Unlock News : कल्याण-डोंबिवलीचा दुसऱ्या लेव्हलमध्ये समावेश, नवीन नियम लागू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाउनचा सामना करत असलेल्या कल्याण-डोंबिवलीसाठी आनंदाची बातमी आली आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यात महापालिका प्रशासनाला काही प्रमाणात यश आल्यानंतर कल्याण-डोंबिवली शहराचा दुसऱ्या लेव्हलमध्ये समावेश करण्यात आला आहे. महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी शहरासाठी नव्या नियमांची घोषणा केली आहे.

ADVERTISEMENT

सोमवारपासून शहरात निर्बंध काही प्रमाणात शिथील करण्यात येणार असून शहरातील कोरोना रुग्णांचा पॉजिटीव्हीटी दर आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता या दोन गोष्टींच्या निकषावरुन कल्याण डोंबिवलीचा समावेश दुसऱ्या लेव्हलमध्ये करण्यात आला आहे.

सोमवारपासून शहरात अशा पद्धतीने असतील निर्बंध –

हे वाचलं का?

  • दुकाने आणि अत्यावश्यक सेवेतील आस्थापना नियमितपणे सुरू राहणार

  • मॉल्स, नाट्यगृह, थिएटर, (मल्टिप्लेक्स, सिंगल स्क्रीन) 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी

  • ADVERTISEMENT

  • रेस्टॉरंटही 50 टक्के आसन क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी

  • ADVERTISEMENT

  • जीम, सलुन, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर ५० टक्के क्षमतेने परवानगी,

  • लोकल ट्रेन केवळ अत्यावश्यक आणि वैद्यकीय सेवेसाठी खुली

  • सार्वजनिक ठिकाणे, मैदाने, चालणे, सायकलिंग नियमित सुरू

  • खासगी कार्यालये संपूर्ण खुली ठेवण्यास मान्यता

  • सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमांना ५० टक्के उपस्थिती

  • लग्नसमारंभ हॉलच्या 50 टक्के क्षमतेने किंवा जास्तीत जास्त 100 व्यक्तींना परवानगी

  • अंत्यविधीसाठी उपस्थितीचे कोणतेही बंधन नाही

  • जमावबंदी लागू असणार

  • ADVERTISEMENT

      follow whatsapp

      ADVERTISEMENT