कोल्हापूर : शिवसेनेनं बालेकिल्लाच दिला ‘काँग्रेस’ला; भाजपला होणार फायदा?
–दीपक सूर्यवंशी, कोल्हापूर पक्षाचा बालेकिल्ला असलेला मतदारसंघ शिवसेनेनं काँग्रेसला सोडला. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी हा निर्णय घेतला आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, यावेळी शिवसेनेनं काँग्रेसला सोडण्याचा निर्णय घेतल्याने निवडणूक लढवण्याच्या तयारीत असलेल्या पक्षाच्या नेत्यांसह शिवसैनिकांचा हिरमोड झाला आहे. महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेच्या या भूमिकेचा फायदा भाजपला […]
ADVERTISEMENT
–दीपक सूर्यवंशी, कोल्हापूर
ADVERTISEMENT
पक्षाचा बालेकिल्ला असलेला मतदारसंघ शिवसेनेनं काँग्रेसला सोडला. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी हा निर्णय घेतला आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, यावेळी शिवसेनेनं काँग्रेसला सोडण्याचा निर्णय घेतल्याने निवडणूक लढवण्याच्या तयारीत असलेल्या पक्षाच्या नेत्यांसह शिवसैनिकांचा हिरमोड झाला आहे. महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेच्या या भूमिकेचा फायदा भाजपला होऊ शकतो, असा अंदाज आहे.
चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे कोल्हापूर उत्तर मतदारसंघाची जागा रिक्त झाली. यामुळे या जागेवर पोटनिवडणूक लागली आहे. या मतदारसंघावर सुरूवातीपासूनच शिवसेनेचं वर्चस्व राहिलेलं आहे. त्यामुळे शिवसेना काय निर्णय घेणार याकडे महाविकास आघाडीतील इतर दोन पक्ष, शिवसैनिक आणि कोल्हापूरकरांचं लक्ष होतं.
हे वाचलं का?
शुक्रवारी कोल्हापूर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून शिवसेना उमेदवार देण्याची शक्यता दिसत होती, मात्र पक्षाने मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत पंढरपूर आणि देगलूरप्रमाणेच महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत बघायला मिळाणार आहे.
शिवसैनिकांचा मैत्रीपूर्ण लढतीसाठी होता आग्रह
ADVERTISEMENT
काँग्रेसला जागा सोडण्याच्या निर्णयामुळे कोल्हापुरात शिवसैनिकांमध्ये काहीसा नाराजीचा सूर आहे. असं असलं तरी पक्षप्रमुखांनीच मतदारसंघ काँग्रेसच्या पारड्यात टाकल्यानं आता शिवसेना नेते आणि पदाधिकाऱ्यांना काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा प्रचार करावा लागणार आहे.
ADVERTISEMENT
कोल्हापूर उत्तर मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. माजी आमदार व नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनीही पोटनिवडणुकीसाठी चालवली होती. निवडणूक ताकदीने लढवणार, असा त्यांचा निर्धार होता, पण त्यांच्या सर्व प्रयत्नांवर पाणी फेरलं गेलं.
हा मतदारसंघ काँग्रेसकडे रहावा, असा आग्रह काँग्रेसचे नेते आणि गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी धरला होता. दुसरीकडे राजेश क्षीरसागर हा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा म्हणून आग्रही होते. महाविकास आघाडी असली, तरी मैत्रीपूर्ण लढत, अशी मागणी त्यांच्याकडून केली गेली होती.
कोल्हापूर उत्तर मतदारसंघ निर्माण करण्यात आल्यापासून मोजके अपवाद वगळता शिवसेनेच्या ताब्यात राहिलेला आहे. १९९५ आणि १९९९ मध्ये शिवसेनेचे सुरेश साळोखे मतदारसंघातून विजयी झाले होते. मध्ये २००४ च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून मालोजीराजे यांनी विजय मिळवला. मात्र, २००९ मध्ये शिवसेनेनं पुन्हा मतदारसंघ परत मिळवला. यावेळी राजेश क्षीरसागर या मतदारसंघातून विजयी झाले होते.
शिवसैनिकांच्या मतांचा फायदा कुणाला?
२०१४ मध्येही राजेश क्षीरसागर यांनी मतदारसंघातून विजय मिळवत विधानसभेत प्रवेश केला होता. २०१९ मध्ये मात्र, राजेश क्षीरसागर यांचा पराभव झाला आणि हॅटट्रीकची संधीही गेली. या मतदारसंघात शिवसेनेशी निष्ठा असलेला मतदार आहे. आजपर्यंत शिवसैनिकांकडून काँग्रेसला कधीही मतदान झालेलं नाही, त्यामुळे कट्टर शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार का हा मात्र प्रश्न निर्माण झाला आहे. शिवसैनिकांनी काँग्रेसला नाकारलं, तर त्यांची मते भाजपला मिळू शकतात, अशी शक्यता आहे. त्यामुळे भाजपला फायदा होऊ शकतो.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT