किरीट सोमय्यांना नवाब मलिक म्हणाले ‘भाजपची आयटम गर्ल’; सोमय्या काय म्हणाले होते?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्यात आरोप-प्रत्यारोपांची राजकीय रणधुमाळी जोरात सुरू आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष विरुद्ध भाजप असा कलगीतुरा रंगला आहे. यात आता राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या शाब्दिक फैरी झडताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी मलिकांना गिफ्ट देणार असं म्हणणाऱ्या सोमय्यांवर मलिकांनी आयटम गर्ल म्हणत निशाणा साधला आहे.

ADVERTISEMENT

महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमधील मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या किरीट सोमय्यांनी काही दिवसांपूर्वी अल्पसंख्याक मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याबद्दल एक विधान केलं होतं. त्यावरून मलिकांनी आता किरीट सोमय्यांना लक्ष्य केलं आहे.

‘चित्रपट चालण्यासाठी जशी आयटम गर्लची गरज पडते. मला वाटतं राजकारणातही किरीट सोमय्या हे भाजपच्या आयटम गर्लसारखं राजकारण करत आहेत. बातमी कशी होईल, त्यासाठी आयटर्म गर्लचा कार्यक्रम सुरु आहे’, अशा शब्दात मलिकांनी सोमय्यांवर निशाणा साधला. ते माध्यमांशी बोलत होते.

हे वाचलं का?

किरीट सोमय्या मलिकांना काय म्हणाले होते?

काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्यांनी मलिकांना गिफ्ट द्यायचं म्हटलं होतं. सोमय्या म्हणाले होते की, ‘नवाब मलिक यांना मला काहीतरी भेट (गिफ्ट) द्यायचं आहे. त्यांनी गेल्या महिन्यात असं सांगितलं की, बीड जिल्ह्यात देवस्थानांची जमीन कुणाला तरी दिली गेली आणि त्याची चौकशी करणार आहेत.’

ADVERTISEMENT

‘खरंतर देवस्थानांची जमीन धनंजय मुंडे यांनी खाल्ली. पण आता रायगडमधील कर्जत येथे देवस्थानच्या जमिनीचा सातबारा माझ्या हातात आला आहे. मी त्याची खात्री करून घेणार आहे. या देवस्थानची जमीन या व्यक्तीकडे कशी गेली याची चौकशी झाली पाहिजे,’ असं सोमय्या म्हणाले होते.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT