कोल्हापुरातून काँग्रेसने उधळला विजयाचा गुलाल, भाजपला धूळ चारत मिळवला विजय
कोल्हापूर: कोल्हापूर उत्तर मतदारसंघाची पोटनिवडणूक 12 एप्रिलला पार पडली. याच पोटनिवडणुकीचा निकाल आज (16 एप्रिल) जाहीर झाला आहे. या पोटनिवडणुकीत कोल्हापूरकरांनी काँग्रेसच्या बाजूने आपला कौल दिला आहे. यावेळी काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी तब्बल 18,800 मताधिक्यांनी असा दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपच्या सत्यजित कदम यांना धूळ चारली आहे. काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांना या […]
ADVERTISEMENT
कोल्हापूर: कोल्हापूर उत्तर मतदारसंघाची पोटनिवडणूक 12 एप्रिलला पार पडली. याच पोटनिवडणुकीचा निकाल आज (16 एप्रिल) जाहीर झाला आहे. या पोटनिवडणुकीत कोल्हापूरकरांनी काँग्रेसच्या बाजूने आपला कौल दिला आहे. यावेळी काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी तब्बल 18,800 मताधिक्यांनी असा दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपच्या सत्यजित कदम यांना धूळ चारली आहे.
ADVERTISEMENT
काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांना या पोटनिवडणुकीत 96,226 मतं मिळाली आहेत तर भाजपचे सत्यजित कदम यांना 77,426 मतं मिळाली. खरं तर ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली होती. मात्र, या ठिकाणी भाजपने उमेदवार दिल्याने येथे निवडणूक घेण्यात आली होती. अखेर या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी एकत्रितपणे मिळून भाजपचा पराभव केला. त्यामुळे हा विजय महाविकास आघाडीसाठी महत्त्वाचा समजला जात आहे.
पाहा कोणत्या फेरीत किती मतं मिळाली
हे वाचलं का?
-
26 व्या आणि अखेरच्या फेरीत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांना तब्बल 96,226 मतं मिळाली तर भाजपचे सत्यजित कदम यांना 77,426 मतं मिळाली. त्यामुळे या पोटनिवडणुकीत काँग्रेसने भाजपचा तब्बल 18,800 मतांच्या मोठ्या फरकाने पराभव केला आहे.
25 व्या फेरीत काँग्रेसला 2755 मतं तर भाजपला 2949 मतं. 25 व्या फेरी अखेर काँग्रेस उमेदवार तब्बल 18,644 मतांनी आघाडीवर.
ADVERTISEMENT
24 व्या फेरीत काँग्रेसला 5337 मतं तर भाजपला 2830 मतं. 24 व्या फेरी अखेर काँग्रेस उमेदवार तब्बल 18,838 मतांनी आघाडीवर. आतापर्यंत जयश्री जाधव एकूण 92,012 मते मिळाली आहेत. तर भाजपचे सत्यजित कदम यांना एकूण 73,174 मते मिळाली आहेत.
ADVERTISEMENT
23 व्या फेरीत काँग्रेसला 3337 मतं तर भाजपला 2531 मतं. 23 व्या फेरी अखेर काँग्रेस उमेदवार तब्बल 16,331 मतांनी आघाडीवर. आतापर्यंत जयश्री जाधव एकूण 86,675 मते मिळाली आहेत. तर भाजपचे सत्यजित कदम यांना एकूण 70,344 मते मिळाली आहेत.
22 व्या फेरीत काँग्रेसला 3529 मतं तर भाजपला 3226 मतं. 22 व्या फेरी अखेर काँग्रेस उमेदवार तब्बल 15,525 मतांनी आघाडीवर
21 व्या फेरीत काँग्रेसला 3452 मतं तर भाजपला 3662 मतं. 21 व्या फेरी अखेर काँग्रेस उमेदवार तब्बल 15,222 मतांनी आघाडीवर
20 व्या फेरीत काँग्रेसला 4366 मतं तर भाजपला 3074 मतं. 20 व्या फेरी अखेर काँग्रेस उमेदवार तब्बल 15,432 मतांनी आघाडीवर
फेरी 19
फेरीतील झालेले मतदान: 6884
1. जयश्री जाधव: 3259
2. सत्यजित कदम: 2974
या फेरीतील लीड: 285
फेरी अखेर एकूण लीड: 14,140
अठराव्या फेरीत काँग्रेसला 3948 मतं तर भाजपला 3189 मतं. अठराव्या फेरी अखेर काँग्रेस उमेदवार तब्बल 13,855 मतांनी आघाडीवर
फेरी 17
फेरीतील झालेले मतदान: 6411
1. जयश्री जाधव: 2795
2. सत्यजित कदम: 3488
या फेरीतील लीड: वजा 693
फेरी अखेर एकूण लीड: 13,096
सोळाव्या फेरीत काँग्रेसला 3638 मतं तर भाजपला 3847 मतं. सोळाव्या फेरी अखेर काँग्रेस उमेदवार तब्बल 13,789 मतांनी आघाडीवर
फेरी 15
फेरीतील झालेले मतदान: 5966
1. जयश्री जाधव: 3788
2. सत्यजित कदम: 2056
या फेरीतील लीड: 1732
फेरीअखेर एकूण लीड: 13,998
चौदाव्या फेरीत काँग्रेसला 3756 मतं तर भाजपला 2669 मतं. चौदाव्या फेरी अखेर काँग्रेस उमेदवार तब्बल 12,266 मतांनी आघाडीवर
तेराव्या फेरीत काँग्रेसला 4386 मतं तर भाजपला 2432 मतं. तेराव्या फेरी अखेर काँग्रेस उमेदवार तब्बल 11,179 मतांनी आघाडीवर
बाराव्या फेरीत काँग्रेसला 3946 मतं तर भाजपला 2908 मतं. बाराव्या फेरीत काँग्रेसला 1038 मतांची आघाडी. काँग्रेसकडे सध्या एकूण 9225 मतांची आघाडी
अकराव्या फेरीत काँग्रेसला 2870 मतं तर भाजपला 2756 मतं. अकराव्या फेरी अखेर काँग्रेस उमेदवार एकूण 8187 मतांनी आघाडीवर
दहाव्या फेरीमध्ये भाजपच्या सत्यजित कदम यांनी 926 मतांची आघाडी घेतली आहे. या फेरीत सत्यजित कदमांना 3794 मतं तर जयश्री जाधव यांना 2868 मतं मिळाली आहेत. अद्यापही काँग्रेसकडे 8073 मतांची आघाडी कायम
आठव्या आणि नवव्या फेरीत भाजपच्या सत्यजित कदम यांनी अल्पसं मताधिक्य मिळवलं आहे. मात्र असं असलं तरीही काँग्रेसच्या जयश्री जाधव या अद्यापही 8959 मतांनी आघाडीवर आहेत.
फेरी 9
फेरीतील झालेले मतदान: 5800
1) जयश्री जाधव: 2744
2) सत्यजित कदम: 2937
या फेरीतील लीड: वजा 193
फेरी अखेर एकूण लीड: 8959
मोजलेली मते: 65,942
मोजायची मते: 1,12,600
फेरी 8
फेरीतील झालेले मतदान: 6630
1) जयश्री जाधव: 2981
2) सत्यजित कदम: 3505
या फेरीतील लीड: वजा 524
फेरी अखेर एकूण लीड: 9152
मोजलेली मते: 60,412
मोजायची मते: 1,18,400
सातव्या फेरीत काँग्रेसला 3632 मतं तर भाजपला 2431 मतं. सातव्या फेरीत जयश्री जाधव यांना 1201 मतांची आघाडी. तर सातव्या फेरीअखेर काँग्रेसकडे एकूण 9676 मतांची आघाडी
सहाव्या फेरीपर्यंत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना एकूण 27380 मतं मिळाली आहेत तर भाजपच्या सत्यजित कदम यांना 18905 मतं मिळाली आहेत.
सहाव्या फेरीत काँग्रेसला 4689 मतं तर भाजपला 2972 मतं. सहाव्या फेरी अखेर काँग्रेसच्या उमेदवार एकूण 8457 मतांनी आघाडीवर
फेरी 5
फेरीतील झालेले मतदान: 8061
जयश्री जाधव – 3673
सत्यजित कदम – 4198
या फेरीतील लीड:- 525 फेरी अखेर एकूण लीड: 6758
मोजलेली मते: 39,403 मोजायची मते: 1,39,139
चौथ्या फेरीत काँग्रेसला 3709 मतं तर भाजपला 3937 मतं. चौथ्या फेरी अखेर काँग्रेस उमेदवार एकूण 7273 मतांनी आघाडीवर
तिसऱ्या फेरीत काँग्रेसला 4928 मतं तर भाजपला 2566 मतं.
दुसऱ्या फेरीत काँग्रेसला 5515 मतं तर भाजपला 2513 मतं. दुसऱ्या फेरी अखेर काँग्रेसच्या उमेदवार एकूण 5139 मतांनी आघाडीवर
दुसऱ्या फेरीतही काँग्रेसच्या जयश्री जाधव याच आघाडीवर
पहिल्या फेरीत काँग्रेसला 4856 मतं तर भाजपला 2719 मतं. पहिल्या फेरी अखेर काँग्रेसच्या उमेदवार 2137 मतांनी आघाडीवर
पहिल्या फेरीत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव आघाडीवर
पहिल्या फेरीत काँग्रेस आघाडीवर, भाजप पिछाडीवर
मतमोजणीला सुरुवात, पोस्टल बॅलेट मतांची मोजणी सुरु
काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर ही निवडणुक घेण्यात आली होती. काँग्रेसने जयश्री जाधव यांना उमेदवारी दिली होती तर भाजपतर्फे सत्यजीत कदम यांना उमेदवारी दिली होती. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या जागेवर शिवसेना उभी राहत नसल्याने त्यांची मते कुणाकडे जाणार याची उत्सुकता लागली आहे.
या पोटनिवडणुकीत भाजपचे सत्यजित कदम विरुद्ध काँग्रेसच्या जयश्री जाधव असा थेट सामना होणार आहे. मात्र, या निवडणुकीत काँग्रेसचे मंत्री सतेज पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कारण या दोनही नेत्यांनी या निवडणुकीत आपल्या उमेदवारासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. त्यामुळे या निवडणुकीत नेमकं कोण बाजी मारणार याकडे कोल्हापूरसह अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे.
दरम्यान, राजाराम तलावा शेजारील शासकीय गोदामामध्ये मतमोजणी सुरु झाली आहे. मतमोजणी सकाळी 8 वाजेपासून सुरुवात झाली आहे. 14 टेबलवर आणि 26 फेऱ्यांमध्ये मतमोजणी केली जाणार आहे.
काही वेळापूर्वीच मतदानाला सुरुवात झाली असून एकूण 26 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे. सुरुवातीला पोस्टल बॅलेटमधील मतदानाची मोजणी होईल आणि त्यानंतर ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात होईल. त्यामुळे पुढील दोन-तीन तासांमध्ये संपूर्ण निकाल हाती येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या पोटनिवडणुकीच्या निमित्तानं कोल्हापूरचे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. हिंदुत्वापासून वैयक्तिक आरोपांपर्यंत या निवडणुकीच्या प्रचाराची पातळी घसरल्याचं बघायला मिळालं होतं
राजेश क्षीरसागरांची नाराजी ते उद्धव ठाकरे यांचं काँग्रेसला मतदान करण्याचं आवाहन अशा वेगळ्या आणि महत्त्वाच्या घटना पहिल्यांदाच या निमित्ताने घडल्या होता. त्यामुळे शिवसेनेचा कट्टर मतदार कुणाच्या पारड्यात मत टाकणार याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात 2 लाख 91 हजार 539 मतदार आहेत. यावेळी इथे जवळजवळ 60 टक्के मतदान झालं होतं.
कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक : सतेज पाटील माणसं खाणारा माणूस – चंद्रकांत पाटलांची टीका
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT