गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत ताजी माहिती समोर, डॉक्टर म्हणाले….
देशाच्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत आता ताजी माहिती समोर आली आहे. लता मंगेशकर यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती देण्यात आली आहे. लता दीदींवर उपचार करणारे प्रमुख डॉक्टर प्रतीत समदानी यांनी ही माहिती दिली आहे. काय आहे लता मंगेशकर यांच्या प्रकृतीविषयीची माहिती? ‘लतादीदींवर ब्रीच कँडी रूग्णालयातील आयसीयूमध्येच उपचार केले जात आहेत. सध्या त्यांच्या […]
ADVERTISEMENT
देशाच्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत आता ताजी माहिती समोर आली आहे. लता मंगेशकर यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती देण्यात आली आहे. लता दीदींवर उपचार करणारे प्रमुख डॉक्टर प्रतीत समदानी यांनी ही माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT
काय आहे लता मंगेशकर यांच्या प्रकृतीविषयीची माहिती?
‘लतादीदींवर ब्रीच कँडी रूग्णालयातील आयसीयूमध्येच उपचार केले जात आहेत. सध्या त्यांच्या प्रकृतीत काहीशी सुधारणा होते आहे. मात्र त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखालीच उपचार घ्यावे लागणार आहेत. या टीमचं नेतृत्व डॉ. प्रतीत समदानी करत आहेत. आम्ही सगळ्यांच्या प्रार्थनांसाठी त्यांचे आभार मानतो. लतादीदींना लवकरच बरं वाटेल अशी आशा आम्हाला वाटते आहे.’ या आशयाचं ट्विट लता मंगेशकर यांच्या ट्विटर अकाऊंटवरून करण्यात आलं आहे.
हे वाचलं का?
— Lata Mangeshkar (@mangeshkarlata) January 27, 2022
23 जानेवारीला काय ट्विट करण्यात आलं होतं?
ADVERTISEMENT
‘लतादीदी ब्रीचकँडी रूग्णालयातील ICU मध्ये उपचार घेत आहेत. त्यांच्यावर डॉ. प्रतीत समदानी आणि टीमकडून उपचार सुरू आहेत. त्या लवकरात लवकर बऱ्या होऊन घरी परताव्यात यासाठी प्रार्थना करू. सर्वांना कळकळीची विनंती आहे कुणीही खोट्या बातम्या, अफवा पसरवू नका. डॉ. प्रतीत समदानी यांच्याकडून लतादीदींचे हेल्थ अपडेट्स कळवले जात आहेत. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका’ अशी विनंतीही यामधून करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
लता मंगेशकर यांना 8 जानेवारीला ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लता मंगेशकर यांना अद्यापही ICU मध्येच ठेवण्यात आलं आहे. डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करते आहे. त्याचप्रमाणे त्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत. त्यांना निमोनिया झाल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्यांना कोरोनाचीही लक्षणं जाणवू लागली त्यामुळे त्यांची कोरोना चाचणीही करण्यात आली जी पॉझिटिव्ह आली आहे.
8 जानेवारीपासून लता मंगेशकर यांना ब्रीचकँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आम्ही त्यांची प्रकृती सुधारावी असं यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहोत असं डॉ. प्रतीत समदानी यांनी सांगितलं आहे. त्यांच्या प्रकृतीसाठी त्यांचे चाहतेही प्रार्थना करत आहेत. त्यांना लवकरच बरं वाटेल आणि त्या घरी परततील असंही डॉक्टरांनी म्हटलं आहे.
2019 मध्ये 28 दिवस रूग्णालयात होत्या लतादीदी
2019 मध्येही लतादीदींना निमोनिया झाला होता. त्यावेळी त्यांना एक-दोन नाही तर तब्बल 28 दिवस रूग्णालयात रहावं लागलं होतं. त्यांची प्रकृती पूर्ण बरी झाल्यानंतरच त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. आता यावेळी लता मंगेशकर यांना कोरोना आणि निमोनिया झाल्याने त्यांना ब्रीचकँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांची एक टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT