विकी कौशल-कतरिनाचा साखरपुडा खरंच झाला का?; कतरिनाच्या टीमनेच केला खुलासा
अनेक दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्या रिलेशनशिपची चर्चा होत आहे. दोघेही या रिलेशनशिपबद्दल बोलले नाही; पण अनेक कार्यक्रमांना व पार्ट्यांमध्ये ते एकत्र दिसले आहेत. विकी आणि कतरिना एकमेकांना वर्षभरापासून डेट करत असल्याची चर्चा आहे. अलिकडेच ‘शेरशाह’ चित्रपटाच्या प्रीमिअरलाही दोघं एकत्र दिसले. यामुळे चाहत्यांचं त्यांच्यातील रिलेशिपकडे लक्ष वेधलं गेलं. दरम्यान, आता […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
अनेक दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्या रिलेशनशिपची चर्चा होत आहे.
हे वाचलं का?
दोघेही या रिलेशनशिपबद्दल बोलले नाही; पण अनेक कार्यक्रमांना व पार्ट्यांमध्ये ते एकत्र दिसले आहेत.
ADVERTISEMENT
विकी आणि कतरिना एकमेकांना वर्षभरापासून डेट करत असल्याची चर्चा आहे.
ADVERTISEMENT
अलिकडेच ‘शेरशाह’ चित्रपटाच्या प्रीमिअरलाही दोघं एकत्र दिसले. यामुळे चाहत्यांचं त्यांच्यातील रिलेशिपकडे लक्ष वेधलं गेलं.
दरम्यान, आता विकी आणि कतरिनाच्या साखपुड्याची बातमी सोशल मीडियावर चर्चिली जात आहे.
विरल भयानीच्या पोस्टनुसार त्यांनी गुपचूप साखरपुडा केल्याचे म्हटले आहे.
चर्चा होत असली तरी विकी आणि कतरिनाने त्यांच्या साखरपुड्याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.
‘कतरिना आणि विकीच्या साखपुड्याची चर्चा सुरू आहे. तरीही त्यांनी अधिकृतपणे सांगण्याची वाट पाहूया’, विरल भयानीनं म्हटलेलं आहे.
अभिनेत्री सोनम कपूरचा भाऊ आणि अभिनेता हर्षवर्धन कपूरने एका मुलाखतीमध्ये कतरिना आणि विकीच्या नात्याबद्दल माहिती दिली होती.
‘विकी आणि कतरिना हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत. हे खरे आहे’, असं तो म्हणाला होता.
‘पण आता हे सांगितल्यावर मला कोणत्या समस्येचा सामना करावा लागेल का ते माहीत नाही’, असंही त्यानं म्हटलं होतं.
विकी कौशलने नुकतेच कतरिनाची तिच्या घरी भेट घेतल्याचं वृत्तही ‘ई टाइम्स’ने दिले होते.
दोघांचा साखरपुरडा झाल्याच्या चर्चा होत असल्या तरी त्याबद्दल फारसं चित्र स्पष्ट नव्हतं.
या सगळ्या चर्चांना कतरिनाच्या टीमने पूर्णविराम दिला आहे.
साखरपुडा केल्याच्या चर्चा खोट्या असल्याचं कतरिनाच्या टीमने म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT