पंधरा रुपये भाडं परवडत नसल्यामुळे बदलावी लागली खोली, लतादीदींचं कोल्हापूरशी होतं खास नातं
– विजय सूर्यवंशी, कोल्हापूर प्रतिनिधी अख्ख्या जगाला आपल्या मधुर आवाजानं वेड लावणार्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा कोल्हापूरशी विशेष ऋणानुबंध होता. मंगेशकर कुटुंबीय सांगलीनंतर कोल्हापुरात स्थायिक झाले होते. त्यांच्या सांगीतिक कारकीर्दीची सुरुवात कोल्हापुरातूनच झाली. कोल्हापुरातच त्यांना मास्टर विनायक आणि भालजी पेंढारकरांचं मार्गदर्शन लाभलं. कामानिमित्त मुंबईला जावं लागलं तरी, लतादीदींची कोल्हापूरशी असलेली नाळ कायम ठेवली होती. त्यामुळंच […]
ADVERTISEMENT
– विजय सूर्यवंशी, कोल्हापूर प्रतिनिधी
ADVERTISEMENT
अख्ख्या जगाला आपल्या मधुर आवाजानं वेड लावणार्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा कोल्हापूरशी विशेष ऋणानुबंध होता. मंगेशकर कुटुंबीय सांगलीनंतर कोल्हापुरात स्थायिक झाले होते. त्यांच्या सांगीतिक कारकीर्दीची सुरुवात कोल्हापुरातूनच झाली. कोल्हापुरातच त्यांना मास्टर विनायक आणि भालजी पेंढारकरांचं मार्गदर्शन लाभलं. कामानिमित्त मुंबईला जावं लागलं तरी, लतादीदींची कोल्हापूरशी असलेली नाळ कायम ठेवली होती. त्यामुळंच त्या दरवर्षी एक-दोन महिने पन्हाळगडावरील बंगल्यात मुक्कामाला असायच्या. कोल्हापुरी जेवण हा तर त्यांचा वीक पॉइंट होता. शिवाय कोल्हापुरातील अनेकांशी त्यांचे अखेरपर्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. लतादीदींच्या निधनामुळं त्यांच्या कोल्हापुरातील आठवणींना उजाळा देत, कोल्हापूरकर हळहळले आहेत.
मूळचं इंदौरचं मंगेशकर कुटुंब १९३० मध्ये सांगलीत आलं. सांगलीनंतर हे कुटुंब कोल्हापूरमध्ये येऊन स्थायिक झालं. मंगळवार पेठेत खरी कॉर्नरजवळ बाबूराव पेंटर यांच्या घराजवळच मंगेशकर कुटुंबीय राहायचे. कोल्हापूरमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा शिवाजी पेठेतली खोली भाड्यासाठी पंधरा रुपये देणे त्यांना परवडत नसल्यामुळे मंगेशकरांना सोडावी लागली. यानंतर लता मंगेशकर कुटुंबीयांना मंगळवार पेठेत कारेकर कुटुंबीयांच्या दुसऱ्या मजल्यावर दहा रुपयाच्या भाड्याने खोली मिळाली. केवळ पाच रुपये भाडं स्वस्त म्हणून खोली सोडावी लागणाऱ्या लतादीदींनी आयुष्यात पुष्कळ संपत्ती कमावली. परंतू असं असतानाही त्यांनी आपले पाय जमिनीवर कायम ठेवले.
हे वाचलं का?
कोल्हापूरशी जोडलेलं त्यांचं नातं अखेरपर्यंत कायम राहिलं. चित्रतपस्वी भालजी पेंढारकरांशी त्यांचा स्नेह होता. भालजींच्या कडक शिस्तीत लता मंगेशकरांनी चित्रपटातही काम केलं होतं. भालजी पेंढारकरांच्या आर्थिक अडचणीत, त्यांनीच जयप्रभा स्टुडिओ आणि पन्हाळ्याचा बंगला विकत घेतला होता. पन्हाळ्याच्या बंगल्यात दरवर्षी त्या दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत रहायला यायच्या. सर्वात आवडतं हिल स्टेशन म्हणून लतादीदी पन्हाळ्याचा उल्लेख करायच्या. पन्हाळ्याच्या आठवडी बाजारात मंगेशकर बहिणी खरेदीला यायच्या, अशा आठवणी पन्हाळ्यातील जुनेजाणते लोक सांगतात.
ADVERTISEMENT
अक्कलकोटच्या अन्नछत्र मंडळाशी लतादीदींचं होतं खास नातं, स्वतः पोळ्या लाटून केली होती सेवा
ADVERTISEMENT
गायक सुरेश वाडकर यांना बॉलिवूडमध्ये पहिल्यांदा काम देण्यात लतादिदींचा मोठा वाटा होता. सुरेश वाडकर हे एकदा त्यांचे चिखलीचे मित्र पांडबा यादव यांच्या घरी लतादीदींना घेऊन गेले होते. त्यानंतर दरवर्षी त्या पांडबा यादवांच्या घरी भेट द्यायच्या. चुलीवरची भाकरी, पालेभाज्यांसह कोल्हापुरी झणझणीत मटण त्यांना विशेष आवडायचं. मुंबईला जाताना हटकून त्या कोल्हापुरी चटणी घेऊन जायच्या. कोल्हापूरच्या खाद्य पदार्थांवर त्यांचं विशेष प्रेम होतं.
Lata Mangeshkar: लतादीदींनी गायनाची सुरवात केलेली ‘या’ शहरातून
कोल्हापुरातील काही सराफ व्यवसायिकांसोबतही लतादीदींचे चांगले नातेसंबंध होते. साड्यांच्या खरेदीसाठी लतादीदी नेहमी लक्ष्मीपुरीतील चंद्ररुप दुकानामध्ये जायच्या. दुकानाचे मालक कर्नावट कुटुंबातील तीन पिढ्यांसोबत लतादीदींचे घनिष्ट संबंध होते. लतादीदींच्या निधनामुळे कर्नाटवर कुटुंबावरही एका अर्थाने दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
देशभरातील अनेक जाहीर कार्यक्रमांमध्ये लतादीदी आवर्जून कोल्हापूरचा उल्लेख करत, काही आठवणी सांगायच्या. माजी आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांच्याशीही लतादीदींचा चांगला संपर्क होता. त्यांच्या माध्यमातून सहजसेवा ट्रस्टचे सन्मती मिरजे यांचीही लता मंगेशकर यांच्याशी भेट झाली होती. मिरजे यांच्याकडून त्यांनी मानसरोवर यात्रेची माहिती घेतली होती. शिवाय कैलासस्पर्श या पुस्तकाच्या काही प्रती आवर्जुन घेतल्या होत्या. त्यानंतर जेंव्हा कधी लता मंगेशकर कोल्हापुरला यायच्या, तेंव्हा सन्मती मिरजे त्यांना भेटायला जायचे. कोल्हापुरात आल्यावर लता मंगेशकर या आवर्जुन अंबाबाईचं दर्शन घ्यायच्या. शिवाजी विद्यापीठानं १९७८ मध्ये त्यांना डि. लिट. पदवी देऊन गौरवलं होतं. कोल्हापूरची कलापरंपरा जपण्यात आणि देशभर पोचवण्यात लतादीदींचं मोठं योगदान होतं. लतादीदींच्या निधनामुळं कोल्हापुरातील त्यांच्या निकटवर्तीयांनी आठवणी जागवत आदरांजली वाहिली.
अर्ध्यावरती डाव मोडला…’या’ कारणामुळे लतादीदी आयुष्यभर राहिल्या अविवाहीत
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT