Karuna Sharma-धनंजय मुंडे प्रकरणी पंकजा मुंडे यांची पहिल्यांदाच प्रतिक्रिया, म्हणाल्या…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

करूणा शर्मा प्रकरणावर पंकजा मुंडे यांनी आजवर काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती. जेव्हा हे प्रकरण चर्चेत होतं तेव्हाही पंकजा मुंडे काहीही म्हणाल्या नव्हत्या. त्यांनी या सगळ्या प्रकरणावर मौन बाळगलं होतं. आता मात्र पंकजा मुंडे यांनी ट्विट करून या प्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे. दोन दिवसांपूर्वीच करूणा शर्मा या बीडमध्ये आल्या होत्या. त्यांच्या कारमध्ये पिस्तुल सापडल्या प्रकरणी त्यांना अटक झाली. तसंच त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. आता या प्रकरणी पहिल्यांदाच पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाल्या आहेत पंकजा मुंडे?

अन्याय चुकीच्या लोकांच्यात ताकद असल्यामुळे होतो असे नाही पराक्रमी हात बांधून बसतात म्हणून होतो.शासन,प्रशासन,न्यायव्यवस्था कोणी आपल्या दारात नाही बांधू शकत हा विश्वास हरवू नये. Wrong President Should not be set! ही काळाची गरज आहे,परळी सुन्न आहे मान खाली गेली आहे राज्याची !!

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

करूणा शर्मा आणि धनंजय मुंडे प्रकरण हे जानेवारी महिन्यात राज्यात चांगलंच गाजलं होतं. धनंजय मुंडे यांच्यावर एका मुलीने लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. त्यानंतर करूणा शर्मा यांच्यासोबत असलेले आपले संबंध हे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना सोशल मीडियावर मान्य करावे लागले होते. हे सगळं प्रकरण आता कोर्टात आहे, त्यामुळे याबाबत मीडियाने प्रसिद्धी देऊ नये या आशयाचं एक पत्रही धनंजय मुंडेंच्या वकिलांमार्फत मीडियाला पाठवण्यात आलं होतं.

धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर भाजपकडून सावध प्रतिक्रिया आल्या होत्या. मात्र धनंजय मुंडे यांच्या चुलत भगिनी असलेल्या आणि भाजप नेत्या असलेल्या पंकजा मुंडे यांनी यावर मोघम अशी प्रतिक्रिया देण्याशिवाय कोणतीही सविस्तर प्रतिक्रिया दिली नव्हती. आता मात्र त्यांनी परळीची मान शरमेने खाली गेली असं म्हणत पहिल्यांदाच करूणा शर्मा आणि धनंजय मुंडे प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या ट्विटरमध्ये पंकजा मुंडे यांनी कुठेही धनंजय मुंडे यांचं किंवा करूणा शर्मा यांचं नाव घेतलेलं नाही. मात्र ही जी प्रतिक्रिया दिली आहे ती याच प्रकरणावर आहे हे त्यातल्या ओळीच सांगत आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT