इतक्या प्रगल्भ माणसानं असं बोलणं अपेक्षितच नाही; आव्हाडांचा फडणवीसांना टोला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

श्रेयवादाच्या राजकारणावरून मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीतील पक्षांचा नामोल्लेख न करता लक्ष्य केलं होतं. फडणवीसांनी केलेल्या टीकेला आज गृहनिर्माण मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं.

ADVERTISEMENT

सध्या कल्याण डोंबिवली महानगर पालिकेची निवडणूक जवळ आल्याने सर्व राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आपली ताकत दाखवण्यास सुरुवात केली आहे. आज डोंबिवलीमधील राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष सुधीर पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आलं.

संजय राऊत सोमय्यांना म्हणाले XX; चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंना दिला सल्ला

हे वाचलं का?

आव्हाड यांनी पत्रकारांशी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. त्याचबरोबर श्रेयवादाची लढाई ठाण्यात आहे, असं मला कधी दिसलेल नाही, असंही ते म्हणाले.

“कुणाच्या घरी लग्न असेल तर त्याचं श्रेय घेतात आणि कुणाच्या घरी मुलगा झाला, तरी आमच्याच प्रेरणेतून झाला असं म्हणत श्रेय घेण्याचा प्रयत्न अनेकांचा असतो”, असा चिमटा देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सुरु असलेल्या राजकारणातील श्रेयावादाच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना शनिवारी काढला होता.

ADVERTISEMENT

…तर त्यांना भोगावं लागेल; उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर केसीआर यांचा भाजपला इशारा

ADVERTISEMENT

देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या टीकेला आज राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिलं. “त्यांच्यासारख्या प्रगल्भ माणसानं असं काहीतरी बोलावं हे अपेक्षित नाही. श्रेयवादाची लढाई ठाण्यात आहे, असं मला कधी दिसलेलं नाही. राजकारणात कार्यकर्त्यांचा हुरूप वाढवण्यासाठी असं बोलावं लागत”, असं आव्हाड म्हणाले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT