School Reopen: शाळा सुरु करण्याबाबत अजित पवार म्हणाले, हा तर…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे: राज्यातील सर्व शाळा कधी सुरु (School reopen) होणार याबाबत अद्यापही राज्य स्तरावर संभ्रम कायम आहे. कारण सध्या याबाबतचा निर्णय हा जिल्हाधिकारी आणि महापालिका प्रशासनावरच सोपवण्यात आला होता. यामुळे काही ठिकाणी शाळा सुरु तर काही ठिकाणी बंद असल्याचं पाहायला मिळत आहे. पण आता याबाबत बुधवारी (15 डिसेंबर) होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत थेट राज्य स्तरावर निर्णय घेतला जाईल. अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे. ते पुण्यातील (Pune) कोरोना आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधत होते.

ADVERTISEMENT

पाहा अजित पवार काय म्हणाले:

‘शाळा सुरु करण्याबाबत राज्य स्तरावर निर्णय घेतला जाईल’

हे वाचलं का?

‘शाळांबाबतचा निर्णय हा राज्य स्तरावरचा आहे. मधल्या काळामध्ये नवीन आणि आकस्मित आलेल्या Omicron विषाणूमुळे सगळे बॅकफूटला गेले. मीडियात देखील याची चर्चा खूप झाली. त्यामुळे याचा थोडा अंदाज घेऊ. कारण मुलांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. त्यांचा जीवनाचा-अभ्यासाचा प्रश्न आहे.’

‘दरम्यान, बुधवारी कॅबिनेटची बैठक होईल. तिथे राज्याचे मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री असतील. त्यामुळे त्याठिकाणी आम्ही योग्य तो निर्णय घेऊ. पण मागच्या वेळेस काहींनी असं सुतोवाच केलं की, हा तिथल्या-तिथल्या स्थानिकांना अधिकार द्यावा की, काय करावं ते. पण त्यातही मतप्रवाह आहे.’

ADVERTISEMENT

‘दरम्यान, स्थानिकांमंध्ये जर चार जणांमध्ये तीन लोकांचं एकमत आणि एका व्यक्तीचं वेगळं मत आलं तर पुन्हा तिथे वाद होण्यापेक्षा हा राज्य स्तरावरच निर्णय घेतलेला जास्त चांगला. तर तो आम्ही आढावा घेऊन त्यासंबंधी निर्णय घेऊ.’ असं म्हणत अजित पवार यांनी स्पष्ट केलं की, येत्या कॅबिनेट बैठकीत शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेतला जाईल.

ADVERTISEMENT

‘…म्हणून आम्हाला काही निर्णय बदलावे लागले’

‘आपण काही निर्णय घेतले पण त्यात काही बदल करावे लागले. पण असं म्हटलं गेलं की, बघा निर्णय बदलले जातात. पण कसं आहे. त्या-त्या परिस्थितीनुसार आपण निर्णय घेत आहोत. कारण हा मनुष्याच्या जीवनाशी संबंधित प्रश्न आहे.’

‘आपल्या इथे येणाऱ्या डोमॅस्टिक किंवा इंटरनॅशनल फ्लाइटने येणाऱ्यांची आरटीपीसीआर घेतली पाहिजे असा निर्णय घेण्यात आला होता. पण केंद्र सरकार आणि वरिष्ठ पातळीवर अशी चर्चा झाली की, असं कसं करता? देश पातळीवर सगळ्या एअरपोर्टला वेगळा न्याय आणि महाराष्ट्रातल्या एअरपोर्टला वेगळा न्याय त्यामुळे आम्ही जो निर्णय जारी केला होता तो मागे घेतला. अशाही गोष्टी झाल्या.’

‘त्यानंतरही आम्ही केंद्र सरकारला कळवलं की, आजही काही देशात ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून येत आहेत. उद्या ते रुग्ण आपल्याकडे येऊ नये. आले तर आपल्याला त्याबाबत माहित असावं. कारण त्यांच्यावर आपल्याला तात्काळ उपचार आणि इतर संबंधित गोष्टी करता येतील.’ असंही अजित पवार यावेळी म्हणाले.

आता बूस्टर डोसही दिला जाणार?

दरम्यान, यावेळी बूस्टर डोसबाबत देखील अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. ज्याबाबत अजित पवार म्हणाले की, ‘बूस्टर डोसबाबत आता झालेल्या बैठकीत टास्क फोर्सचे प्रमुख कदम यांनी काही सुतोवाच केलं आहे. पहिल्यांदा आम्ही दोन्ही डोस सगळ्यांना कसे मिळतील ते पाहतोय. कारण दोन्ही डोस घेतलेल्यांना त्यामध्ये फार काही विषाणूचा त्रास होत नाही हे आता बऱ्याच अंशी सिद्ध झालं आहे.’

‘काही अशीही प्रकरणं पुढे आलेली आहेत. ज्या भागात बूस्टर डोस दिले गेलेले आहेत तिथे तर त्यांना एकदम माइल्ड त्रास त्या ठिकाणी झालेला आहे. पण बूस्टर डोस द्यायचा म्हटल्यानंतर देश पातळीवर तो निर्णय घेतला गेला पाहिजे. कारण देशाच्या पंतप्रधानांनी आणि केंद्र सरकारने दोन डोस देण्याचा निर्णय घेतला आहे.’

Omicron Variant : ‘ओमिक्रॉन’मुळे शाळा सुरू करण्याचा निर्णय लांबणार?; टोपेंनी दिली माहिती

‘आता तिसरा डोस घ्यायचं म्हटलं तर माझ्या माहितीप्रमाणे सीरम इन्सिट्यूटकडे ते उपलब्ध आहे. आता तर त्यांच्याकडे जास्त मागणी नसल्याने प्रोडक्शन सुद्धा कमी केलं आहे. त्यामुळे सगळी परिस्थिती पाहून निर्णय घेतला जावा.’ असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT