Lockdown हा शेवटचा पर्याय ठेवा, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सर्व राज्यांना कळकळीचं आवाहन
Lockdown या शेवटचा पर्याय म्हणून अवलंबवावा असं कळकळीचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांना केलं आहे. मायक्रो कंटेन्मेंट झोनवर लक्ष केंद्रीत करा. अर्थचक्र कसं सुरू राहिल यावर लक्ष केंद्रीत करा. लॉकडाऊन हा सर्वात शेवटचा पर्याय असेल हेच बघा. आज निर्माण झालेली परिस्थिती ही सगळ्या देशात झाली आहे. त्यातून आपण बाहेर पडू हा मला विश्वास आहे […]
ADVERTISEMENT
Lockdown या शेवटचा पर्याय म्हणून अवलंबवावा असं कळकळीचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांना केलं आहे. मायक्रो कंटेन्मेंट झोनवर लक्ष केंद्रीत करा. अर्थचक्र कसं सुरू राहिल यावर लक्ष केंद्रीत करा. लॉकडाऊन हा सर्वात शेवटचा पर्याय असेल हेच बघा. आज निर्माण झालेली परिस्थिती ही सगळ्या देशात झाली आहे. त्यातून आपण बाहेर पडू हा मला विश्वास आहे त्यामुळे आता लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय ठेवा, लॉकडाऊन लावण्याची वेळ यायलाच नको अशी व्यवस्था करा असंही आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
I urge the States to consider lockdowns only as the last option and focus creating on micro containment zones: PM Narendra Modi pic.twitter.com/B1CnFlNsIj
— ANI (@ANI) April 20, 2021
आणखी काय म्हणाले नरेंद्र मोदी?
देशात कोरोना रूग्णांची संख्या रोज वाढते आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांशी संवाद साधला. देशातील नागरिकांना त्यांनी धीर देण्याचं काम आपल्या भाषणातून केलं. सगळ्या फ्रंटलाईन वर्कर्सचं आणि कोरोना योद्ध्यांचं मी कौतुक करतो. तुम्ही पहिल्या लाटेतही देशाला कोरोनापासून वाचवलं होतं. आज कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही या संकटात दिवसरात्र एक करून काम करत आहात. कठीण परिस्थिती सध्या देशासमोर आ वासून उभी आहे पण तुम्ही धीर सोडू नका. आपण योग्य दिशेने निर्णय घेतला तर आपल्याला कोरोना विरोधातली ही लढाई नक्कीच जिंकता येईल असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
हे वाचलं का?
आजच्या स्थितीत आपल्याला देशाला लॉकडाऊनपासून वाचवायचं आहे. राज्यांनीही लॉकडाऊनकडे शेवटचा अंतिम पर्याय म्हणून पाहावं. देशाच्या अर्थचक्रासोबतच आपल्याला देशवासीयांच्या आरोग्याचीही काळजी घ्यायची आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बालमित्रांना केलं महत्त्वाचं आवाहन, म्हणाले…
ADVERTISEMENT
केंद्र सरकार हाच प्रयत्न करतं आहे की देशाची अर्थव्यवस्था आणि लोकांच्या रोजीरोटीवर कमीत कमी परिणाम व्हावा. 18 वर्षांवरील लोकांना लस उपलब्ध झाल्यामुळे श्रमिकांना लस उपलब्ध होऊ शकेल. राज्य सरकारांनी मजुरांना विश्वास द्यावा की ते जिथे आहेत तिथेच त्यांनी थांबावं. गेल्यावेळची परिस्थिती आत्ताच्या परिस्थितीपेक्षा फार वेगळी होती. तेव्हा आपल्याकडे या संकटाशी लढण्यासाठी उपाय नव्हता. देशात कोरोनाविरोधात आत्तापर्यंत सगळ्या जनतेने चांगला लढा दिला आहे त्याचं श्रेय जनतेचंच आहे असंही मोदींनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
या संकटकाळात अधिकाधिक लोकांनी पुढे यावं आणि देशवासीयांना मदत करावी. युवकांनी आपल्या सोसायट्यांमध्ये, परिसरात छोट्या छोट्या समित्या तयार करून कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करण्यासाठी मदत करावी असंही आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT