व्हेंटिलेटरवर असताना लता मंगेशकर यांनी मागवला होता इयरफोन, जाणून घ्या काय होतं यामागचं कारण..
लता मंगेशकर यांचा वयाच्या 93 व्या वर्षी मृत्यू झाला आहे. ८ जानेवारीपासून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार करण्यात येत होते. तसंच त्यांना व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आलं होतं. लता मंगेशकर यांनी व्हेंटिलेटरवर असताना म्हणजेच दोन दिवसांपूर्वी इयरफोन मागवले होते. व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट हरिश भीमाणी यांनी ही बाब सांगितली आहे. […]
ADVERTISEMENT
लता मंगेशकर यांचा वयाच्या 93 व्या वर्षी मृत्यू झाला आहे. ८ जानेवारीपासून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार करण्यात येत होते. तसंच त्यांना व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आलं होतं. लता मंगेशकर यांनी व्हेंटिलेटरवर असताना म्हणजेच दोन दिवसांपूर्वी इयरफोन मागवले होते. व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट हरिश भीमाणी यांनी ही बाब सांगितली आहे. जी ऐकून आपल्याही डोळ्यात पाणी येईल.
ADVERTISEMENT
हरिश भीमाणी यांना लता मंगेशकर यांचे बंधू हृदयनाथ मंगेशकर यांनी सांगतिलं की आपल्या शेवटच्या दिवसात लतादीदी या वडील दिनानाथ मंगेशकर यांची आठवण काढत होत्या. दिनानाथ मंगेशकर हे नाट्यसंगीत गायक होते. लता मंगेशकर यांनी त्यांच्या वडिलांच्या रेकॉर्डिंग मागवल्या होत्या. ही नाट्यगीतं ऐकण्याचा प्रयत्न लतादीदी करत होत्या. मृत्यूच्या दोन दिवस आधी लतादीदींनी इयरफोन मागवला होता. त्यांना मास्क हटवण्यास मनाई करण्यात आली होती. तरीही त्या मास्क काढून गाणं गुणगुणत होत्या, असं हृदयनाथ मंगेशकर यांनी हरीश भीमाणींना सांगितलं. लता मंगेशकर या वडिलांना गुरू मानत होत्या आणि त्यांचा खूप आदर करत होत्या.
हे वाचलं का?
हरीश भीमाणी यांनी आज तकशी बोलताना हेदेखील सांगितलं की लता मंगेशकर या स्वतःची गाणी ऐकत नसत. त्या स्वतःची गाणी ऐकायला घाबरत असत. यामागे काय कारण होतं असं विचारलं असता हरीश भीमाणी म्हणाले की, ‘लता मंगेशकर स्वतःची गाणी ऐकत असत तेव्हा आपलं कुठे चुकलं ते त्यांना लक्षात येत असे. आपल्या गाण्यात त्यांना कुठे चुकलंय हे कळलं तर त्यांना त्रास होत असे. मोठमोठे संगीतकार माझी गाणी ऐकतील तेव्हा काय म्हणतील? असंही त्या म्हणत असत. त्याबद्दल विचार करून बेचैन होत असत’
ADVERTISEMENT
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानंतर राष्ट्रीय दुखवटा जाहीर! शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
ADVERTISEMENT
लता मंगेशकर यांनी एका हिंदी चॅनलला मुलाखत दिली होती. त्यात पुन्हा जन्म मिळाला तर लता मंगेशकर म्हणूनच जन्म घ्यायला आवडेल का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्याबाबत लता मंगेशकर यांनी हे उत्तर दिलं होतं की ‘पुन्हा लता मंगेशकर म्हणून जन्म घ्यायला आवडेल का हा प्रश्न मला आधीही विचारण्यात आला होता. त्याावेळी मी जे उत्तर दिलं होतं तेच उत्तर देईन. मला पुन्हा जन्म मिळू नये आणि मिळालाच तर मला लता मंगेशकर व्हायचं नाही.’ मुलाखत घेणाऱ्याने का? असं विचारताच लतादीदी म्हणाल्या की ‘लता मंगेशकर असण्याच्या अडचणी काय आहेत किंवा समस्या काय आहेत त्या फक्त तिलाच माहित आहेत.’ असं म्हणून त्या दिलखुलास हसल्या. त्यांचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना 8 जानेवारीला रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना कोरोनाची लक्षणं जाणवल्याने कोरोना चाचणीही केली होती जी पॉझिटिव्ह आली होती. कोरोनातून त्या बऱ्याही झाल्या होत्या. तसंच 27 जानेवारीला ही माहिती देण्यात आली होती की त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होते आहे. मात्र शनिवारी लता मंगेशकर यांची प्रकृती बिघडल्याची माहिती आणि त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली. त्यावेळीच सगळ्या देशातील जनतेच्या काळजाचा ठोका चुकला होता. त्यानंतर आज सकाळी ९.३० च्या सुमारास त्यांच्या निधनाची बातमी समोर आलीच.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT