सोमय्यांनी राणेंवर केलेले आरोप कुठे गेले?; अंजली दमानियांचा सवाल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिवसेना-भाजपतील राजकीय वैर दिवसेंदिवस विकोपाला जात असल्याचं दिसत आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्यांसह भाजपवर गंभीर आरोप केले. त्यानंतर आज केंद्रीय मंत्री नारायण राणे पत्रकार परिषदेत संजय राऊतांवर निशाणा साधला. राणेंच्या टीकेला लागलीच शिवसेनेकडून उत्तर देण्यात आलं. शिवसेना-भाजपतील सघर्ष सुरू असताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आता किरीट सोमय्यांनी राणेंवर केलेल्या आरोपांचा मुद्दा उपस्थित केला आहे.

ADVERTISEMENT

शिवसेना विरुद्ध भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष शिगेला पोहोचला आहे. केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापराचा आणि किरीट सोमय्यांकडून केल्या जाणाऱ्या आरोपांवरून खासदार संजय राऊत यांनी टीकास्त्र डागलं. राऊतांनी सोमय्या यांच्यावर पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी गंभीर आरोप केला. त्याचबरोबर भाजपच्या नेत्यांवरही त्यांनी धमकीचा आरोप केला. राऊतांच्या टीकेला केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी पत्रकार परिषदेतून उत्तर दिलं.

नारायण राणे यांची पत्रकार परिषद होत नाही, तोच शिवसेनेकडून ‘लाव रे तो व्हिडीओ’ स्टाईलमध्ये राणेंवर हल्लाबोल करण्यात आला. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर किरीट सोमय्यांनी केलेल्या आरोपांचं काय झालं? असा सवाल उपस्थित केला. त्याचबरोबर ईडीच्या संचालकांना विचारणार असल्याचंही राऊत म्हणाले.

हे वाचलं का?

शिवसेनेचा ‘लाव रे व्हिडिओ’, मोदींवर टीका करणारे राणेंचे जुने व्हिडिओच दाखवले!

विनायक राऊत यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्वीट करत भाजपला सवाल केला आहे. “विनायक राऊत यांच्याबद्दल मला तिळमात्रही आदर किंवा सहानुभूती नाही, पण आज त्यांनी जी प्रेस घेतली ती अतिशय योग्य होती. सोमय्यांनी राणेंवर केलेले आरोप कुठे गेले? त्यानंतर नारायण राणे यांनी केलेली मोदींवर टीका व नितेश राणे यांचे video आपल्याला त्यांचे खरे रंग दाखवते. एका माळेचे मणी”, असं दमानिया यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

‘साहेबांचे आणि उद्धवचे मी कपडे उतरवेन, असं राऊत म्हणालेले’, राणेंचा खळबळजनक दावा

ADVERTISEMENT

नारायण राणे यांच्या पत्रकार परिषदेनंतर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्यांनी राणेंवर केलेल्या आरोपांचा मुद्दा उपस्थित केला. नारायण राणे यांनी १०० बोगस कंपन्या तयार केल्याचा आरोप सोमय्यांनी राणेंवर केलेला आहे. त्याचबरोबर राणे यांच्या पत्नींच्या नावे असलेल्या घराबद्दल सोमय्यांनी आरोप केलेला आहे. या सगळ्या आरोपांचं काय झालं? याबद्दल ईडीकडे विचारणा करणार आहोत, असं विनायक राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT