लखीमपूर खीरी : ‘त्या’ आठ जणांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला; पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

देशाला सुन्न करणाऱ्या लमीमपूर खीरी हिंसाचारात मरण पावलेल्या आठ जणांचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला आहे. या अहवालात त्यांच्या मृत्यूचं कारण विशद करण्यात आलं असून, आठपैकी एकाही व्यक्तीचा मृत्यू गोळी लागून झाला नसल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

3 ऑक्टोबर रोजी ही घटना घडली होती. ज्यात 8 जणांना प्राण गमवावे लागले. मयत आठ जणाचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आले असून, त्यात मृत्यूचं कारण स्पष्ट करण्यात आलं आहे. शेतकरी आणि भाजप कार्यकर्त्यांच्या मृत्यू वेगवेगळ्या कारणांनी झाला असल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आलं आहे.

लवप्रित सिंह यांच्या शरीरावर फरफटत नेल्यामुळे होणाऱ्या जखमा आढळून आल्या आहेत. धक्का बसून आणि रक्तस्राव झाल्यानं मृत्यू झाल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

हे वाचलं का?

नक्षत्र सिंह यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मृत्यू आधी झालेल्या जखमा आणि धक्का बसल्याचं कारणाचा उल्लेख करण्यात आला आहे. रक्तस्राव आणि मृत्यू आधी कोमात गेल्याचंही पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. त्याचबरोबर त्यांच्या शरीरावर फटफटल्याच्याही खुणा आढळून आल्या आहेत.

Lakhimpur kheri violence : शेतकरी की पक्षाचे कार्यकर्ते… जीव गमावणारे ते 8 लोक कोण होते?

ADVERTISEMENT

गुरविंदर सिंहच्या शरीरावर दोन जखमा आढळून आल्या आहेत. धारदार शस्त्राने वार केल्याचा उल्लेख असून, धक्का आणि रक्तस्रावामुळे मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

दलजित सिंह यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये शरीरावर फरफटत नेल्याच्या खुणा आढळून आल्या आहेत. त्याचबरोबरही इतरही जखमा आढळून आल्या आहेत.

शुभम मिश्राच्या शरीरावर फरफट नेल्याच्या तसेच लाठ्यांनी मारहाण केल्याच्या खुणा आढळून आल्या आहेत.

हरिओम मिश्राच्या शरीरावरही लाठ्यांनी मारहाण केल्याच्या जखमा आढळून आल्या आहेत. धक्का बसल्यानं आणि रक्तस्राव झाल्यानं दोघांचा मृत्यू झाल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

श्यामसुंदर निषादच्या शरीरावर लाठीने मारहाण केल्याच्या खुणा आढळून आल्या आहेत. त्याचबरोबर फरफट नेल्याच्याही खुणांचा उल्लेख आहे.

रमण कश्यपचा मृत्यूही गंभीर मार लागल्यानं झाल्याचं म्हटलं आहे. शरीरावर लाठीने मारहाण केल्याच्या खुणा आढळून आल्या असून, धक्का लागल्यानं आणि रक्तस्राव झाल्यानं मृत्यू झाल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

याचबरोबर इतरांच्याही पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मारहाण केल्यानं मृत्यू झाला असल्याचं म्हटलं आहे. बेदम मारहाण केल्यामुळे गंभीर जखमी झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला असल्याचा उल्लेख इतरांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT