांचा जीव गेला असता, असं डॉ. मिनाज पटेल यांनी सांगितलं.

चायना मांजामुळे दरवर्षी देशभरात अनेकांचा जीव जात असतो. शासनाने या मांजावर बंदी घातलेली असली, तरी त्याची खुलेआम विक्री केली जातं असल्याचं चित्र आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT