Lok Sabha election 2024 schedule live : बिगुल वाजला! 19 एप्रिल ते 1 जून... सात टप्प्यात मतदान, 4 जूनला निकाल
लोकसभेच्या निवडणुकीसाठी तारखा आज (16 मार्च) जाहीर केल्या जाणार आहेत.
ADVERTISEMENT
Lok Sabha Election 2024 : लोकसभेच्या आगामी निवडणुकीचा बिगुल आज (16 मार्च) वाजला. केंद्रीय निवडणूक आयोग 543 लोकसभा मतदारसंघांसाठीचा कार्यक्रम दुपारी तीन वाजता पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केला.
ADVERTISEMENT
निवडणूक आयोगाची पत्रकार परिषदेत पाहण्यासाठी क्लिक करा
ADVERTISEMENT
- 05:29 PM • 16 Mar 2024
लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच मोदींचे ट्विट
निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. भाजप-एनडीए निवडणुकीसाठी पूर्णपणे तयार आहोत. सर्व क्षेत्रांतील सुशासनाच्या आमच्या ट्रॅक रेकॉर्डच्या आधारे आम्ही लोकांपर्यंत जात आहोत. दहा वर्षांपूर्वी, आम्ही सत्तेत येण्यापूर्वी भारतातील जनतेला INDI आघाडीच्या दयनीय कारभारामुळे विश्वासघात आणि नैराश्य वाटू लागले होते. कोणतेही क्षेत्र घोटाळे आणि धोरण लकव्यापासून सुटलेले नव्हते. जगाने भारताचा हात सोडला होता, तिथून, हे एक अद्भुत परिवर्तन झाले आहे", असे मोदी यांनी म्हटले आहे.
- 04:05 PM • 16 Mar 2024
Lok Sabha Election Date 2024: Phase Wise Full Schedule : देशात सात टप्प्यात मतदान
-19 एप्रिल रोजी पहिला टप्पा
- 26 एप्रिल रोजी दुसरा टप्पा
- 7 मे रोजी तिसरा टप्पा
- 13 मे रोजी चौथा टप्पा
- 20 मे रोजी पाचवा टप्पा
- 25 मे रोजी सहावा टप्पा
- 01 जून सातवा टप्पा- महाराष्ट्रात पाच टप्प्यामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.
- उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये सात टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. - 04:04 PM • 16 Mar 2024
Lok Sabha elections Result Date : चार जून रोजी लागणार लोकसभेचा निकाल
- सात टप्प्यात होणार लोकसभा निवडणूक
- २८ मार्च रोजी निवडणुकीची अधिसूचना निघणार
- १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान होणार, २१ राज्यात मतदान होणार.
- २६ एप्रिल रोजी लोकसभेसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार, दुसऱ्या टप्प्यात आणखी राज्ये जोडली जाणार. - 04:04 PM • 16 Mar 2024
Lok Sabha Election 2024 Schedule Live : राजकीय पक्षांना आवाहन
- जाती आणि धर्माच्या आधारावर मतदानाचे आवाहन करू नये
- राजकीय पक्षांना प्रचारात वैयक्तिक टीका करणे टाळावे.
- मतदारांना माझे आवाहन आहे की, त्यांनी मतदान करावे.
- दुश्मनी जम कर करो लेकिन ये गुंजाइश रहे
जब कभी हम दोस्त हो जाएँ तो शर्मिंदा न हों
असे म्हणत आयुक्तांनी आवाहन केले. - 04:04 PM • 16 Mar 2024
Lok Sabha Election 2024 Date Schedule Live Updates: सोशल मीडियावर असेल नजर
- मोफत वस्तू वाटण्यावर बंदी असेल.
- फेक न्यूजवर निवडणूक आयोगाची नजर असेल.
- सोशल मीडियावर निवडणूक आयोगाची नजर असेल.
- गेल्या काही निवडणुकांमध्ये नियमांचं उल्लंघन झाले आहे, ते सगळे एकत्रित करून आता आयोगाने सर्व पक्षाच्या स्टार प्रचारकांना मार्गदर्शिका दिली आहे. - 04:04 PM • 16 Mar 2024
Lok Sabha Election 2024 Date Schedule Live Updates : ५० कोटी पुरुष मतदार
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, 'लोकसभेचा कार्यकाळ 16 जून रोजी पूर्ण होईल. आम्ही तयार केलेली टीम निवडणुकीसाठी सज्ज आहे. राजीव कुमार म्हणाले की, सुमारे 50 कोटी पुरुष आणि 47 कोटींहून अधिक महिला मतदान करतील. 1.8 कोटी पहिल्यांदा मतदार, 88.40 लाख अपंग, 19.01 लाख लष्करी सुरक्षा कर्मचारी, 48000 तृतीय लिंग मतदार आहेत. मतदार यादी बनवणे आणि सुधारणे या प्रक्रियेत आम्ही राजकीय पक्षांचेही सहकार्य घेतले.
- 04:04 PM • 16 Mar 2024
Lok Sabha election schedule : ८५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे मतदार घरातून करू शकणार मतदान
- १९.७४ कोटी मतदार २० ते २९ वयोगटातील.
- ८५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेले मतदार घरातून मतदान करू शकणार.
- ८२ लाख मतदारांचे वय ८५ वर्षांपेक्षा जास्त आहे.
- देशात २१.५ कोटी युवा मतदार आहेत.
८५ लाख तरुणी पहिल्यांदा करणार मतदान. - 04:03 PM • 16 Mar 2024
lok sabha election schedule 2024 : 1.82 कोटी मतदार पहिल्यांदा करणार मतदान
- १.८२ कोटी मतदार पहिल्यांदा मतदान करणार.
- दोन वर्षांपासून निवडणूक आयोग निवडणुकीची तयारी करत होता.
- १६ जून रोजी लोकसभेचा कार्यकाळ संपत आहे.
- देशात ९६.६ कोटी मतदारस आहे.
- भारतात महिला मतदारांची संख्या ४७.१ कोटी इतकी आहे.
- देशात ४९.७२ कोटी पुरुष मतदार आहे. - 10:18 AM • 16 Mar 2024
निवडणूक आयोगाकडून अपात्र व्यक्तींची यादी जाहीर
लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वी निवडणूक आयोगाकडून अपात्र व्यक्तींची यादी जाहीर . महाराष्ट्रातील एकूण 18 जणांचा यादीत समावेश. निवडणुकातील खर्चाचे तपशील सादर न केल्यामुळे अपात्र ठरलेल्या लोकांची यादी प्रसिद्ध. या व्यक्तींना पुन्हा निवडणूक लढवता येणार नाही.
- 09:32 AM • 16 Mar 2024
राहुल गांधी यावेळी किती मतदारसंघातून निवडणूक लढवणार?
लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वी गांधी घराण्याबाबतची मोठी बातमी. राहुल गांधी यावेळी एकाच मतदारसंघातून निवडणूक लढवणार. अमेठी मधून राहुल गांधी निवडणूक लढवणार नाहीत. पुन्हा एकदा वाईनाड मधूनच राहुल गांधी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार.
- 09:11 AM • 16 Mar 2024
निवडणुकीचे अपडेट्स कुठे पाहायला मिळतील?
केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आज दुपारी पत्रकार परिषद घेतील. आणखी दोन आयुक्तही यावेळी उपस्थित असतील. या पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. याबाबतचे सर्व अपडेट्स eci.gov.in या निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर वाचायला मिळतील.
- 09:10 AM • 16 Mar 2024
चार राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीचीहो घोषणा होणार
आज निवडणुकांची घोषणा होणार आहे. लोकसभेसह विधानसभा निवडणुकांचीही घोषणा होणार आहे. आंध्रप्रदेश, ओडिसा, सिक्कीम, अरूणाचल प्रदेश या चार राज्यांच्या निवडणुकांचीही घोषणा आज होऊ शकते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT