Maharashtra breaking News Live: देशभरात पेट्रोल-डिझेल स्वस्त, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील २० उमेदवारांची यादी जाहीर केली. त्याचबरोबर ‘वंचित’ला चार जागा देण्याची शरद पवार यांनी तयारी दर्शविली आहे. यासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींवर मुंबई तकच्या या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून एक नजर टाकूयात.
ADVERTISEMENT
Marathi News Live Updates : भाजपची काल दुसरी उमेदवार यादी जाहीर झाली. यात महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची नावं आहेत. यावेळी शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी नाशिकच्या जागेवर दावा करत आहेत. अशात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत नाशिकमध्ये आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की, 'नाशिकची जागा शिवसेना जिंकणार.' तसंच डेलकरांच्या उमेदवारीवर ते म्हणाले की, 'कलाबेन डेलकर यांचे नाव भाजपच्या यादीत असलं तरी ती जागा शिवसेनेची आहे. आम्हीच ती जागा जिंकू,' असं संजय राऊत म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
- 09:55 PM • 14 Mar 2024
देशभरात पेट्रोल-डिझेल स्वस्त, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांची कपात केली आहे. शुक्रवारी सकाळी ६ वाजल्यापासून देशभरात कमी झालेल्या किमती लागू होतील. त्याचवेळी केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्विट केले. जग कठीण काळातून जात असताना विकसित आणि विकसनशील देशांमध्ये पेट्रोलच्या किमती 50-72 टक्क्यांनी वाढल्या आणि आपल्या आजूबाजूच्या अनेक देशांमध्ये आता पेट्रोल उपलब्ध नाही. 50 वर्षातील सर्वात मोठे तेल संकट असूनही, पंतप्रधान मोदींच्या दूरदर्शी आणि अंतर्ज्ञानी नेतृत्वामुळे मोदींच्या कुटुंबावर परिणाम झाला नाही.
- 06:43 PM • 14 Mar 2024
अजितदादांची साथ सोडली, लंके पवारांकडे परतले!
"लहानपणापासून मी शरद पवार यांच्या कामाचा आणि नेतृत्वाचा अभ्यास करणारा माणूस आहे. मी शरद पवार यांच्या विचारधारेचाच आहे, कालही होतो आणि उद्याही राहणार", असं आमदार निलेश लंके म्हणाले आहेत. पुढे निलेश लंके म्हणाले, 'कोविड काळात भाऊ भावाला विसरले, नवरा-बायको एकमेकांना विसरले त्या काळात मी शरदचंद्रची पवार आरोग्य मंदिर सुरु केले. त्यानंतर मी या माध्यमातून 31 हजार लोकांना उपचार देऊ शकलो. अदृश्य ताकद मला पवार साहेबांची नेहमीच लाभली. कोविड काळात मी संघर्ष केला. त्या घटना मी विसरु शकत नाही.'
- 04:59 PM • 14 Mar 2024
निलेश लंके शरद पवारांच्या भेटीला, थोड्याच वेळात होणार पक्षप्रवेश?
राष्ट्र्वादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके शरद पवारांच्या कार्यालयात दाखल झाले होते. यावेळी कार्यालयात लंके यांनी शरद पवार जयंत पाटील आणि अमोल कोल्हे यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर निलेश लंके यांचा थोड्याच वेळात पक्षप्रवेश होणार असल्याची चर्चा सूरू आहे,
दरम्यान निलेश लंके आज पुण्याला जात असताना ज्या गाडीत प्रवास करत होते. त्या गाडीचा नंबर खुप काही सांगुन जात आहे. शरद पवार ज्या गाडीत प्रवास करतात. त्या प्रत्येक गाडीचा नंबर हा 333 असतो. ह्या नंबरच्या गाडीत निलेश लंके हे आज पुण्यात पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला गेले आहेत. पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी कोविड काळात केलेल्या कामाचा अनुभव सांगणारे पुस्तक मी अनुभवला कोविड या पुस्तकाचे प्रकाशन आज पुण्यात होत आहेत. या प्रकाशनाच्या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहणार असुन येथेच त्याचा पक्ष प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे.
- 04:29 PM • 14 Mar 2024
बारामतीची जागा अजित पवार गट लढणार- चंद्रशेखर बावनकुळे
बारामतीची जागा अजित पवार गट लढणार असल्याचे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरात केले आहे.
- 03:49 PM • 14 Mar 2024
भाजपची यादी जाहीर होताच शिंदेंच्या गटाला मोठा धक्का! संजय कोकाटेंनी सोडला पक्ष
माढ्यातून महायुतीचे उमेदवार म्हणून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर होताच शिंदेंच्या शिवसेनेला पहिला धक्का बसला आहे. शिंदे गटाचे माढा लोकसभेचे संपर्कप्रमुख संजय कोकाटे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. त्यांनी पक्षाला सोडचिट्टी दिली आहे.
- 03:30 PM • 14 Mar 2024
'पहिलं टार्गेट लोकसभा बाकीचं सर्व नंतर', पंकजा मुंडेंनी स्पष्टच सांगितलं!
काल भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी त्यांची दुसरी यादी जाहीर केल्यानंतर आज पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्या म्हणाल्या की, 'नवीन अनुभवासाठी मी नेहमीच तयार असते. मी राज्य सांभाळायचे, प्रीतम मुंडे जिल्हा सांभाळायच्या, आमच्या दोघींमध्ये चांगला समन्वय आहे. प्रीतम मुंडेंना विस्थापित करणार नाही, मी माझ्या शब्दावर कायम आहे. भीती नव्हती. कारण दोघींपैकी एकीचं नाव हे अपेक्षितच होतं. आता माझं टार्गेट लोकसभा असेल बाकीचं सर्व नंतर' असं पंकजा मुंडे माध्यमांसमोर म्हणाल्या.
- 02:39 PM • 14 Mar 2024
'गद्दारी करून भाडोत्री पक्षानं सरकार पाडलं', उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका!
'गुहागर- गद्दारी करून भाडोत्री पक्षानं सरकार पाडलं. भ्रष्टाचारी अभय योजना, अशी नवीन योजना मोदींनी काढली आहे. शिवसैनिक आजही माझ्यासोबत आहेत. तुमची लाट आहे आणि मोदींची वाट आहे, असं शिवसैनिक सांगतात. अटलजींचा पक्ष खरा होता. आता भाडोत्री जनता पक्ष झालं आहे,' अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली.
- 02:13 PM • 14 Mar 2024
मुंबईने 42व्यांदा कोरलं रणजी करंडकावर नाव!
रणजी करंडक स्पर्धेचा अंतिम सामना नुकताच मुंबई आणि विदर्भ या संघांमध्ये खेळवला गेला. या सामन्यात मुंबईने विदर्भाचा १६९ धावांनी पराभव करत ४२व्यांदा या चषकावर नाव कोरलं आहे.
- 01:12 PM • 14 Mar 2024
लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचे जागावाटप अंतीम टप्यात!
लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचे राज्यातील मंतदारसंघाचे जागावाटप आता अंतीम टप्यात आले आहे. कालच भाजपने राज्यातील त्यांचे २० उमेदवारांची यादी जाहीर केली. हे मतदारसंघ भाजपचे पारंपारीक मतदारसंघ आहेत. त्यानंतर आता उरलेल्या २८ लोकसभा मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादी कॅाग्रेस यांना कोणते मतदारसंघ सोडले जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागलंय.
वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार शिवसेनेला ज्या जागा मिळतील… त्या जागांवर तीन विद्यमान मंत्र्यांचीही वर्णी लागणार असल्याची माहीती मिळतेय. या तीन मंत्र्यांमध्ये संदिपान भूमरे, तानाजी सावंत आणि संजय राठोड यांचा समावेश असेल. छत्रपती संभाजी नगरसाठी मंत्री संदिपान भूमरे, धाराशिवसाठी मंत्री तानाजी सावंत आणि यवतमाळसाठी संजय राठोड यांच्या नावाची चर्चा आहे. शिवसेनेची लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी उद्या प्रसिद्ध होणार असल्याची माहीती प्रवक्ते संजय शिरसाट यांनी काल दिली. त्यामुळे आता शिवसेनेला किती मतदारसंघ मिळणार..? आणि त्यांचे उमेदवार कोन असतील याची उत्सुकता आता सर्वांना आहे.
- 01:10 PM • 14 Mar 2024
नीलेश लंके परत येणार असतील तर त्यांचं स्वागतच- संजय राऊत
नीलेश लंके शरद पवार गटात जाणार, अशा चर्चांना सध्या उधाण आलय. अशातच संजय राऊत यांनी यावर प्रतिकिया दिली. नीलेश लंके जर परत येणार असतील, तर त्यांचं स्वागतच केलं जाईल, असं ते म्हणाले.
- 01:09 PM • 14 Mar 2024
खासदार श्रीकांत शिंदे त्यांची विरोधकांवर टीका
कल्याण लोकसभा मतदारसंघात विरोधकांना अजून उमेदवार मिळत नाही, मात्र चांगला उमेदवार यावा, निवडणूक झाली पाहिजे असे मत खासदार श्रीकांत शिंदे यांनी उल्हासनगरमध्ये व्यक्त केले.
- 11:13 AM • 14 Mar 2024
माझं अजून कुणाशीही बोलणं झालेलं नाही- निलेश लंके
'पक्षांतर, पक्ष याचा काही सध्या विषय नाही. आम्ही दादासोबतच आहोत. माझं अजून कुणाशीही बोलणं झालं नाही. जनतेचा कौल पाहून निर्णय घेणार,' असं निलेश लंके म्हणाले आहेत.
- 10:44 AM • 14 Mar 2024
'राज्यातील शेतकऱ्यांची स्थिती गंभीर'; शरद पवारांनी व्यक्त केली चिंता!
'ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना शेतकऱ्यांची चिंता नाही. राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर आहे. शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत आहेत. 70 हजार कोटींचं कर्ज माफ करून शेतकऱ्यांचं ओझं कमी केलं.' अशी चिंता शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी व्यक्त केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT