जयंत पाटलांनी देवेंद्र फडणवीसांच्या वर्मावर ठेवलं बोट; साडेतीन शब्दात…

मुंबई तक

Jayant Patil reply Devendra Fadnavis :राष्ट्रवादी हा साडेतीन जिल्ह्याचा पक्ष असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. या टीकेनंतर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिले आहे.

ADVERTISEMENT

NCP is a party of three and a half districts Jayant Patil reply Devendra Fadnavis
NCP is a party of three and a half districts Jayant Patil reply Devendra Fadnavis
social share
google news

Jayant Patil reply Devendra Fadnavis : कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू असतानाच भाजप आणि राष्ट्रवादीत चांगली जुंपली असून तुफान टोलेबाजी सुरु आहे.राष्ट्रवादी हा साडेतीन जिल्ह्याचा पक्ष असल्याची खिल्ली उडवत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कर्नाटकमधून राष्ट्रवादीचा पार्सल महाराष्ट्रात पाठवून द्या, आम्ही पाहून घेऊ,असे आव्हानच दिले होते. या टीकेनंतर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिले आहे.(jayant Patil counter attack on devendra fadnavis bjp has made faujdar a constable)

देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर

काल पर्वा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री इकडे येऊन गेले. आणि त्यांनी सांगितले, राष्ट्रवादी हा साडेतीन जिल्ह्याचा पक्ष असल्याची माहिती सुरुवातीला जयंत पाटील यांनी दिली. आता हे कोणी सांगाव, जे कोणी साडेतीन जिल्ह्याचा पक्ष राष्ट्रवादी म्हणत असतील, त्यांचा भारतीय जनता पार्टीने फौजदाराचा हवालदार केलाय,आणि आता आमची माप काढत आहेत.त्याला स्वत:चे स्थान टीकवता आले नाही अशी टीका करत जयंत पाटील (Jayant Patil) यांनी फडणवीसांच्या वर्मावरच बोट ठेवलं.

हे ही वाचा : ‘राष्ट्रवादीला पॅक करून पाठवून द्या’, देवेंद्र फडणवीसांनी चढवला हल्ला

जनतेने आमचे सरकार स्विकारलं असताना, आमच्यातील लोक फोडण्याच पाप केलं, नंतर आपल्याला (देवेंद्र फडणवीसांना) मु्ख्यमंत्रिपद मिळेल असे वाटत होते. पण दिल्लीतील लोकांनी दुसऱ्यांनाच मुख्यमंत्री केले. गडचिरोली, जळगाव, भंडाऱ्यात आमचा पक्ष पसरला आहे.आमचा पक्ष साडेतीन जिल्ह्यांचा नाही आहे, असे देखील जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले आहेत.

साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष

देवेंद्र फडणवीस यांची निपाणी येथे सभा झाली. या सभेत बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्रात साडेतीन जिल्ह्यांचा एक पक्ष आहे. या पक्षाने आता इथे अख्ख्या कर्नाटकमध्ये त्यांचा एक उमेदवार दिला आहे. तो उमेदवार इथे (निपाणी) आहे. इथे येऊन हा पक्ष काय डोंबलं करणार आहे? खरं म्हणजे ही यांची मिली जुली कुस्ती आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मिली जुली कुस्ती सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पॅक करून पाठवून द्या, आम्ही पाहून घेऊ”, अशी टोलेबाजी फडणवीसांनी केली होती

हे वाचलं का?

    follow whatsapp