कंगना राणौतकडून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात राज्य सरकारवर विरोधकांकडून नेहमी ताशेरे ओढले जातात. यावेळी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी सातत्याने विरोधकांकडून करण्यात येते. तर आता अभिनेत्री कंगना राणावतने देखील महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू व्हायला हवी अशी मागणी केलीये.

ADVERTISEMENT

कंगनाने ट्विटरद्वारे तिची ही मागणी व्यक्त केलीये. दिग्दर्शक हंसल मेहता यांनी ट्विटरवरुन महाराष्ट्रात राष्ट्रपती लागू होईल का असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यांच्या या प्रश्नाला उत्तर देताना कंगनाने महाराष्ट्रात खरं तर राष्ट्रपती राजवट लागू करायला हवी असं म्हटलंय. या ट्विटच्या माध्यमातून कंगनाने पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

कंगना तिच्या ट्विटमध्ये म्हणते, “खरंतर लागू करायला हवी. हंसल सर तुम्ही लवकरच संघी होणार आहात. तुम्ही एक तर्कसंगत विचार करणारे व्यक्ती आहात. माझ्यासारख्या लोकांच्या संगतीमुळे तुमच्या मनात कमळ फुलेल तसंच तुम्ही भक्त व्हाल. त्यानंतर आपण एकत्र सदगुरुंच्या आश्रमात जाऊ नाहीतर कैलास तीर्थयात्रेला जाऊ.”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT