Live : लता मंगेशकर यांचं पार्थिव शिवाजी पार्कवर दाखल; थोड्याच वेळात होणार अंत्यसंस्कार
भारतीय जनमनावर गेली आठ दशकं अधिराज्य गाजवणारा स्वर आज निमाला. स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर यांचं आज निधन झालं. त्या ९३ वर्षांच्या होत्या. कोरोनातून बऱ्या झाल्यानंतर लता मंगेशकर घरी परतल्या होत्या. मात्र, शनिवारी अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर आज शिवाजी पार्क येथे […]
ADVERTISEMENT
भारतीय जनमनावर गेली आठ दशकं अधिराज्य गाजवणारा स्वर आज निमाला. स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर यांचं आज निधन झालं. त्या ९३ वर्षांच्या होत्या. कोरोनातून बऱ्या झाल्यानंतर लता मंगेशकर घरी परतल्या होत्या. मात्र, शनिवारी अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर आज शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
ADVERTISEMENT
लता मंगेशकर यांना 8 जानेवारीला निमोनिया झाल्याचं निदान झालं होतं. त्यानंतर त्यांना ब्रीचकॅण्डी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यातच त्यांना कोरोनाचा संसर्गही झाला होता. मात्र, औषधोपचाराच्या मदतीने त्यांनी कोरोनावर मातही केली होती. रुग्णालयातून सुट्टी देण्यात आल्यानंतर त्यांची अचानक प्रकृती खालावली. त्यानंतर त्यांना पुन्हा ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
लता मंगेशकर यांनी आजपर्यंतच्या कारकीर्दीत जवळपास 30,000 पेक्षा जास्त गाणी गायली आहेत. महत्त्वाचं म्हणजे हिंदीसोबत अनेक भारतीय प्रादेशिक भाषांमध्येही त्यांनी गायली आहेत.
हे वाचलं का?
लता मंगेशकर यांना मिळालेले पुरस्कार
-
1958, 1962, 1965, 1969, 1993, 1994: फिल्म फेअर अवार्ड.
ADVERTISEMENT
1969: पद्म भूषण.
ADVERTISEMENT
1974: जगातील सर्वात जास्त गाणे गाण्याचा गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड.
1989: दादासाहेब फाळके पुरस्कार.
1993: फिल्मफेअर लाइफटाइम अचीवमेंट पुरस्कार.
1996: स्क्रीन चा लाईफ टाईम अचीवमेंट पुरस्कार.
1997: राजीव गांधी पुरस्कार.
1999: एन टी आर पुरस्कार.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT