कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक : पाच वाजेपर्यंत 55.27 टक्के मतदान
–दिपक सूर्यवंशी, कोल्हापूर काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदान सुरू झालं असून, ३५७ मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. LIVE UPDATE: कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत सकाळी 7 ते 5 वाजेपर्यंत एकूण 55.27 टक्के मतदान झालं आहे. ज्यामध्ये 84566 पुरुष मतदार आणि 76721 […]
ADVERTISEMENT
–दिपक सूर्यवंशी, कोल्हापूर
ADVERTISEMENT
काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदान सुरू झालं असून, ३५७ मतदान केंद्रांवर मतदान होत आहे.
LIVE UPDATE:
हे वाचलं का?
-
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत सकाळी 7 ते 5 वाजेपर्यंत एकूण 55.27 टक्के मतदान झालं आहे. ज्यामध्ये 84566 पुरुष मतदार आणि 76721 महिला मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत सकाळी 7 ते 3 वाजेपर्यंत एकूण 44.93 टक्के मतदान झालं आहे. ज्यामध्ये 69789 पुरुष मतदार आणि 61318 महिला मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.
ADVERTISEMENT
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत एकूण 20.57 टक्के मतदान पार पडलं आहे. ज्यामध्ये 34589 पुरुष मतदार आणि 25429 महिला मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.
ADVERTISEMENT
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत होत आहे. राज्याचे गृह राज्यमंत्री सतेज पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरचे असल्यानं दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
सोमवारी मंगळवार पेठ इथं पैसे व इतर साहित्य वाटप केल्याच्या आरोपाप्रकरणी राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये रात्री उशिरा भाजपचे कार्यकर्ते विजय जाधव, अशोक देसाई यांच्यासह ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, रात्री दहा वाजताच्या सुमारास शाहुपुरी परिसरात काँग्रेस-शिवसेनेचे कार्यकर्ते एका बंद खोलीत पैसे वाटत असल्याची माहिती पोलीस यंत्रणेला व जिल्हा प्रशासनाला मिळाली होती. पोलीस आणि प्रशासनाने त्याठिकाणी झाडाझडती घेतली, असता काहीही मिळून आलं नाही.
काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी कोल्हापुरातील अरविंद ख्रिश्चन हायस्कूल येथील मतदान केंद्रावर मतदान केलं.
भाजप उमेदवार सत्यजित कदम कदम यांनी कदमवाडी भोसलेवाडी समता हायस्कूल येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.
सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. ३५७ केंद्रावर ही मतदान प्रक्रिया पार पडत असून, महिलांचं मतदान निर्णायक ठरणार आहे. सतेज पाटील हे पुन्हा एकदा कोल्हापुरात वर्चस्व सिद्ध करणार की, चंद्रकांत पाटील कोल्हापुरात कमळ फुलवणार हे १६ एप्रिल रोजी समजणार आहे.
या पोटनिवडणुकीच्या निमित्तानं कोल्हापुरचे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. हिंदुत्वापासून वैयक्तिक आरोपांपर्यंत या निवडणुकीच्या प्रचाराची पातळी घसरल्याचं बघायला मिळालं.
राजेश क्षीरसागरांची नाराजी ते उद्धव ठाकरे यांचं काँग्रेसला मतदान करण्याचं आवाहन अशा वेगळ्या आणि महत्त्वाच्या घटना पहिल्यांदाच या निमित्ताने घडल्या आहेत. शिवसेनेचा कट्टर मतदार कुणाच्या पारड्यात मत टाकणार याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात २ लाख ९१ हजार ५३९ मतदार आहेत. तर ३५७ मतदान केंद्रावर मतदार अधिकार बजावणार आहेत. मतदान प्रक्रियेसाठी ३८ झोनल, २,१४२ कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी असे सुमारे २,४०० कर्मचार्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शांततेन पार पाडण्यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. संवेदनशील असणाऱ्या ४ मतदान केंद्रांना अतिरिक्त पोलीस बंदोबस्त देण्यात आलेला आहे.
८० वर्षांवरील व्यक्ती आणि दिव्यांग यांचं मतदान टपाली पद्धतीनं करून घेण्यात आलं असून, उर्वरित दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT