जितेंद्र आव्हाड, किरण माने आणि सतिश राजवाडे यांच्यात भेट, जाणून घ्या आजच्या बैठकीत काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

स्टार प्रवाह चॅनलवर मुलगी झाली हो या मालिकेत विलास पाटील ही भूमिका साकारणारा अभिनेता किरण मानेला काही दिवसांपूर्वी मालिकेतून तडकाफडकी काढून टाकण्यात आलं होतं. राजकीय भूमिका घेतो म्हणून मालिकेतून काढून टाकण्यात आल्याचा आरोप किरण मानेने केला होता. या आरोपांना स्पष्टीकरण देताना स्टार प्रवाह वाहिनीने किरण मानेने सेटवरील महिला कलाकारांसोबत अरेरावीने वागत गैरवर्तन केल्याचं स्पष्टीकरण दिलं. या वादात आता राजकीय नेत्यांनीही उघड घेतली आहे.

ADVERTISEMENT

राष्ट्रवादी काँग्रेससह सर्वच प्रमुख पक्षांनी किरण मानेंची बाजू घेतली आहे. आज गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ठाणे येथील कार्यालयात किरण माने, स्टार प्रवाह वाहिनीचे प्रमुख सतीश राजवाडे आणि आव्हाड यांच्यात बैठक झाली. या बैठकीनंतर आव्हाडांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत या प्रकरणात लवकरात लवकर समेट घडवून योग्य तो निर्णय घेतला जावा अशी भूमिका मांडली आहे.

माझ्याविरोधात षडयंत्र रचलं जातं आहे, वेळ आल्यावर मी पण पुरावे बाहेर काढेन-किरण माने

हे वाचलं का?

किरण माने हा गरीब शेतकरी कुटुंबातून मुंबईसारख्या शहरात लढायला आलेला मुलगा आहे. त्याच्यावर मी अन्याय होऊन देणार नाही. मालिकेतील एका स्त्री ने त्याच्यावर गैरवर्तनाचा आरोप केला आहे. पण बाकीच्या स्त्रियांनी त्याची बाजू घेतली आहे. त्यामुळे आता या सगळ्या वादाला कोणताही रंग न लावता प्रॉडक्शन हाऊस आणि स्टार प्रवाह वाहिनीने एकत्र बसून यावर तोडगा काढावा. हा तोडगा काढताना कोणावरही अन्याय होणार नाही, हीच माझी भूमिका असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

महिला कलाकारांशी गैरवर्तनाचा आरोप झाल्यानंतर आता किरण मानेंची नवी पोस्ट चर्चेत

ADVERTISEMENT

आजच्या बैठकीत सतीश राजवाडे यांनी काय बाजू मांडली असा प्रश्न विचारला असता, आव्हाडांनी सावध प्रतिक्रीया दिली. “सतिश राजवाडे यांनी आपण या सगळ्याबाबत अनभिज्ञ असल्याचे म्हटले. मला प्रॉडक्शन हाऊसने किरण माने यांना मालिकेतून काढल्याचे कळवले. त्याउपर मला काहीही माहिती नसल्याचे राजवाडे यांचे म्हणणे आहे. मला यावर फार काही बोलायचे नाही. पण प्रॉडक्शन हाऊसने एखाद्याला नोकरीवरुन काढताना त्याला किमान समज दिली पाहिजे. एका दिवसात नोकरी जाणं हे वेदनादायी आणि अचानक ओझं वाढवणारं असतं”, असं आव्हाड म्हणाले.

ADVERTISEMENT

‘कोणाच्या भाकरीवर टाच आणणार असाल तर ते योग्य नाही’, किरण मानेंच्या समर्थनार्थ राजकीय नेते मैदानात

‘मुलगी झाली हो’ ही चांगली मालिका आहे. किरण माने यांचं पात्रही लोकप्रिय आहे. त्यामुळे ही मालिका बंद होऊ नये, हीच आमची इच्छा असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.

आरोग्य भरती, म्हाडा, टीईटी परीक्षा अन् कोट्यवधींचा भ्रष्टाचार; पोलिसांना आतापर्यंत काय सापडलं?

लढाईत विचार करुन उतरलोय, मागे हटणार नाही – आव्हाड

गरिबी काय असते, बापाची नोकरी गेल्यावर काय होतं, हे मी फार जवळून पाहिलं आहे. त्यामुळे मी या वादात फक्त एका गरिबाची बाजू घेतोय. हे भांडण मिटवा, एकत्र व्हा आणि चांगली मालिका सुरु राहू द्या. मी चित्रपट किंवा नाट्यसृष्टीशी संबंधित नाही. पण हे प्रकरण माझ्यापर्यंत पोहोचवण्यात आले. किरण माने यांच्यावरील टीकेचा स्रोत पाहिल्यानंतर मी या लढाईत उतरण्याचा निर्णय घेतला. मी एकदा भूमिका घेतली की पाय मागे घेत नाही. माझ्या गेल्या ३५ वर्षांतील राजकीय आयुष्यात असं कधीच घडलेलं नाही. मी विचार करुनच भूमिका घेतो आणि एकदा भूमिका घेतली तर मागे हटत नाही, असेही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT