भन्नाट मीम शेअर करत जितेंद्र आव्हाड यांनी उडवली चंद्रकांतदादांची खिल्ली
कोल्हापूर पोटनिवडणुकीत काँग्रेसचा विजय झाला आहे. यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भन्नाट मीम सोशल मीडियावर शेअर होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपचे नेते आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर खोचक मीम ट्विट करत टोला लगावला आहे. कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत कुठे कमी पडलो याचा अभ्यास करतो आहोत-चंद्रकांत पाटील काय आहे जितेंद्र आव्हाड […]
ADVERTISEMENT
कोल्हापूर पोटनिवडणुकीत काँग्रेसचा विजय झाला आहे. यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भन्नाट मीम सोशल मीडियावर शेअर होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपचे नेते आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर खोचक मीम ट्विट करत टोला लगावला आहे.
ADVERTISEMENT
कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत कुठे कमी पडलो याचा अभ्यास करतो आहोत-चंद्रकांत पाटील
काय आहे जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केलेलं मीम?
हे वाचलं का?
चंद्रकांत पाटील हे हिमालयात जाऊन बसले आहेत. त्यांच्या शेजारी एक बॅग आहे. तसंच त्यांच्या समोर कमळ उगवलं आहे. ते म्हणत आहेत पोहचलो रे हिमालयात. या आशयाचं हे मीम आहे जे जितेंद्र आव्हाड आणि यांनी ट्विट केलं आहे. एवढंच नाही तर कोल्हापूरची जागा जिंकली. शाहू महाराजकी जय असंही आपल्या एका ट्विटमध्ये आव्हाड यांनी म्हटलं आहे. फुले शाहू आंबेडकर यांच्याच विचारांचा विजय कोल्हापूरमध्ये झाला असंही त्यांनी म्हटलं आहे. जे मीम जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केलं आहे त्यावर चंद्रकांत पाटील यांचा मॉर्फ केलेला फोटो लावण्यात आला आहे.
नको परत या .. pic.twitter.com/JL89jsfRxb
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 16, 2022
चंद्रकांत पाटील यांनी काय म्हटलं आहे?
ADVERTISEMENT
कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत आम्ही कुठे कमी पडलो याचा अभ्यास आम्ही करतो आहोत. काही वेळापूर्वीच आम्ही त्याचं विश्लेषण करण्याची सुरूवात केली आहे. आमचा मुद्दा विकासाचा होता मात्र जनतेने जो निर्णय दिला आहे तो आम्हाला मान्य आहे असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. त्यात काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा विजय झाला आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापुरात आमदार निवडून आणण्याच्या भाजपच्या स्वप्नावर विरजण पडलं आहे.
या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधवांनी भाजपच्या सत्यजीत कदम यांना आस्मान दाखवलं आहे. या निकालानंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. जयश्री जाधव या जिंकल्या आहेत चांगली गोष्ट आहे. जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली होती. त्यामुळे सत्यजीत कदम जिंकतील असा विश्वास वाटत होता. जयश्री जाधव जिंकल्या आहेत मी त्यांचं अभिनंदन करतो असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT