बालकावर अनैसर्गिक अत्याचार, डोळे काढले अन्…; आरोपींची कबुली ऐकून पोलिसांना फुटला घाम

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. एका 10 वर्षाच्या चिमुकल्यावर क्रूर अत्याचार करण्यात आले असून, याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपी मुलाला रस्त्यावरून उचलून घेऊन गेले आणि क्रूरतेचा कळसच गाठला. अनैसर्गिक अत्याचार आणि अन्ववित छळ करून आरोपींनी मुलाची हत्या केली.

ADVERTISEMENT

8 फेब्रुवारी रोजी झालेल्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपी मयत मुलाच्या गावातीलच आहेत. अटक केल्यानंतर आरोपींनी घटनाक्रम सांगितला. बालकांवर करण्यात आलेल्या अत्याचार ऐकताना पोलिसांनाही घाम फुटला.

लग्नाचं आश्वासन देऊन अल्पवयीन मुलीसोबत वर्षभर शारीरिक संबंध, अन् नंतर…

हे वाचलं का?

या प्रकरणातील मुख्य आरोपी बिल्ली याने कबूली जबाब नोंदवताना हसत हसतच सांगितलं की, ‘मला सोडून द्या मला सोडून असं बालक म्हणत होता. मला या कृत्य केल्याबद्दल अजिबात पश्चाताप नाही.’

कानपूरमधील नर्वल परिसरात 8 फेब्रुवारी रोजी क्रूर अत्याचार करून बालकाची हत्या करण्यात आली होती. 8 फेब्रुवारी रोजी बालकाचा मृतदेह निर्वस्त्र अवस्थेत आढळून आला होता. या प्रकरणात पोलिसांनी आता तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

ADVERTISEMENT

फ्री फायर मोबाइल गेमच्या माध्यमातून आधी ओळख, त्यानंतर बदलापूरच्या अल्पवयीन मुलीचं अपहरण

ADVERTISEMENT

ग्रामीण पोलिसांनी बालकाच्या हत्येप्रकरणी बालकाच्या गावातीलच बिल्ली, चंदन आणि बबलू यांना पुराव्यांच्या आधारे अटक केली आहे. पोलिसांकडे फॉरेन्सिक पुरावे असून, या तिघांनी मुलांवर अनैसर्गिक अत्याचार केले. त्यानंतर त्याच्या डोळ्यात खिळे ठोकले आणि मुलांच्या गुद्दद्वारात लाठी टाकली’, असं कानपूरचे अतिरिक्त आयुक्त आदित्य शुक्ला यांनी सांगितलं.

या घटनेचा कट बिल्ली नावाच्या आरोपीने रचल्याचं पोलिसांनी सांगितलं. सोमवारी बिल्ली चंदनसोबत शेतात काम करत होता. तिथे बबलूही आला. त्याचवेळी त्यांना टायरसोबत खेळत असलेला मुलगा दिसला. बिल्ली आणि चंदन त्या मुलाला शेतात घेऊन आले. आरोपींनी आधी दारू पिली आणि त्यानंतर मुलावर अत्याचार केले.

बलात्कार पीडितेचं जगणं झालंय मुश्कील, ‘तो’ Video व्हायरल झाल्याने 5 वर्षापासून पीडिता घरातच

आरोपीने पोलीस चौकशीत सांगितलं की, बिल्ली आणि चंदनने अत्याचार केले. मी फक्त बघत होतो. मी ज्यावेळी तिथे पोहोचलो, त्यावेळी दोघे मुलावर अत्याचार करत होते. त्यानंतर बिल्लीने मुलाच्या गुदद्वारात लाठी टाकली, असं आरोपी बबलूने सांगितलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT