Shobraj: ‘बिकिनी किलर’ला दोनदा पकडणारे मराठमोळे अधिकारी होते तरी कोण?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Police Officer Madhukar Zende who nabbed bikini killer twice: मुंबई: बिकिनी किलर (Bikini Killer) तसेच सीरियल किलर (Serial Killer) म्हणून ओ‌ळखला जाणारा कुख्यात गुन्हेगार चार्ल्स शोभराज (Charles Sobhraj) याला तब्बल 19 वर्षांनंतर नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने तुरुंगातून मुक्त करण्याचे व तसेच मायदेशी परत जाण्याचे आदेश दिले आहेत. कधीकाळी जवळजवळ दंतकथा बनून गेलेल्या याच चार्ल्स शोभराजला एक मराठी पोलीस अधिकारी बेड्या ठोकल्या होत्या. हा निर्भीड मराठी पोलीस अधिकारी कोण आणि त्यांचा या सगळ्या प्रकरणातील थरारक अनुभव कसा होता? जाणून घेऊयात सविस्तरपणे. (know more about marathi police officer madhukar zende who nabbed the bikini killer twice)

ADVERTISEMENT

अनेक महिलांना प्रेमाच्या जा‌‌ळ्यात ओढून त्यांचा खून करणारा सराईत गुन्हागार चार्ल्स शोभराज जगाला माहिती आहे. याच MOST WANTED गुन्हेगाराला एकदा नव्हे तर तब्बल दोन वेळा पकडणारा एक मराठी पोलीस अधिकारी आहे. ज्यांचं नाव आहे मधुकर झेंडे (Madhukar Zende).

मधुकर झेंडे यांनी पहिल्यांदा चार्ल्स शोभराजला 1971 मध्ये मुंबईतून अटक केली तेव्हा शोभराजसोबत असलेल्या त्याच्या साथीदारांसह त्याच्या जळव असणारं साहित्य देखील जप्त करण्यात आलं होतं. त्यावेळी तो दिल्ली पोलिसांना काही गुन्ह्यात हवा असल्यामुळे त्याला दिल्ली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं होतं. त्यानंतर तो काही वर्ष तिहार तुरुंगात होता. मात्र, याच तुरुंगातील सुरक्षा अधिकाऱ्यांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला. त्यानंतर त्याने परदेशी जाऊन पुन्हा खुनांचं सत्र चालू ठेवलं.

हे वाचलं का?

त्यानंतर 1974 साली मधुकर झेंडे यांची कुलाबा पोलीस स्टेशनला बदली झाली. महाराष्ट्रात आल्यावर शोभराजने मुंबईतील पंचतारांकित ताज हॉटेलला त्याचा अड्डा बनवला होता. हे हॉटेल कुलाबा परिसरात असल्यामुळे मधुकर झेंडे यांच्या कार्यक्षेत्रात होतं. मधुकर झेंडे यांना मिळालेल्या टीपनुसार चार्ल्स शोभराज मुंबईत आला होता.

मधुकर झेंडे त्याच्या शोधात निघाले परंतु 1976 मध्ये तो ‌झेंडेंच्या हातून निसटला, यावेळी मात्र त्याच्यासोबत असलेल्या एका महिलेला बंदुकीसोबत पकडण्यात मधुकर झेंडें यांना यश आलं. त्या महिलेची चौकशी केली असता असं समजलं की, शोभराज याने त्या महिलेला जबरदस्तीने आणलेलं होतं व तिच्या पुढ्यात त्याने अनेक महिलांचा खून देखील केल्याचं समजलं.

ADVERTISEMENT

Nihita Biswas : तुरूंगात बिकिनी किलरच्या प्रेमात, कोण आहे शोभराजची पत्नी?

ADVERTISEMENT

अनेक देशांमध्ये अनेक गुन्हे करुन चार्ल्स शोभराज हा तिहार जेलमध्ये अटकेत होता. तिथे स्वत:चा वाढदिवस आहे असं सांगून केकमध्ये गुंगीचं औषध मिसळून जेलमध्ये असणाऱ्या सगळ्यांना खाऊ घातलं आणि सगळ्यांना बेशुद्ध करुन चार्ल्स शोभराजसह 16 जणांनी तिहार जेलमधून पळ काढला होता.

या गोष्टीचा सगळीकडे एकच बोलबाला झाला. त्याचवेळी वर्तमानपत्रांमध्ये 1971ला चार्ल्स शोभराजला पकडणारे पोलीस अधिकारी मधुकर झेंडे हे पुन्हा एकदा चर्चेत आले आणि मग पुन्हा त्यांनी शोभराजला पकडण्याची जबाबदारी ही मधुकर झेंडे यांच्यावर त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सोपवली. त्यानंतर झेंडे संपूर्ण पोलिसांच्या टीमसह आणि प्लॅनसह चार्ल्स शोभराजला पकडण्यासाठी सज्ज होऊन गोव्याला रवाना झाले.

Charles Sobhraj : बिकिनी किलरला सुप्रीम कोर्टाने 19 वर्षानंतर का सोडलं?

त्यांनंतर काही दिवसांनी 6 एप्रिल 1986 ला भारत-पाकिस्तानचा हॉकीचा सामना होता. त्यावेळी एक गोष्ट घडली ती, म्हणजे एकाच हॉटेलमध्ये मधुकर झेंडें आणि चार्ल्स शोभराज हॉकीचा सामना बघत होते. हॉकीचा सामना बघत असताना मधुकर झेंडेंना चार्ल्स शोभराज दिसला. तो दिसताच झेंडेंच्या टीममध्ये असणाऱ्या सगळ्यांना सोबत घेऊन झेंडेंनी सापळा रचला आणि त्याच्या जवळ जाऊन ‘हाय चार्ल्स कसा आहेस?’ असं म्हणत मधुकर झेंडेंनी त्याच्यासोबत बोलायला सुरुवात केली. त्यावेळी मात्र चार्ल्स वेड्याचं सोंग करत वेडे आहात काय… कोण चार्ल्स वैगरे असंही म्हणला. पण अखेर चार्ल्सच्या खोटारडेपणाचा बुरखा फाडत त्यांनी दुसऱ्यांदा त्याला अगदी शिताफीने अटक केली होती.

शोभराज हाती लागेपर्यंत झेंडेंना प्रचंड संयम राखावा लागला. तसेच त्यांच्या सहकारी पोलिसांचे मनोधैर्यही टिकवून ठेवावं लागलं. दरम्यान, दुसऱ्यांदा अटक झाल्यानंतर चार्ल्सने त्या खटल्यादरम्यान एखाद्या वकिलाप्रमाणे न्यायालयात स्वत:च स्वत:ची बाजू मांडली. त्याला अटक करणाऱ्या मधुकर झेंडेंचीच उलटतपासणी घेण्यात आली. जणू काही त्यांनीच कायदा हाती घेतला होता.

कारण, कायद्याचा शोभराजला चांगलाच अभ्यास होता. तरीही झेंडेंच्या मते चार्ल्स हा फारसा बुद्धिमान गुन्हेगार नव्हता. एखाद्या सामान्य गुन्हेगाराप्रमाणे तो जर वारंवार पकडला जात असेल तर त्याला बुद्धिमान कसे म्हणता येईल?

अशाप्रकारे शोभराज 1986 ते 1997 पर्यंत अटकेत होता, शिक्षा पूर्ण झाल्यानंतर हायकोर्टाने त्याला मुक्त केलं. त्यानंतर तो नेपाळला गेला. नेपाळमध्ये जुगार खेळत असताना त्याला अटक केली होती. नेपाळ पोलिसांनी दोन खुनांच्या गुन्हेत त्याला ही अटक केली होती. याच प्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. आज तब्बल 19 वर्षांनी नेपाळ हायकोर्टाने त्याला मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. अशाप्रकारे मराठमोळ्या पोलीस अधिकाऱ्याने केलेल्या बहादुरीची गोष्ट पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT