वयाच्या 13 वर्षी गायलं पहिलं गाणं! मधुबाला ते प्रियंका चोप्रा सगळ्यांचाच ‘आवाज’ झाल्या लतादीदी
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं आज सकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी निधन झालं. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज अखेर मल्टिऑर्गन फेल्युअर झाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी त्यांच्या वयाच्या 13 व्या वर्षापासून गाणं म्हणण्यास सुरूवात केली होती. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात शिवाजी पार्क […]
ADVERTISEMENT
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं आज सकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी निधन झालं. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज अखेर मल्टिऑर्गन फेल्युअर झाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी त्यांच्या वयाच्या 13 व्या वर्षापासून गाणं म्हणण्यास सुरूवात केली होती.
ADVERTISEMENT
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात शिवाजी पार्क मैदानात होणार अंत्यसंस्कार
लता मंगेशकर यांनी वयाच्या 13 व्या वर्षी एका मराठी सिनेमासाठी पहिलं गाणं म्हटलं होतं. त्यानंतर लता मंगेशकर या अभिनेत्री मधुबाला ते प्रियांका चोप्रा पर्यंत अनेक अभिनेत्रींचा आवाज झाल्या. आजवर त्यांनी 35 हजारांहून अधिक गाणी म्हटली आहेत. तसंच अनेक अभिनेत्रींना त्यांनी आपला आवाज दिला आहे.
हे वाचलं का?
दिनानाथ मंगेशकर हे लता मंगेशकरांचे वडील. दिनानाथ मंगेशकर यांचं निधन झाल्यानंतर कुटुंबाची सगळी जबाबदारी येऊन पडली ती लता मंगेशकर यांच्या खांद्यावर. लता मंगेशकर यांच्या वडिलांचे मित्र मास्टर विनायक यांनी बडी माँ सिनेमात काम करण्यासाठी लता मंगेशकर यांना ऑफर दिली. त्यासाठीच त्या मुंबईत आल्या होत्या. इथे त्यांनी उस्ताद अमान अली खान यांच्याकडून हिंदुस्थानी संगीत शिकले. लतादीदींनी आत्तापर्यंत अनेक दिग्गज संगीत दिग्दर्शकांसोबत काम केलं आहे.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला शोक
ADVERTISEMENT
लता मंगेशकर यांनी संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल, राम-लक्ष्मण यांच्यासह अनेक संगीतकारांसोबत गाणी म्हटली. एस.डी. बर्मन, आर.डी. बर्मन यांच्यासाठी त्यांनी म्हटलेली गाणीही अजरामर झाली आहेत. तसंच ए. आर. रहमान सोबत त्यांनी लगानमध्ये ओ पालनहारे आणि रंग दे बसंती या सिनेमातील लुकाछुपी हे गाणं म्हटलं होतं.
ADVERTISEMENT
मधुबाला, मीनाकुमारी, नूतन, नर्गिस यांच्यासह पुढे रेखा, हेमामालिनी, श्रीदेवी, माधुरी दीक्षित, काजोल, प्रियांका चोप्रापर्यंत त्या सगळ्यांचाच आवाज झाल्या. त्यांनी गायलेली हजारो गाणी रसिक प्रेक्षकांच्या कायमच स्मरणात राहतील यात काहीही शंका नाही. सहा दशकांहून अधिक काळ कारकीर्द असलेल्या लतादीदी यांच्या आवाजाची भुरळ ही अबालवृद्धांना आजही पडली आहे.
लता मंगेशकर यांनी ‘दो बिघा जमीन’, ‘मदर इंडिया’, ‘मुगल-ए-आझम’ अशा क्लासिक चित्रपटांमधील त्यांची गाणी खूप गाजली. जास्तीत जास्त गाणी रेकॉर्ड करण्याचा मानही लता मंगेशकरांच्या नावावर आहे. लता मंगेशकर यांनी 20 भाषांमध्ये 30,000 गाणी गायली आहेत. फिल्मी गाण्यांव्यतिरिक्त त्यांनी नॉन फिल्मी गाणीही उत्तम गायली आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT