पवारांच्या काटेवाडीत सात दिवसांचं लॉकडाउन, कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने प्रशासनाचा निर्णय
एकीकडे पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत असताना ग्रामीण भागात वाढत जाणारी रुग्णसंख्या हा प्रशासनासाठी चिंतेचा विषय बनला आहे. बारामती तालुक्यातही रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून, हॉटस्पॉट ठरत असलेल्या सात गावांमध्ये प्रशासनाने लॉकडाउन लावण्याचा निर्णय घेतला असून यात पवार कुटुंबियांच्या काटेवाडी गावाचाही समावेश करण्यात आला आहे. एकीकडे राज्यभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर कमी होत […]
ADVERTISEMENT
एकीकडे पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत असताना ग्रामीण भागात वाढत जाणारी रुग्णसंख्या हा प्रशासनासाठी चिंतेचा विषय बनला आहे. बारामती तालुक्यातही रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून, हॉटस्पॉट ठरत असलेल्या सात गावांमध्ये प्रशासनाने लॉकडाउन लावण्याचा निर्णय घेतला असून यात पवार कुटुंबियांच्या काटेवाडी गावाचाही समावेश करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
एकीकडे राज्यभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर कमी होत असला तरी बारामती तालुक्यातली रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाहीये. दुसऱ्या लाटेत बारामतीत कोरोनाचे दर दिवसाला जवळपास ५०० रुग्ण सापडत होते. कालांतराने या रुग्णसंख्येत घट झाली, परंतू लॉकडाउनच्या नियमांमध्ये शिथीलता आणल्यानंतर नागरिकांकडून होणाऱ्या उल्लंघनामुळे ग्रामीण भागात चित्र बदललं आहे.
त्यामुळे बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी सात गावांमध्ये लॉकडाउनचा निर्णय घेतला असून ७ जुलै पर्यंत या गावांमध्ये लॉकडाउन असणार आहे. बारामतीची आतापर्यंतची रुग्णसंख्या ही २५ हजार ४३१ इतकी असून २४ हजारांपेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. बारामती शहर आणि तालुक्यात सध्या ९५० सक्रीय रुग्ण असून संक्रमणाचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT