संजय राऊतांनी केलेल्या घोटाळ्याच्या आरोपाला सोमय्यांचं उत्तर; म्हणाले ‘स्वागतच आहे’
शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले. किरीट सोमय्या यांच्या मुलांच्या बांधकाम कंपनीत पीएमसी बँकेच्या घोटाळ्यातील पैसा लागलेला असल्याचं राऊतांनी म्हटलं आहे. मुलुंडचा दलाल असा शब्द वापरत राऊतांनी सोमय्यांवर हल्लाबोल केला. राऊतांकडून करण्यात आलेल्या आरोपांवर आता किरीट सोमय्या यांनी खुलासा केला आहे. शिवसेनेला महत्त्वाची […]
ADVERTISEMENT
शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले. किरीट सोमय्या यांच्या मुलांच्या बांधकाम कंपनीत पीएमसी बँकेच्या घोटाळ्यातील पैसा लागलेला असल्याचं राऊतांनी म्हटलं आहे. मुलुंडचा दलाल असा शब्द वापरत राऊतांनी सोमय्यांवर हल्लाबोल केला. राऊतांकडून करण्यात आलेल्या आरोपांवर आता किरीट सोमय्या यांनी खुलासा केला आहे.
ADVERTISEMENT
शिवसेनेला महत्त्वाची असलेली आणि भाजपनं लक्ष्य केंद्रित केलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेनेतील राजकीय वाद दिवसेंदिवस विकोपाला जाताना दिसत आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्याकडून सातत्याने शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या विविध नेत्यांवर आणि मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहे. त्यातच आता खासदार संजय राऊत यांच्याभोवतीही ईडीची मिठी पडताना दिसत असून, राऊतांनी या सगळ्या प्रकरणावरून आज पत्रकार परिषद घेतली.
“ईडीने बिल्डरांकडून गोळा केलेले पैसे नरेंद्र मोदी, अमित शाहांना दिलेत का?”
हे वाचलं का?
राऊतांनी भाजपच्या नेत्यांनी सत्तांतर करण्यासाठी मदत करा अन्यथा केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमांतून टाईट करू अशी धमकी दिल्याचा दावा करत राऊतांनी किरीट सोमय्यांवरही निशाणा साधला. मुलूंडचा भXवा असा उल्लेख करत राऊतांनी सोमय्यांवर पीएमसी बँक आणि पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणावरून आरोप केले आहेत.
काय म्हणाले किरीट सोमय्या?
ADVERTISEMENT
राऊतांनी आरोप केल्यानंतर किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत त्यांचं म्हणणं मांडलं आहे. “२०१७ मध्ये संजय राऊत यांनी सामना वृत्तपत्रातून बांधकाम कंपनीचा संदर्भाने अशाच पद्धतीने माझ्या पत्नीची बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता. आता त्यांनी माझा मुलगा नील सोमय्या याचं नाव घेतला आहे.”
ADVERTISEMENT
नील आणि किरीट सोमय्यांना तत्काळ अटक करा; PMC Bank घोटाळा प्रकरणात राऊतांचा गंभीर आरोप
“ठाकरे सरकारने माझ्याविरुद्ध आतापर्यंत १० गुन्हे दाखल केले आहेत. आणखी ३ गुन्हे दाखल होण्याच्या प्रक्रियेत आहेत. मी परिस्थिती समजू शकतो. आणखी एका प्रकरणाचं आणि चौकशीचं मी स्वागत करतो. आम्ही काहीही चुकीचं केलेलं नाही. कोणत्याही भ्रष्टव्यवहारात सहभागी नाहीये”, असं सोमय्यांनी म्हटलं आहे.
In 2017 Sanjay Raut, Samana Newspaper has in similar manner tried to Defame My Wife Prof Dr Medha Somaiya in such Building Construction Co.
Now he has taken name of My Son Neil Somaiya.
Till now That Sarkar's Leaders have filed 10 Cases against Me & 3 more in Pipeline/Process
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) February 15, 2022
“कोविड केंद्र घोटाळा प्रकरणावर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत का बोलत नाहीत. प्रविण राऊत आणि सुजित पाटकरसोबतच्या संबंधांबद्दल का बोलत नाहीत? ठाकरे सरकारचे घोटाळे समोर आणत राहणार. आमचा लढा त्याविरुद्ध आहे,” असा इशारा सोमय्यांनी दिला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT