शिंदे गटातील शिवसेना आमदारांचा राष्ट्रवादीवर इतका राग का?; जयंत पाटलांनी सांगितलं कारण
शिवसेनेचे आमदार फुटले. बंडखोर आमदार शिंदे गटात सामील झाले, पण शिवसेनेविरोधात बंडखोरी करताना आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरही आरोप केला. शिंदे गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेसवर होणाऱ्या आरोपांना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ‘मुंबई Tak’शी बोलताना दोन मुद्दे सांगत सविस्तर उत्तर दिलं. भाजपसोबत गेल्यास स्थिर सरकार देऊ शकतो, असं मत एनसीपीतील काही नेत्यांचं होतं. तर दुसरीकडे भाजपसोबत न जाण्याबद्दलची […]
ADVERTISEMENT

शिवसेनेचे आमदार फुटले. बंडखोर आमदार शिंदे गटात सामील झाले, पण शिवसेनेविरोधात बंडखोरी करताना आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरही आरोप केला. शिंदे गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेसवर होणाऱ्या आरोपांना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ‘मुंबई Tak’शी बोलताना दोन मुद्दे सांगत सविस्तर उत्तर दिलं.
भाजपसोबत गेल्यास स्थिर सरकार देऊ शकतो, असं मत एनसीपीतील काही नेत्यांचं होतं. तर दुसरीकडे भाजपसोबत न जाण्याबद्दलची भूमिका काही नेत्यांची होती. आता दोन्ही मतांचे नेते एकत्र विचार करताहेत का आणि आता काय वाटतं?, असा प्रश्न जयंत पाटील यांना विचारण्यात आला होता.
जयंत पाटील म्हणाले, “बहुसंख्या आमदारांची अपेक्षा ही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशीच होती. कारण लोकांनी आम्हाला भाजपच्या विरोधात कौल दिलेला होता आणि मतदान केलेलं होतं. २०१९ मध्ये परिस्थिती बदलली. कोणत्याही परिस्थितीत भाजपचं सरकार येऊ नये म्हणून झालेली ती आघाडी होती. कोणत्याही अटींशिवाय आम्ही शिवसेनेला पाठिंबा दिला होता. शिवसेनेतून काही आमदार बाजूला जातील असं आम्हाला वाटलं नव्हतं. ते झालं. असं राजकारणात होत असतं. नव्या परिस्थितीत भाजपने शिवसेनेची मोडतोड करून जे बहुमत तयार केलेलं आहे. त्यामुळे हे किती दिवस एकत्र राहतात हे बघायचं”, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.
Jayant Patil :”एकनाथ शिंदे दोन-चार महिन्यांनी नितीश कुमारांसारखं करू शकतात, कारण…”










