शिंदेंचे लक्ष्य राष्ट्रवादीच; कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील पवारांची साथ सोडणार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोल्हापूर : राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आनंदराव यशवंतराव अर्थात ए. वाय. पाटील बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. यासाठी त्यांनी दोन वेळा मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली असल्याचे वृत्त आहे. अनेकदा सांगून पक्ष नेतृत्वाने नाराजीकडे लक्ष दिले नाही, अनेक वर्ष पक्षासोबत प्रामाणिकपणे काम करुनही योग्य सन्मान दिला नाही, त्यामुळे पाटील या निर्णयापर्यंत येऊन पोहचले असल्याचं सांगण्यात येत आहे.

ADVERTISEMENT

दरम्यान, ए. वाय. पाटील समर्थकांचा आज मेळावा पार पडला. या मेळाव्यात पुढील दिशा आणि वाटचाली संदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार कार्यकर्त्यांनी पाटील यांना दिले आहेत. मेळाव्यानंतर बोलताना चार दिवसांमध्ये अधिकृत निर्णय जाहीर करणार असल्याचं पाटील यांनी स्पष्ट केलं. पण आपल्याला ठाकरे गटाकडूनही ऑफर असल्याचं सांगत त्यांनी सस्पेन्स वाढवला आहे.

दरम्यान, ए. वाय. पाटील यांच्या निर्णयानंतर कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा हादरा बसण्याची शक्यता आहे. पाटील सध्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक देखील आहेत. शिवाय आगामी काळात होत असलेल्या बिद्री साखर कारखाना, बाजार समिती, जिल्हा परिषद, महापालिका निवडणूक, विधानसभा, लोकसभा या निवडणुकांमध्येही समीकरण बदलण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

हे वाचलं का?

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील नेतृत्व माजी मंत्री हसन मुश्रीफ करतात. तर ए. वाय. पाटील हे सुरुवातीपासून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. २०१४ पासून पाटील यांच्यावर कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची जबाबदारी आहे. मात्र राष्ट्रवादीचे माजी आमदार के. पी. पाटील यांच्याशी त्यांच्या वादाची दखल नेतृत्वाने घेतली नसल्यानेच या निर्णयापर्यंत आल्याची पाटील यांची भावना असल्याचं सांगण्यात येत. आज मुश्रीफ यांनी फोन केल्यानंतरही पाटील आपल्या निर्णयावर ठाम आहेत, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस सोडून ए. वाय. पाटील बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटात पक्षात प्रवेश करणार आहेत. तर राधानगरीचे शिवसेनेचे विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर हे देखील शिंदे गटात आहेत. मात्र, आबिटकर आणि पाटील यांनी राधानगरी तालुक्यात एकत्रित काम करावे, या बदल्यात पाटील यांना विधानसभा निवडणुकीपर्यंत एखाद्या महामंडळाचे अध्यक्षपद देण्याचा शब्द दिल्याचे समजते. तसंच त्यांना विधान परिषदेवर घेऊन प्रकाश आबिटकर यांची वाट सुकर करण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

ADVERTISEMENT

राष्ट्रवादी काँग्रेल लक्ष्य?

दरम्यान, पाटील यांच्या रुपानं शिंदे यांनी एकाच महिन्यात राष्ट्रवादीमधील दुसऱ्या मोठ्या नेत्याला पक्षात आणलं आहे. नुकतचं राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते आणि ठाणे ग्रामीणचे माजी जिल्हाध्यक्ष सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्यामुळे शिवसेनेत फुट पाडल्यानंतर एकनाथ शिंदे यांचं पुढचं लक्ष्य राष्ट्रवादी काँग्रेस आहे का? असा सवाल विचारला जात आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT