अर्ध्यावरती डाव मोडला…’या’ कारणामुळे लतादीदी आयुष्यभर राहिल्या अविवाहीत
आपल्या सूरांच्या माध्यमातून संपूर्ण जगातील संगीत रसिकांचं मन मोहून टाकणाऱ्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं आज निधन झालं. काही दिवसांपूर्वी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली होती. ज्यानंतर त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा झाली होती. परंतू पुन्हा एकदा तब्येत बिघडल्यामुळे त्यांना ICU मध्ये डॉक्टरांच्या देखरेखीत उपचार सुरु होते. परंतू […]
ADVERTISEMENT
आपल्या सूरांच्या माध्यमातून संपूर्ण जगातील संगीत रसिकांचं मन मोहून टाकणाऱ्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं आज निधन झालं. काही दिवसांपूर्वी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली होती. ज्यानंतर त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा झाली होती. परंतू पुन्हा एकदा तब्येत बिघडल्यामुळे त्यांना ICU मध्ये डॉक्टरांच्या देखरेखीत उपचार सुरु होते. परंतू अखेरीस आज त्यांची प्राणज्योत मालवली.
ADVERTISEMENT
लतादीदींच्या खासगी आयुष्याबद्दल अनेकांना कुतुहल होतं. आपल्या चारही भावंडांचा सांभाळ करण्यापासून त्यांना संगीत क्षेत्रात मदत करण्यापर्यंत लता दीदींनी अनेकदा मोठ्या बहिणीची भूमिका बजावली. परंतू लतादीदी या आयुष्यभर अविवाहीत राहिल्या होत्या. लतादीदींनी लग्न का केलं नाही असा प्रश्न अनेक चाहत्यांच्या मनात आला असेल. यामागची कहाणी तितकीच हृदयद्रावक आहे.
सर्वांग सुंदर… Lata Mangeshkar यांची काही सदाबहार गाणी
हे वाचलं का?
लता मंगेशकरांच्या आवाजावर मोहीत होऊन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी लतादीदींना भारताची गानकोकीळा ही उपाधी दिली होती. राजसिंग डुंगरपूर यांच्यासोबत त्यांची प्रेमकहाणी चर्चेत होती. राजसिंग डुंगरपूर हे राजस्थानच्या डुंगरपूर घराण्याचे राजकुमार होते. याव्यतिरीक्त भारतीय क्रिकेटमध्ये डुंगरपूर यांचं तितकंच मोठं योगदान आहे.
डुंगरपूर यांच्या बहिणीची मुलगी, बिकानेर राजघराण्याच्या राजकुमारी राज्यश्री यांनी आपल्या आत्मचरित्रात लता मंगेशकर आणि राजसिंग डुंगरपूर यांच्या भेटीबद्दलची कहाणी सांगितली आहे. राजसिंग आणि लता यांची ओळख त्यांचे बंधू हृदयनाथ मंगेशकर यांच्या माध्यमातून झाली. हृदयनाथ यांना क्रिकेटचं प्रचंड वेड होतं.
ADVERTISEMENT
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा मृत्यू कोणत्या कारणामुळे झाला? डॉक्टरांनी सांगितलं कारण
ADVERTISEMENT
राजसिंग डुंगरपूर हे महाराजा डुंगरपूर यांचे तिसरे पूत्र होते. राजसिंग यांच्या तिन्ही बहिणींचा विवाह हा राजघराण्यात झाला होता. त्यामुळे राजसिंग हे देखील राजघराण्याचीच हीच प्रथा पुढे सुरु ठेवतील अशी अपेक्षा होती. राज्यश्री यांच्या सांगण्यानुसार, त्यांची आई सुशीला ज्यांनी बिकानेरचे अखेरचे महाराजा डॉ. कर्णी सिंग यांच्याशी विवाह केला आणि सुशीला यांच्या बहिण यांचा राजसिंग आणि लता यांच्या नात्याला तीव्र विरोध होता.
राज्यश्री आपल्या आत्मचरित्रात लिहीतात, “लता मंगेशकर यांना बॉम्बे येथील ओल्ड बिकानेर हाऊसमध्ये बोलावण्यात आलं होतं. मला असं मनापासून वाटत आहे (पण मी खात्रीशीर सांगू शकत नाही) की त्यावेळी लता मंगेशकरांना त्यांच्या भावापासून दूर रहाण्यासाठी सांगण्यात आलं. जेणेकरुन त्यांना राजघराण्यातील योग्य मुलीशी लग्न करता येईल.” (२९३ व्या पानावर याचा उल्लेख आहे.
राजसिंह आणि लता मंगेशकर हे एकमेकांच्या इतक्या प्रेमात होते की याच प्रेमापोटी त्यांनी मरेपर्यंत लग्न न करण्याचा निश्चय केला. लता मंगेशकर आणि राजसिंग डुंगरपूर यांनी गुपचुप विवाह केल्याच्या अफवा काही वर्षांपूर्वी चर्चेत होत्या. परंतू राज्यश्री यांनी या अफवा फेटाळून लावल्या होत्या. राज्यश्री लंडनमध्ये वास्तव्यासाठी असताना मंगेशकर कुटुंबाशी कायम संपर्कात असायच्या.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT