लॉकडाउनचं कारण, त्यावरून सुरू झालं राजकारण
राज्यात कोरोना रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढतेय. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर येत्या काळात आरोग्य यंत्रणा कमी पडण्याची भीती व्यक्त केली जातेय. त्यामुळे प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये 80 टक्के बेड्स आणि 100 टक्के आयसीयू बेड्स कोरोना रुग्णांना देण्याचे आदेशही बीएमसीकडून देण्यात आलाय. त्यामुळे या सगळयाचा विचार करता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी लॉकडाउनचा इशारा दिला. लॉकडाउनसाठी तयार रहा […]
ADVERTISEMENT
राज्यात कोरोना रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढतेय. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर येत्या काळात आरोग्य यंत्रणा कमी पडण्याची भीती व्यक्त केली जातेय. त्यामुळे प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये 80 टक्के बेड्स आणि 100 टक्के आयसीयू बेड्स कोरोना रुग्णांना देण्याचे आदेशही बीएमसीकडून देण्यात आलाय. त्यामुळे या सगळयाचा विचार करता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी लॉकडाउनचा इशारा दिला.
ADVERTISEMENT
लॉकडाउनसाठी तयार रहा अशा सुचना प्रशासनाला दिल्या. पण त्यानंतर आता सरकारच्या या संभाव्य निर्णयावर महाराष्ट्रातून विरोध व्हायला लागलाय. अगदी महाविकास आघाडीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही लॉकडाउनला विरोध आहे. त्यामुळे लॉकडाउनला नेमका विरोध का होतोय? आणि त्यामुळे सरकारच्या निर्णयात काय फरक पडेल ते जाणून घेऊया..
नवाब मलिक यांची लॉकडाउनच्या संभाव्य निर्णयावर हरकत, जयंत पाटील यांची विरुद्ध भूमिका
हे वाचलं का?
लॉकडाउनच्या संभाव्य निर्णयावर हरकत घेताना अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी नियमांचं पालन केल्यास तो टाळता येऊ शकतो, असं म्हटलंय.
‘सध्यस्थितीत राज्याला लॉकडाउन परवडणारा नाही. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांना इतर पर्यायांची चाचपणी करण्यास सांगितले आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला लॉकडाउनची तयारी करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, याचा अर्थ लॉकडाउन लागू केला जाईल असं नाही. नियमांचं पालन केल्यास तो टाळता येऊ शकतो.’, असं नवाब मलिक यांनी म्हटलंय. मात्र, जयंत पाटील यांनी मात्र लॉकडाउनसंदर्भात मुख्यमंत्री घेतील तो निर्णय मान्य असेल, अशी भूमिका घेतली आहे.
ADVERTISEMENT
चंद्रकांत पाटील यांचा लॉकडाउनला कडवा विरोध
ADVERTISEMENT
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही लॉकडाउनला भाजपचा कडवा विरोध असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचं अतोनात नुकसान होईल, त्यावर इलाज म्हणून सर्वसामान्यांना एक रुपयाचंही पॅकेज सरकारकडून दिलं जाणार नाही, म्हणून सर्वसामान्यांचा विचार करता लॉकडाउन नको अशी भाजपची भूमिका असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलंय. ‘राज्य सरकार सर्वसामान्यांना एक रुपयाचेही पॅकेज देणार नाही. मात्र, कोरोनावर नियंत्रणाच्या नावाखाली राज्य सरकार जर लॉकडाऊन लागू करणार असेल, तर त्याला आमचा कडवा विरोध असेल. मातोश्रीवर बसून लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्यांना होणारा त्रास कसा कळणार? कोरोनाच्या वाढत्या संख्येवर लॉकडाऊन हे उत्तर नाही. लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्यांना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो, हे मातोश्रीमध्ये बसून कळणार नाही. त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी विना शासकीय ताफा वस्त्यांमध्ये फिरावं लागेल. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून जनजीवन पूर्वपदावर येत असताना, राज्य सरकार पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याच्या मानसिकतेत असेल, तर त्याला आमचा कडाडून विरोध असेल’, असं ते म्हणालेत.
उद्धवजी आता लॉकडाउन नकोच, संजय राऊतांचा सल्ला
शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही आता लॉकडाउन नको अशीच मागणी मुख्यमंत्र्यांकडे केलीय, ते म्हणाले की, ‘मुख्यमंत्र्यांनी पूर्णपणे लॉकडाउनचा विचार न करता निर्बंध अधिक कडक करण्याबाबत विचार करावा. संपूर्णपणे लॉकडाउन केल्यास राज्याच्या अर्थव्यवस्थेला याचा फटका बसेल. गरिबांना पुन्हा एकदा याची झळ बसेल. उद्योगधंदे, व्यापारी, दुकानदार, कामगार वर्गाला पुन्हा एकदा याचा फटका बसू शकतो. म्हणूनच पूर्णपणे लॉकडाउन लावू नये असं माझं मत आहे. आता पुन्हा लॉकडाउन लावल्यास सामान्य जनतेसोबत राज्य सरकारलाही याचा फटका बसू शकतो. लॉकडाउन लागल्यास सर्व उद्योगधंदे बंद होतील आणि सरकारला कराच्या स्वरुपात मिळणारा पैसा मिळणार नाही. त्यामुळे लॉकडाउन टाळावा.’
उद्योगपती महिंद्रा यांनी दिला मुख्यमंत्र्यांना सल्ला
उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही लॉकडाउनच्या चर्चेवर नाराजी व्यक्त केली आहे. ‘मृत्यूदर कमी करण्यासाठी सरकारने आता पायाभूत सेवांच्या उभारणीवर अधिक लक्ष द्यायला हवे. कारण लॉकडाउनचा फटका गरीब, स्थलांतरित कामगार आणि लघू उद्योगांना बसतो, त्यामुळे सरसकट लॉकडाउन नको’, असं त्यांनी म्हटलंय.
त्यामुळे पुन्हा लॉकडाउन लागू झाला तर सर्वसामान्यांचं नुकसान होईल, गरीब, स्थलांतरित कामगार आणि लघू उद्योगांना फटका बसेल, सर्व उद्योगधंदे बंद होतील आणि सरकारला कराच्या स्वरुपात मिळणारा पैसा मिळणार नाही, अशा काही महत्त्वाच्या कारणांमुळे लॉकडाउनला विरोध होतोय.
कठोर निर्बंध लागू करण्याचे प्रशासनाचे संकेत
त्याच पार्श्वभूमीवर अतिगर्दी कमी करण्यासाठी कठोर निर्बंध लागू करण्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आलेत. याबाबत राज्याच्या पुनवर्सन विभागाचे सचिव असीम गुप्ता यांनी सांगितलं की, ‘सार्वजनिक ठिकाणी नागरिकांच्या अनिर्बंध वावरावर अंकुश आणण्यासाठी काही निर्बंध घालण्याचे नियोजन सुरू आहे. अपेक्षेप्रमाणे रुग्णसंख्येत घट झाली नाही तर, आम्ही पुढच्या पातळीवरील कठोर निर्बंध लागू करण्याचं पाऊल उचलू. स्थलांतरीत कामगारांमध्ये घबराट निर्माण होऊन ते पुन्हा आपल्या मुळ गावी जातील, अशी परिस्थिती आम्हाला निर्माण करायची नाही. गेल्या वर्षीप्रमाणे कठीण परिस्थिती निर्माण होणार नाही.’ त्यामुळे आता या सगळ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून सरसकट लॉकडाउन नाही तर कडक निर्बंध लागू केले जातात का हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईलच.
हा व्हिडिओ देखील पाहा..
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT