मुलाने वडिलांची हत्या करुन मृतदेहाचे ३० तुकडे बोअरवेलमध्ये फेकले
बागलकोट : मुंबईतील श्रद्धा वालकरच्या हत्येने संपूर्ण देश हादरला. या प्रकरणात अफताबने केवळं प्रियसीची हत्याच केली नाही तर तिच्या मृतदेहाचे तब्बल ३५ तुकडे करुन ते दिल्लीच्या विविध भागात फेकून दिले. अशाच प्रकारची आणखी एक भयंकर घटना आता कर्नाटकमधून समोर येत आहे. या प्रकरणात अवघ्या २० वर्षीय निर्दयी मुलानं स्वतःच्या वडिलांची हत्या करुन त्या मृतदेहाचे ३० […]
ADVERTISEMENT
बागलकोट : मुंबईतील श्रद्धा वालकरच्या हत्येने संपूर्ण देश हादरला. या प्रकरणात अफताबने केवळं प्रियसीची हत्याच केली नाही तर तिच्या मृतदेहाचे तब्बल ३५ तुकडे करुन ते दिल्लीच्या विविध भागात फेकून दिले. अशाच प्रकारची आणखी एक भयंकर घटना आता कर्नाटकमधून समोर येत आहे. या प्रकरणात अवघ्या २० वर्षीय निर्दयी मुलानं स्वतःच्या वडिलांची हत्या करुन त्या मृतदेहाचे ३० तुकडे बोअरवेलमध्ये फेकल्याचं निदर्शनास आलं आहे.
ADVERTISEMENT
६ डिसेंबर रोजी ही घटना घडली असून ‘परशुराम’ असं मृत पित्याचं नाव आहे. तर तपासाअंती सोमवारी १२ डिसेंबर रोजी संबंधित मुलाला अटक करण्यात आली असून ‘विठ्ठल’ असं त्याचं नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यात मुधोळ परिसरात विठ्ठल त्याचे वडील परशुराम आणि कुटुंबिय राहत होते. मात्र परशुरामच्या दारुच्या सवयीनं कुटुंबीय त्रस्त होते. त्यातही तो दारु पिऊन नशेत मुलगा विठ्ठलला मारहाण करत असे. त्यादिवशीही दारूच्या नशेत परशुरामनं विठ्ठलाला पुन्हा मारहाण केली. या गोष्टीचा विठ्ठलाला प्रचंड राग आला.
हे वाचलं का?
रागाच्या भरात विठ्ठलने वडिल परशुरामला रॉडने मारायला सुरुवात केली, या मारहाणीत एक घाव वर्मी बसला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी विठ्ठलने तयारी सुरु केली. त्याने परशुरामचा मृतदेह मुधोळ शहराच्या हद्दीत असलेल्या त्याच्या शेतातील बोअरवेलमध्ये टाकण्याचं ठरवलं. त्यानं तसा प्रयत्नही केला. मात्र तो त्यात यशस्वी झाला नाही.
त्यानंतर विठ्ठलनं दुसऱ्या मार्गाचा विचार सुरु केला. त्यानं एका धारदार शस्त्राची व्यवस्था करुन मृतदेहाचे तुकडे करण्यास सुरुवात केली. अथक प्रयत्नांनंतर त्यानं तब्बल ३० तुकडे केले आणि शेतातील बोअरवेलमध्ये फेकून दिले. मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर त्यानं काही वेळ आराम केला आणि घटनास्थळावरुन फरार झाला. मात्र शनिवारी तो घरी परतला. त्यावेळी वडिलांशी झालेल्या किरकोळ भांडणामुळे आपण घरातून निघून गेल्याचं त्यानं सांगितलं.
ADVERTISEMENT
विठ्ठलला वडिलांबद्दल विचारल्यानंतर त्याने काही कल्पना नसल्याचं कुटुंबियांना सांगितलं. पाच दिवस झाल्यानंतरही परशुराम माघारी न परतल्यानं कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार केली. तपास सुरु केल्यानंतर मित्र, नातेवाईक, शेजाऱ्यांना विचारणा झाली, मात्र हाती काहीचं लागलं नाही. पण जस जसा तपास पुढे सरकत होता तसं तसं पोलिसांचा विठ्ठलवरील संशय वाढत होता. त्याआधारे पोलिसांनी सोमवारी विठ्ठलला चौकशीसाठी ताब्यात घेतलं.
ADVERTISEMENT
आधी काहीच माहित नसल्याचं दाखवणारा विठ्ठल पोलिसी खाक्या दाखवताच पोपटासारखा बोलू लागला. त्याने परशुरामच्या हत्येची कबुली दिली, तसंच हत्या कशी केली आणि मृतदेहाचे तुकडे करून विल्हेवाट कशी लावली याबद्दल पोलिसांना माहिती दिली. त्यावरून पोलिसांनी जेसीबी मशिनने शेतात खोदकाम केलं. खोदकाम सुरू असताना पोलिसांनी परशुरामच्या मृतदेहाचे काही तुकडे जप्त केले.त् यानंतर पोलिसांनी तातडीने आरोपी विठ्ठलला अटक केली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT