महाराष्ट्रातला Lockdown डिसेंबरपर्यंत कायम राहणार? मुख्यमंत्र्यांचा ‘त्या’ वक्तव्याचा अर्थ काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रातला Lockdown सध्या तरी 15 जून पर्यंत वाढला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या आटोक्यात आली नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. अशात मागच्याच आठवड्यात डॉ. सुभाष साळुंखे यांनी पुण्यात बोलताना एक महत्त्वाचं वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते की महाराष्ट्रातली आरोग्य यंत्रणा डिसेंबर महिन्यापर्यंत सज्ज असली पाहिजे. महाराष्ट्राचे तांत्रिक सल्लागार असलेल्या डॉ. सुभाष साळुंखे यांनी ही बाब बोलून दाखवली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी सोशल मीडियाच्या द्वारे जो संवाद जनतेशी साधला त्यामध्ये एक महत्त्वाचं वक्तव्य केलं होतं. मुख्यमंत्री म्हणाले की पहिल्या लाटेच्या उच्चांकी स्थिती सप्टेंबर महिन्यात होती. त्या ठिकाणी आपण आत्ता येऊन पोहचलो आहोत. त्यामुळे रूग्णसंख्या आटोक्यात आली असं वाटत असलं तरीही लॉकडाऊन लगेच उघडता येणार नाही.

ADVERTISEMENT

कोणत्या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन शिथिल होणार, कोणत्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम?

मुख्यमंत्र्यांच्या आणि डॉ. सुभाष साळुंखे यांच्या वक्तव्याचा अर्थ असा काढला जातो आहे की डिसेंबर महिन्यापर्यंत महाराष्ट्रात लॉकडाऊन कायम राहणार का? आपण आता या बातमीत गेल्यावर्षी काय स्थिती होती आणि आत्ता काय स्थिती आहे हे पाहणार आहोत. त्यातून या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे वाचलं का?

भारतात 40 कोटी जणांना कोरोना होऊन गेलाय?

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात काय होती परिस्थिती?

ADVERTISEMENT

गेल्या वर्षी काय होती परिस्थिती आणि आता काय आहे स्थिती?

ADVERTISEMENT

15 सप्टेंबर 2020 मध्ये 20 हजार 482 रूग्ण पॉझिटिव्ह आढळले होते तर 515 रूग्णांचा मृत्यू झाला होता.

30 मे रोजी आलेल्या महाराष्ट्रातील संख्या 18 हजार 600 नवे पॉझिटिव्ह रूग्ण तर 402 कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू

म्हणजेच जर गेल्या वर्षीचा सप्टेंबर महिना आणि यावर्षीचा मे महिना यांची तुलना केली तर आपण दुसऱ्या लाटेतून सावरत असताना आपण आत्ता कुठे गेल्या वर्षीच्या तुलनेत येऊन बसलो आहोत.

मृत्यू दराचं काय?

सप्टेंबर 202 या महिन्यात सरासरी दर होता 2.65 टक्के आणि सर्वाधिक मृत्यू झाले होते 515

मे महिन्यातला शेवटच्या आठवड्यातला मृत्यू दर आहे 1.62 टक्के आणि मृत्यू झाले 402

27 मे या दिवशी महाराष्ट्रात 425 मृत्यूंची नोंद झाली तर त्या दिवशी राज्यात कोरोनाचे पॉझिटिव्ह रूग्ण होते 21 हजार 273 त्यामुळे सप्टेंबर महिन्यात म्हणजेच गेल्या वर्षी पहिली लाट आलेली असताना जी परिस्थिती होती ती परिस्थिती महाराष्ट्रात आत्ता आली आहे.

सप्टेंबर महिन्यात रूग्ण बरं होण्याचं प्रमाण हे सरासरी 78 टक्के होते

मे महिन्यात हे प्रमाण 93.55 टक्के झालं आहे

सप्टेंबर महिन्यात रूग्ण बरे होण्याचं प्रमाण हे सरासरी 78 टक्के होते. त्यानंतर हळूहळू प्रमाण वाढत गेले. आता हे प्रमाण 93.55 टक्के इतकं होतं तरीही राज्यात लॉकडाऊन आहे. काही जिल्ह्यांमध्ये शिथीलता देण्यात आली आहे. तरीही पहिल्या लाटेत जशी दुकानं वगैरे किंवा इतर निर्बंध शिथील केले होते तशी परिस्थिती आत्ता राज्यात नाही.

इंदापूरमध्ये घोडे नाचवत Lockdown विरोधात आंदोलन

रूग्ण बरे होण्याचं प्रमाण पहिल्या लाटेत सप्टेंबर महिन्यानंतर वाढत गेलं. तोपर्यंत आपल्याकडे सगळे सणवार साजरे झाले होते. अनेक गोष्टी सुरू होत्या तर अनेक गोष्टींवर निर्बंध होते. पहिल्या लाटेत सप्टेंबर महिन्यात काय काय सुरू होतं आणि काय बंद होतं आणि आत्ताची म्हणजेच दुसऱ्या लाटेतली स्थिती काय आहे जाणून घेऊ..

सप्टेंबर 2020 या महिन्यात राज्यात काय सुरू काय बंद?

लोकल प्रवास हा फक्त अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्यांसाठीच सुरू होता.

शेतीविषयक अवजारे मिळण्याची दुकानं

दूध, बेकरीविषयक पदार्थ, किराणा दुकानं सुरू होती

या सगळ्यांची वेळ सकाळी 7 ते 2 अशी करण्यात आली होती

भाजीपाला विक्रीसाठीही हीच वेळ निश्चित कऱण्यात आली होती

सगळ्या अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सेवा पूर्णपणे सुरू होत्या

मेडिकल, वैद्यकीय उपकरणं यांची दुकानं ही पूर्णवेळ सुरू होती

खासगी अस्थापना, कार्यालयं ही कमी उपस्थितीत सुरू होती

Work From Home वर भर देण्यात आला होता

थिएटर्स, नाट्यगृहं, मॉल्स या गोष्टी बंद होत्या

हॉटेलमध्ये बसून खाण्यावर बंदी होती

मद्यविक्रीची दुकानंही सुरू होती, त्यांना ऑनलाईन डिलिव्हरीची संमतीही देण्यात आली होती

शाळा बंद करण्यात आल्या होत्या

जिल्हाबंदीही कायम होती

मे 2020 मध्ये काय स्थिती आहे?

मेडिकल, वैद्यकीय सेवा, रूग्णालयं पूर्ण वेळ सुरू आहे.

लसीकरण केंद्रं सुरू आहेत

अत्यावश्यक सेवेच्या दुकानांना सकाळी ७ ते ११ या वेळेत ती दुकानं उघडण्यास मुभा देण्यात आली आहे

भाजीपाला विक्री, दूध विक्री यांनाही वेळेची हीच मर्यादा आहे

सध्या अत्यावश्यक सेवांमध्ये आणि वैद्यकीय सेवांमध्ये काम करणाऱ्यांनाच लोकल ट्रेन प्रवासाची मुभा आहे

लग्न समारंभ दोन तासात आटोपण्याचे आदेश आहेत

लग्नासाठी फक्त 25 माणसांची उपस्थिती आवश्यक आहे

अंत्यसंस्कारांसाठी 10 माणसांची उपस्थिती हवी असंही सरकारने म्हटलं आहे

हॉटेल्स, रेस्तराँ यांना पार्सल सेवेसाठी संमती आहे मात्र हॉटेल्स सुरू कऱण्यास संमती नाही.

गेल्या वर्षी म्हणजेच पहिल्या लाटेत सणवाराच्या काळात लोकांनी गर्दी केली त्याचा परिणाम हा कोरोनाचा फैलाव होण्यामध्ये झाला. मंदिरं उघडण्यात आली होती. तसंच थिएटर्स, मॉल्स, जिम हे देखील सुरू करण्यात आले होते. ऑक्टोबर महिन्यानंतर बंधनं शिथील व्हायला सुरूवात झाली होती. मिशन बिगिन अगेन असं नाव त्याला देण्यात आलं होतं. ऑक्टोबर ते जानेवारी या कालावधीत राज्यात जवळपास सगळं काही रूळावर आल्याचं चित्र निर्माण झालं होतं. मात्र फेब्रुवारी आणि मार्चमध्ये कोरोनाची स्थिती बिघडली ज्याचा परिणाम असा झाला की 14 एप्रिलपासून पुन्हा लॉकडाऊन लावण्यात आला. यावेळी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आवश्यक ते सगळे निर्बंध लावण्यात आले.मात्र त्याचसोबत अर्थचक्र सुरू कसं राहिल याचीही काळजी सरकारने घेतली.

महाराष्ट्रात Lockdown 15 दिवसांनी वाढला,’या’ जिल्ह्यांमध्ये 1 जूनपासून निर्बंध काही अंशी शिथील

पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेतली प्रमुख आव्हानं काय?

पहिल्या लाटेत कोरोनाचा प्रादुर्भाव होत होता मात्र दुसऱ्या लाटेच्या तुलनेत रूग्ण लवकर बरे होत होते. आता दुसऱ्या लाटेत अनेक रूग्णांना लाँग कोव्हिडचा सामना करावा लागतो आहे. पहिल्या लाटेत लसी उपलब्ध नव्हत्या दुसऱ्या लाटेत आपल्याकडे लसी उपलब्ध आहेत. पण आता त्यांचा प्रचंड तुटवडा जाणवतो आहे. त्यामुळे सर्वांचं लसीकरण पूर्ण करणं हे एक मोठं आव्हान सरकारसमोर आहे. महाराष्ट्रात कोरोना योद्धे, फ्रंटलाईन वर्कर्स यांच्यानंतर 45 वर्षे आणि त्यापुढील लोकांसाठी लसीकरण सुरू झालं त्यांना पहिला डोसही देण्यात आला. मात्र त्या वयोगटाचा दुसरा डोस पूर्ण होण्याआधीच 18 ते 44 या वयोगटाच्या लसीकरणाचीही घोषणा मोदी सरकारने केली. त्यामुळे घडलं असं की लसींचा तुटवडा अनेक राज्यांमध्ये जाणवतो आहे. महाराष्ट्रात तर 18 ते 44 या वयोगटासाठीचं लसीकरण तूर्तास बंद ठेवण्यात आलं आहे.

दुसरं महत्त्वाचं आव्हान आहे ते म्हणजे म्युकर मायकोसिसचं. म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशी हा रोग सध्या महाराष्ट्रातल्या रूग्णांमध्ये कोरोना बरा झाल्यानंतर आढळतो आहे. पहिल्या लाटेच्या वेळी असा आजार होत नव्हता. मात्र दुसऱ्या लाटेत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आणि रूग्ण बरे होण्यासाठी त्यांना स्टिरॉईड्स देण्यात आली. त्यामुळे आणि ऑक्सिजनसाठीचं पाणी अशुद्ध वापरलं गेल्याने हा आजार बळावताना दिसतो आहे. त्यामुळे आत्ता महाराष्ट्रासह अनेक राज्यांना काळी बुरशीचाही सामना करावा लागतो आहे.

पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची गरज ही जास्त प्रमाणात जाणवला हे महाराष्ट्राने पाहिलं. पहिल्या लाटेच्या वेळी ऑक्सिजनचा तेवढा तुटवडा जाणवला नव्हता यावेळी तो जाणवला. त्यासाठी इतर राज्यांमधूनही ऑक्सिजन मागवण्याची वेळ महाराष्ट्रावर आली.

याशिवाय रेमडेसिवीर या औषधाचा तुटवडा, बेड्स उपलब्ध नसणं, रूग्णांचा मोठ्या प्रमाणावर मृत्यू होणं या सगळ्या आव्हानांचा सामनाही पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत जास्त करावा लागला. आत्ता परिस्थिती सुधारताना दिसली असली तरीही ती गेल्यावर्षी ज्या महिन्यात आपण उच्चांक गाठला होता त्या ठिकाणी येऊन पोहचली आहे.

या सगळ्या कारणांमुळे इतक्यात लॉकडाऊन पूर्णतः उघडता येणार नाही असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. तसंच महाराष्ट्रात, देशात तिसरी लाट येण्याचीही शक्यताही त्यांनी बोलून दाखवली. अनेक शहरांमध्ये कोरोना नियंत्रणात आला असला तरीही अनेक गावांमध्ये कोरोना नियंत्रणात आलेला नाही. त्यामुळे कोरोनामुक्त गाव ही नवी मोहीमही जाहीर करण्यात आली आहे. डॉ. सुभाष साळुंखे यांनीही वैद्यकीय पायाभूत सेवा या डिसेंबर 2021 पर्यंत सज्ज ठेवल्या पाहिजेत असं म्हटलं होतं. त्यामुळे डिसेंबर महिन्यापर्यंत ही स्थिती अशीच राहिल का? याची चर्चा सुरू झाली आहे. पहिल्या लाटेत सप्टेंबर महिन्यानंतर उच्चांक कमी होण्यास सुरूवात झाली होती. त्यानंतर निर्बंध शिथील करण्यात आले. त्याचाच फटका हा बसला की कोरोनाची दुसरी लाट फेब्रुवारीतच आली. आता दुसऱ्या लाटेतून बाहेर पडत असताना निर्बंध लवकर शिथील केले तर पुढे सगळेच महत्त्वाचे सण आहेत. पावसाळाही अगदी तोंडावर येऊन पोहचला आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यापर्यंत Lockdown लांबण्याची चिन्हं आहेत अशी स्थिती सध्या तरी दिसते आहे. लॉकडाऊन करणं हा जसा अत्यंत महत्त्वाचा आणि कठोर निर्णय असतो अगदी तसाच निर्णय असतो लॉकडाऊन उघडण्याचा. जर सगळ्या गोष्टी तातडीने शिथील केल्या तर तिसरी लाट येण्याची शक्यता आहे असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. त्यामुळे सरकार इतक्यात तरी Lockdown उघडण्याच्या मानसिकतेत नाही असंच चित्र दिसतं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT